WordPress काय आहे ? WordPress वर ब्लॉग कसा बनवायचा

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०Marathi या ब्लॉग वर, आज आपण WordPress काय आहे ? आणि कश्या प्रकारे तुम्ही WordPress वर स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.. 

या पोस्ट मध्ये आपण बघू कि वर्डप्रेस काय आहे, वर्डप्रेस का वापरला पाहिजे, वर्डप्रेस मध्ये कोणते फीचर्स तुम्हाला मिळतात, वर्डप्रेस वापरल्याचे फायदे काय आणि वर्डप्रेस वर ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता असते .

चला तर मग जाणून घेऊया वर्डप्रेस बद्दल सम्पूर्ण माहिती.

WordPress काय आहे ?

वर्डप्रेस काय आहे? वर्डप्रेस हा वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करन्याचा सर्वात सोपा, आणि सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. खरं तर, वर्डप्रेस वर इंटरनेटवरील सर्व वेबसाइट्स च्या 40.0% पेक्षा अधिक वेबसाईट्स या वर्डप्रेस वर बनवलेल्या आहेत.

अंतिम परिणाम म्हणजे त्या वर्डप्रेस वेबसाइटवर सुलभ बनविणे – येथे इतके लोक आहेत जे डेव्हलपर्स नाहीत.

वर्डप्रेस एक CMS आहे म्हणजेच Content Management System, ज्याचा उपयोग वेबसाइट बनवण्यासाठी आहे आणि त्यावरचा कन्टेन्ट manage करण्यासाठी केला जातो. इथे कन्टेन्ट – प्रोग्रामिंग बद्दल काही माहितीची आवश्यकता नसते.   वर्डप्रेस तुम्हाला खूप साधा इंटरफेस provide करतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ब्लॉग ला सहज manage करू शकतात म्हणजे त्यावर नवे ब्लॉग लिहू शकतात, त्याची डिजाईन बदलू शकतात आणि खूप काही.

  WordPress ची सुरवात Matt Mullenweg यांनी May 27, 2003, रोजी केली होती आणि बघता बघता आज वर्डप्रेस सर्वात मोठा blog creation किंवा website builder म्हणून ओळखला जातो    आज वर्डप्रेस इतका पॉप्युलर आहे कि २०२१ मध्ये total वेबसाईट पैकी 39.5% वेबसाईट वर्डप्रेस ने बनलेल्या आहे, यामागचं कारण म्हणजे WordPress वापरयाला सोपे आहे, त्यात तुम्हाला plugins मिळतात ज्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होत आणि design साठी खूप ऑपशन त्यात उपलब्ध आहे

 WordPress का वापरला पाहिजे ?

वर्डप्रेस वापरण्यासाठी खूप कारण आहेत जसे  

 • वर्डप्रेस free आणि ओपन सौर्स आहे.
 • WordPress शिकायला सोपं आहे.
 • थीम्स -यामुळे आपली वेबसाइट कशी दिसेल किंवा कशी दाखवायची हे प्रामुख्याने तुम्ही स्वतः ठरवू शकतात.
 • प्लगइन्स चा असलेला मोठा साठा. ज्यामुळे आपण सहजपणे ecommerce सारख्या वेबसाइट्स बनवू शकतात.
 • ब्लॉग ला छान प्रमाणात design करू शकतात
 • वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी coding येणे आवश्यक नाही
 • SEO साठी plugins मिळतात
 • वेबसाईट किंवा ब्लॉग साठी security ऑपशन्स मिळतात

WordPress वर तुम्ही कोणत्या प्रकारचे वेबसाईट बनवू शकतात ?

   आजकाल, मूळ कोडमध्ये झालेल्या बदलांमुळे तसेच प्लगइन्स आणि थीमच्या वर्डप्रेसच्या मोठ्या कॉलेकशन्स ला धन्यवाद, ज्याचा वापर करून आपण वर्डप्रेसवर कोणत्याही प्रकारच्या वेबसाइट तयार करू शकता. वर्डप्रेस वर जवळजवळ सर्व प्रकारच्या वेबसाईट बनवू शकता जसे,

आणि अजून बऱ्याच प्रकारच्या…..

वर्डप्रेस कोण कोण वापरतात ?

वर्डप्रेस व्यक्ती, मोठे व्यवसाय आणि त्यामधील प्रत्येकजण वापरतो. आपण आत्ता पाहत असलेली साइटच वर्डप्रेस मध्येच बनवलेली आहे. आमची काही आवडती उदाहरणे येथे आहेत जे वर्डप्रेस वापरतात.

 1. Whitehouse.gov
 2. Microsoft
 3. The Rolling Stones

WordPress वापरल्याचे फायदे  ?

Themes : यात तुम्हाला खूप प्रकारच्या थिम आधी पासूनच मिळून जातात, जर तुमच्या जवळ थिम विकत घेण्याचा बजेट नसेल तर तुम्ही फ्री थिम वापरू शकत   

SEO : वर्डप्रेस SEO साठी सर्वात चांगला CMS मानला जातो, यात तुम्ही Yoast SEO, Rankmath अशे SEO plugins Install करू शकतात   

Design : वर्डप्रेस मध्ये काही टूल्स जसे elementor वापरून तुम्ही तुमच्या ब्लॉग ला प्रोफेशनल लुक देऊ शकतात   

कमी खर्च : जर तुम्ही Web Developer कळून वेबसाईट बनवायला गेलात तर तो तुम्हाला साध्या वेबसाईट साठी सुद्धा ५ ते १० हजार रुपये charge करेल पण जर तुम्ही वर्डप्रेस वापरला तर Domain आणि Hosting घेऊन तुम्ही स्वतः एक चांगली वेबसाईट बनवू शकतात…  

WordPress वापरल्याचे तोटे ?

   मित्रांनो वर्डप्रेस चे काही तोटे तर नाही पण एक काळजी घ्या ती अशी कि   वर्डप्रेस मध्ये फक्त आवश्यक असलेलं plugins च add करा, कारण जर तुम्ही जास्त plugin add केले तर तुमची वेबसाईट slow होऊ शकते.    आणि वर्डप्रेस नेहमी updated ठेवा कारण हॅकर्स जुन्या वर्डप्रेस version मध्ये नेहमी अटॅक करत असतात, आणि क्रॅक थिम किंवा plugins डाउनलोड करू नका,  

WordPress वापरण्यासाठी तुम्हाला कश्याची आवश्यकता आहे ?

   जर तुम्हाला वर्डप्रेस वर ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला २ गोष्टींची आवश्यकता असते  

  नंतर तुम्ही डोमेन आणि होस्टिंग घेऊ त्यात वर्डप्रेस इन्स्टॉल करून वेबसाईट बनवू शकाल..

निष्कर्ष 

   आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की WordPress काय आहे ? WordPress वर ब्लॉग कसा बनवायचा     आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा   आणि अश्याच माहिती साठी  360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या    धन्यवाद 

1 thought on “WordPress काय आहे ? WordPress वर ब्लॉग कसा बनवायचा”

Leave a Comment

close