Marathi Ukhane : नवरीचे आणि नवरदेवाचे मराठी उखाणे, विनोदी गमतीदार उखाणे, हळदी कुंकू

Marathi Ukhane : नवरीचे आणि नवरदेवाचे मराठी उखाणे, विनोदी गमतीदार उखाणे,  हळदी कुंकू

या पोस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रसंगांसाठी जसे नवरीचे,नवरदेवाचे , विनोदी , हळदी कुंकू साठी मराठी उखाणे शेयर केले आहेत..

आणि आशा करतो कि तुम्हाला ते नक्की आवडतील.

नवरदेवाचे मराठी उखाणे

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात
मराठी उखाणे
चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, …..चं नाव घेऊन बांधतो कंकण
मराठी उखाणे
जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,…..च्या सहवासात झालो मी धुंद
मराठी उखाणे
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
मराठी उखाणे 3 -
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
चंद्र आहे रोहिणीचा सोबती,………माझी जीवन साथी.
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!
मराठी उखाणे 4 -
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा
चंद्र आहे चांदणीच्या संगती, आणि ….. आहे माझी जीवनसाथी
चंद्राला पाहून भरती येते सागराला , ….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
मराठी उखाणे 5 -
प्रसन्न वदनाने आले रविराज,…..ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात
मायामय नगरी, प्रेममय संसार, ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी….म्हणजे लाखात सुंदर नार
जगाला सुवास देत उमलती कळी,…नाव घेतो………वेळी.
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,…. मुळे झाले संसाराचे नंदनवन.
मराठी उखाणे 6 -
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,… आहे माझे जीवन सर्वस्व.
कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,
नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,……चं नाव घेतो………च्या घरी.
सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.
दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा
रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, ….च्या साथीने आदर्श संसार करेन
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड
…..माझे पिता,….माझी माता, सुमुहूर्तावर…..आणली माझी कांता
जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र, ……च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र..
मराठी उखाणे 7 -
उगवला रवी मावळली रजनी,……चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,……सहवासात सापडतो आनंद.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……बरोबर बांधली जीवनगाठ.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री
मराठी उखाणे 8 -

नवरीचे मराठी उखाणे

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,*** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला..

पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार _ रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.

कपाळी लावत होते कुंकू, कुंकवात पडला मोती _ राव मिळाले पती, ईश्र्वराचे आभार मानू किती.

यमुना नदीत पडते ताजमहलाची सावली _ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

मराठी उखाणे -

आयुष्याच्या सागरात ( मुलाकडील आडनाव ) ची नौका _ रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका.

तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून _ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.

आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा _ रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.

गुलाबाचे फूल लावते वेणीला _ रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.

हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण _ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण.

मराठी उखाणे 1 -

संसार रुपी सारिपाठावर पडले मनाजोगे दान _ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी _ राव माझ्या सौभाग्याचे धनी.

पित्याचे कर्तव्य संपले, झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात _ रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात.

आई वडिलांचा निरोप घेताना पाऊले होतात कष्टी _ रावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी.

घराला आहेअंगण, अंगणात आहे तुळशी वृंदावन _ रावांच्या संसाराचे करेन मी नंदनवन.

यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी _ रावांसोबत सुखी राहीन मी सासरी.

मराठी उखाणे 2 -

लाल कुंकू कपाळावरी, हिरवा चुडा हाती _ राव माझे पती सांगा तरी माझे भाग्य किती.

जगात नाही एकलव्य सारखा शिष्य _ रावांना मिळो शंभर वर्षे आयुष्य.

कण्व ऋषींच्या आश्रमात आहे शकुंतले चे माहेर _ रावांनी दिला मला सौभाग्याचं आहेर.

निळ्या निळ्या अवकाशात होते ढगांची दाटी _ रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.

आकाशात चांदणे शिंपीत रात्र आली _ राव मला मिळाले आणि माझी तपस्या पूर्ण झाली.

तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी, देवा सुखी ठेव माझी आणि _ रावांची जोडी.

मराठी उखाणे 3 -

फुलांची वेणी गुंफते माळी _ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.

नको माणिक मोती, नको चंद्र हार _ रावांच नाव हाच खरा अलंकार.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान _ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

चाफयाचे फुल दिसायला ताजे _ च नाव घेते सौभाग्य माझे.

चंद्र, तारे अवकाशाचे सोबती _ राव माझे जन्मोजन्मीचे साथी.

अक्षता पडताच अंतरपाट झाला दूर _ रावांमुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.

चंदेरी समुद्रात रुपेरी लाटा _ रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसू……. रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,*** ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, _रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

जंगलात जंगल ताडोबाचं जंगल…….. रावांच्या संसारात सर्व राहो कुशल-मंगल.

एक होती चिऊ एक होती काऊ..*** रावांचं नाव घेते, डोक नका खाऊ..

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन..*** राव बिड्या पितात संडासात बसून..

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

करवंदाची साल चंदनाचे खोड…….. रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, *** राव एवढे हॅण्डसम पण डोक्यावर टक्कल..

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. _रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,*** रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती..

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,*** रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा..

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, _रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

मराठी उखाणे 4 -

आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे _ राव माझे अलंकार खरे.

रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,……..चं नाव घेते ……..सणाला.

निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात……. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.

सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,…….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,……….. चं नाव घेते ………. च्या घरी.

निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

गणपतीच्या शिरावर हिरामानिकाचे छत्र _ रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र.

तुळशीचे वृंदावन आहे पावित्र्याचे स्थान _ रावांनी दिला मला सुवासिनीचा मान.

सुरुवात करते दिवसाची जोडून सूर्य नारायणाला हात _ रावांची लाभो जन्मो जन्मीची साथ.

मराठी उखाणे 5 -

लग्नाच्या पंक्तीत घेतले नाव खास _ रावांच्या घशात अडकला ( Pdarthache nav ) चा घास.

तेलाच्या दिव्याला कापसाची वात _ रावांशी लग्न केले लागली आयुष्याची वाट.

कोकणातून आणले फणस आणि काजू _ रावांना शिव्या घालायला मी कशाला लाजू.

नाव घे नाव घे उखाणा काही सुचत नाही आणि नाव कोणा कोणाच घेऊ मला काही कळत नाही.

वांग्याचा केला रस्सा, फिश केला फ्राय _ भावच देत नाय किती केल ट्राय.

एकत्र काम केलं तर काम होईल लवकर, मी करते भाजी आणि तू लाव कुकर.

चांदीच्या ताटात सातारी कंदी पेढे _ राव तेवढे हुशार बाकी सगळे वेडे.

पुरण पोळी ला तूप लावते साजूक _ राव आमचे खूपच नाजूक.

एक होता माऊ, एक होती चिऊ _ चे नाव घेतले आता डोक नका खाऊ.

आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,………… चा व माझा संसार आहे सुखाचा.

भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,……….चं नाव घेते ………. दिवशी.

भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,………… नाव घेते सर्वांच्याकरिता.

संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,……च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,……… हेच पती सात जन्मी हवे.

सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.

दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.

सतारीचा नाद, वीणा झंकार,…….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.

प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.

सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र विणले _ रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

आषाढ सरून आला श्रावण महिना _ रावांचे नाव घेतल्या शिवाय मला बाई राहवेना.

पूजेच्या साहित्यात पानाचा विडा _ रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.

आई-वडील सोडताना पाऊल होतात कष्टी,…… च्या संसारात करीन मी सूखाची सृष्टी.

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, _रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल, __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, _रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा _ राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा.

वटपौर्णमेची पूजा मनोभावे करते _ रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

संगमरवरी गाभारा त्याला सोन्याच्या कळस _ रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.

ईश्वराची कृपा आई-वडिलांचे प्रयत्न,…… माझ्या सौभाग्याचे रत्न.

प्रेम रुपी सागर, संसार रुपी सरिता,…… च नाव घेते खास तुमच्याकरिता.

रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,…… च नाव घेते खास तुमच्यासाठी.

राम सीतेची जोडी अमर झाली जगात,…… च नाव घेते…… च्या घरात.

उत्तर दिशेला चमकतो आढळ ध्रुवतारा,…… चा उत्कर्ष हाच अलंकार खरा.

पूजेच्या ताटात उदबत्तीचा पुडा _ रावांच्या नावाने भरला मी हिरवा चुडा.

रायगडावर घेतले शिवरायांचे दर्शन _ रावांच्या प्रेमासाठी केले जीवन अर्पण.

इंद्रधनुष्य पडते जेव्हा पावसात असते ऊन _ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.

होते कन्या माहेरी आता सून झाले सासरी _ रावांसारखे पती लाभले भाग्यवान मी खरी.

मनातले नाव उखाण्यात घेताना शब्द जुळवत राहिले _ रावांनी मला मात्र गोड बोलून फसवले.

नवस केला सावित्रीने मिळाला पती सत्यवान _ राव मिळाले पती आहे मी भाग्यवान.

गळ्यातले मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून _ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराची सून.

शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात _ रावांची आणि माझी साता जन्माची साथ.

हिमालय पर्वतावर आहेत बर्फाच्या राशी _ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) च्या दिवशी.

निळ्या निळ्या आभाळात सूर्याचा प्रकाश _ रावांवर आहे मला पूर्ण विश्वास.

आईने केली माया बाबांमुळे बनले सक्षम _ रावांसोबत होईल माझा संसार भक्कम.

संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी _ रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.

भरजरी शालूवर शोभते मोरांची जोडी _ रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी.

गणपती समोर ठेवले लाडू- पेढे _ रावांचे नाव घ्यायला कशाला एवढे आढे वेढे.

नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे _ रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.

मोगऱ्याचे झाड फुला फुलांनी दाटले _ चे नाव घेताना आनंदी मला वाटले.

निळ्या आभाळाच्या तबकात आहे नक्षत्रांचा हार _ रावांचे विचार आहेत खूपच उधार.

झाडावर बसलाय पक्षांचा थवा _ रावांचे नाव घ्यायला उखाणाच कशाला हवा.

_ रावांची आणि माझी स्वर्गात जमली जोडी सर्वांनी आशीर्वाद देवून वाढवावी लग्नाची गोडी.

घराभोवती अंगण, अंगणात तुळस _ रावांच्या आयुष्यात चाढवीन मी सुखाचा कळस.

काचेच्या वाटीत फळे ठेवली कापून _ रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.

आकाशात शोभून दिसे चंद्राची कोर _ रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर.

कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी _ रावांची मी आहे अर्धांगिनी.

श्रावण महिन्यात करतात श्रावणी सोमवार _ राव आहेत खूपच दिलदार.

शंकराची करते आराधना देवीची करते उपासना _ राव नेहमी सुखी राहावेत हिच माझी प्रार्थना.

भगवद गीतेतून मिळतो जीवन जगण्याचा अर्थ _ रावांशिवाय माझे आयुष्य आहे व्यर्थ

गुलाबाचा सुटलाय मनमोहक सुगंध _ रावांना केले मी हृदयात बंद.

कमळात उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती _ रावांच नाव घेते मी खरी भाग्यवती.

संसार रुपी पुस्तकाचे उघडते पाहिले पान _ रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

बरसला पाऊस दरवळली माती _ रावांसोबत फुलवेन नवीन नाती.

मंगळागौरी मंगळ माते नमन करते तुला _ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.

हातावर चढला रंग मेहंदीचा पक्का _ रावांच नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका.

समुद्राला आली भरती नदीला आला पुर _ रावांसाठी माहेर केले दूर.

चांदीचे जोडवे सौभाग्याची खुन _ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.

गणपतीच्या पूजेला आणले जास्वंदी चे हार _ रावांमुळे आयुष्याला मिळाली सुखाची किनार.

लग्नात नाव घेणे हा कसला कायदा तुमची तर होते करमणूक पण आमचा काय फायदा?

आकाशातून उतरली परी _ रावांच नाव घेते आता जा आपापल्या घरी.

चांदीच्या परातीत ठेवले गहू लग्नच नाही झालं तर नाव कोणाच घेऊ.

वांग्याच्या भाजीत घातलाय स्पेशल मसाला _ च नाव माहिती आहे मग मला कशाला विचारता.

फेसबुकवर झाली ओळख, इंस्टाग्रामवर प्रेम जुळले _ आहे किती रिकामटेकडे हे लग्नानंतर कळले.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,… राव हेच माझे अलंकार खरे.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, _रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी, __ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा, __ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा..

नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती _ रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती.

नात्यात आणि मैत्रीत नसावा स्वार्थ _ रावांमुळे मिळाला जीवनाला खरा अर्थ.

सोन्याची अंगठी आहे प्रेमाची खून _ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.

दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी _ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

अंगणात काढते रांगोळी फुलांची _ रावांचे नाव घेते नवी सून ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.

नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती _ रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर _ रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.

देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस _ राव आहेत सर्वांपेक्षा सरस.

कवीची कविता मनापासून वाचावी _ रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.

लावित होते कुंकुत्यात पडला मोती…रावां सारखे मिळाले पती भाग्य मानू किती

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, _रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा……. सोबत असताना नाही आनंदाला तोटा.

स्वाती नक्षत्रातील थेंबाचे, शिंपल्यात होती मोती,…… च्या संगतीत उजळली जीवन ज्योती.

प्रितीच्या झुळ्यात कळीचं फूल झालं,…… ज्या संगतीने जीवन सार्थक झालं.

सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती,…… ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.

पाकळी पाकळी उमलून फुल घेतं आकार,…… सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार.

पारिजातकाची फुलं वेचते मी वाकून,…… च नाव घेते तुमचा मान राखून.

तुमच्या आग्रहाखातर उखाणा मी आठवते _ रावांचे नाव घेताना मीच मोहरते.

कळी हसेल फुल उमलेल दरवळेल धुंद सुगंध _ च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.

बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र _ रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र.

हळदी कुंकू मराठी उखाणे

शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊंची कुशी,
पंडीत रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी

कुंकू मराठी उखाणे -
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
माधवरावांचे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

कुंकू मराठी उखाणे 1 -
वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,
कधी कधी पुनव कधी दिवस,
महेश रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस

कुंकू मराठी उखाणे 2 -

खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी,
अजय रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी

Team 360Marathi.in

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close