कोरोना व्हायरस निबंध मराठी | Coronavirus Essay in Marathi

या जगामध्ये मनुष्याने अनेक रोगांचा सामना केला आहे

पण आज संपूर्ण जगभरात अश्या व्हायरस न थैमान घातला आहे कि ज्यामुळे संपूर्ण दुनियेची झोप उडाली आहे

लोकांच्या मनात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे, आणि जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे, आणि या व्हायरस चा नाव आहे कोरोना व्हायरस

मिंत्रानो कोरोना व्हायरस हा एक असा विषाणू आहे जो डोळ्यांना दिसू शकत नाही, हा एक अतिक्षुष्म विषाणू आहे ज्याला याआधी कधी पहिले गेले नव्हते

या विषाणूचा संसर्ग सर्वात आधी २०१९ मध्ये चीन च्या वुहान या शहरात झाला आणि त्यांनतर या विषाणूचे नाव नोबेल कोरोना व्हायरस असे ठेवण्यात आले

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या विषाणूची लागण होते, हा विषाणूखूप घातक आहे, या विषाणूमुळे जगातील अनेक लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे

कोविदा हा संसर्गजन्य रोग असून याची लागण झाल्यास ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या कोरोना विषाणू ची आढळून येतात.

हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे जर कोविड झालेली व्यक्ती एखाद्या ठिकाणी शिकली तर आणि त्या थेंबांना जर कोणाचा स्पर्श झाला तर त्याला सुद्धा कोरोना होतो

कोरोना व्हायरस पासून बचावा साठी उपाय

​गरम पाणी :

कोव्हिड १९ विषाणूला दूर ठेवण्यासाठी नियमित गरम पाणी पिण्याची सवय करून घ्या. पाणी चांगल्या पद्धतीनं उकळून घ्या. यामध्ये पुदिन्याची चार ते पाच पाने, आल्याचा एक छोटा तुकडा आणि लवंगही टाका. तीन ते चार मिनिटे पाणी उकळू द्या. सकाळी हे पाणी उकळून घ्यावे आणि दिवसभर हेच पाणी प्यावे. साध्या पाण्याऐवजी पुदिना, आले युक्त पाणी प्यावे.

काढा :

इम्म्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा प्या

खोकतांना किंवा शिंकताना tissue पेपर किंवा रुमाल लावा

थोड्या थोड्या वेळाने हात धुवा, सॅनेटायझर नियमित वापरा

कोरोना व्हायरस निबंध मराठी 200 शब्द | coronavirus essay in marathi

कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. ज्यामुळे त्यावर कोणतेही औषध नव्हते आणि कोणालाही त्याची लक्षणे नीट माहित नव्हती, परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. 

2019 मध्ये हा रोग आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड 19 असे नाव देण्यात आले.

2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे आढळले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात त्याने थैमान मांडले आहे.

हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी, देशातील सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. सर्व खाजगी शासकीय आणि कार्यालये, शाळा, इतर सार्वजनिक उपक्रम बंद करण्यात आले.

उद्देश हा होता की हा संसर्गजन्य रोग लोकांमध्ये इतका पसरू नये की त्यावर नियंत्रण मीळवणे कठीण जाईल.

ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या कोरोना विषाणू ची आढळून येतात.

इतर देशांमध्ये या संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या पतिस्थितीचा अंदाज सरकारला आला होता आणि म्हणून सरकारला कोरोनाव्हायर ससंसर्गजन्य रोगाचे संकट समजले होते. म्हणून सरकारने प्रत्येक व्यक्तीस सार्वजनीक ठिकाणी मास्क घालने बंधनकारक केले.

आवश्यक कामा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या. सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचार्‍यांना या संक्रामक रोगाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोरोना व्हायरस ची लक्षणे खालील प्रमाणे आहेत

  • श्वास घेण्यास त्रास
  • सतत छातीत दुखणे किंवा दबाव
  • गोंधळलेले वाटणे
  • निळे ओठ किंवा चेहरा
  • शुद्धीत राहण्यास असमर्थता

रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आणि इतर दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना आजारापासून जास्त धोका संभवतो.

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, आणि यामुळे संक्रमण होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूपच कमी असते , म्हणून आपण काही व्यक्तिगत सवयी पाळल्याने आणि काळजी घेतल्याने आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

कोरोना व्हायरस साठी लस सुद्धा तयार झाली आहे कोवाक्सिन आणि कोवशील्ड

कोवाक्सिन – ही एक निष्क्रिय लस (inactivated vaccine) आहे, जी मृत विषाणूचा वापार करून tried and tested platform वर बनवली गेली आहे.

कोवशील्ड – व्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्म वापरुन तयार केले गेले आहे जे पूर्णपणे भिन्न तंत्रज्ञान आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगभरात माणसांचे राहणीमान बदलले. स्वयंरोजगार ही संकल्पना खूप लोकांनी अंगिकारली.खूप सारे लोक घरी बसून असल्याने विविध कला आणि मनोरंजन तसेच व्यायाम, योगा शिकण्यात व्यस्त होते.

कोरोना आजाराच्या सुरुवातीस संचार बंदी असताना पोलिस आणि डॉक्टर्स यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य होता.

1 thought on “कोरोना व्हायरस निबंध मराठी | Coronavirus Essay in Marathi”

Leave a Comment

close