संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती  14 एप्रिलला साजरी होत आहे.  दोन वर्षांनी हा दिवस धडाक्यात साजरा करण्याची आणि महामानवाला वंदन करण्यासाठी एकत्र जमायची संधी मिळत आहे. कोरोनाची निर्बंध हटल्याने यंदा आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होणार आहे.

" तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही."

"ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा."

"मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा."  

"मनुस्मृती दहन करून भारतीय महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा."  

"जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष,  बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"