GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन, मराठी भाषेत त्याला सकल देशांतर्गत उत्पादन म्हणतात. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी या GDP चा वापर केला जातो. या GDP च्या सहाय्याने आपण समजू शकतो, कि कोणत्याही देशाच्या सीमारेषेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य किती आहे.
अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर, जर उत्पादित वस्तूंची किंमत जास्त असेल तर देशात पैसा अधिक येईल म्हणजे देशाचा विकास वेगाने होऊ शकेल, आणि जर उत्पादित वस्तू आणि सेवांचे मूल्य कमी असेल तर त्या देशाची आर्थिक स्थिती बरोबर चालणार नाही.
GDP ची गणना करण्याचे सूत्र आहे – सकल देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर + एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात-आयात), GDP = C + I + G + (X − M).