गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

– एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो

– आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला, ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे, अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

– आई वडील प्रथम गुरु, त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

– गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदुया गुरुराया, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

– ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

– तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची, तुम्ही दाखवली वाट भक्तीची, तुम्ही दाखवली वाट मुक्तीची, गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!