२ मिनिटात ७/१२ उतारा काढायला शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे

२ मिनिटात ७/१२ उतारा काढायला शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे

7/12 Utara in Marathi Online : ७/१२ व ८अ बघायचा आहे किंवा जमिनीशी सम्बंधित सुविधांचा लाभ Online घेऊ इच्छिता, तर हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा

जसे कि तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्र शासनाने 7/12, 8A, भू नकाशा, फेरफार अश्या अनेक सुविंधासाठी Online पोर्टल म्हणजेच वेब्सिते सुरु केली आहे.

सर्व सामान्य माणूस आता घर बसल्या या सुविंधाचा लाभ घेऊ शकतो ते आपल्या फोन किंवा कॉम्पुटरवरून अगदी मोफत.

मित्रानो शासनाने महाराष्ट्र भूमिलेख नावाचं पोर्टल सुरु केलय ज्याचा उपयोग करून तुम्ही ७/१२ व ऑनलाईन पाहू शकतात एवढेच नव्हे तर तुम्ही pdf देखील डाउनलोड करू शकतात

आज आपण याच पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत जसे 7/12 कसा शोधायचा, 7/12 कसा डाउनलोड करायचा, सातबारा उतारा district wise कसा शोधायचा,

अगदी सोप्या स्टेप्स मध्ये आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय, आणि आशा करतो कि हि पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कधी ७/१२ उतारा काढण्यासाठी सेवा केंद्र वर जावे लागणार नाही.

तर चला मग सुरु करूया आणू पाहूया कि ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा.

७/१२ उतारा कसा शोधायचा हे जाणून घेण्याआधी आपण सातबारा उतारा बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.

7/12 उतारा म्हणजे काय ?

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.

यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.

तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.

 गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते.

सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.

प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा दर्शवतो.

हे देखील वाचा,

7/12 Utara in Marathi Online :

चला तर मग आता पाहूया कि ७/१२ कसा शोधायचा.

screencapture bhulekh mahabhumi gov in 2021 06 21 13 54 47 -

वरील फोटो मध्ये दिलेली वेबसाइट आहे महाभूलेख ची, याच वेबसाइट वरून तुम्ही सातबारा पाहू शकता, त्यासाठी खालील प्रमाणे माहिती भरा.

स्टेप १ : bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट ला उघडा ( हि वेबसाइट तुम्ही मोबाईल मध्ये आणि कॉम्पुटर मध्ये देखील पाहू शकतात )

स्टेप २ : तुमचा विभाग निवडा

आता उजव्या बाजूच्या बॉक्स मध्ये तुमचा विभाग निवडा

step 2 -

आता उजव्या बाजूच्या बॉक्स, जसे तिथे अमरावती विभाग आहेत त्याप्रमाणे तुमचा जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग निवडा,

जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहित नसेल तर खालील तक्ता पहा.

औरंगाबाद विभाग Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli
अमरावती विभाग Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim
नागपूर विभाग Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभाग Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur
कोकण विभाग Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
नाशिक विभाग Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik

आता विभाग निवडा आणि Go बटनावर क्लिक करा ( आता उदाहरण साठी मी इथे नाशिक निवडलेला आहे )

स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा

विभाग निवडून Go बटन दाबल्यावर असा पर्याय तुमच्या समोर येईल

screencapture bhulekh mahabhumi gov in Nashik Home aspx 2021 06 21 14 08 52 -

आता तुम्हाला समोर २ पर्याय दिसतील ७/१२ आणि ८अ

यापैकी तुम्हाला जे हवे असेल तर निवडा आणि खाली तुमचा जिल्हा निवडा.

step 3 -
step 4 -

आता येथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

त्यानंतर सर्वे नंबर/गट नंबर टाका किंवा तुम्ही नावाने देखील सर्च करू शकतात

आता शोधा या बटनावर क्लिक करा, आणि तुम्हाला समोर तुमचा ७/१२ दिसेल,

online 712 -

आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा खाली डाउनलोड pdf या बटनावर क्लिक करून pdf देखील डाउनलोड करू शकतात

अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ७/१२ शोधू शकतात.

मित्रांनो तुम्हाला जर अजूनही समजलं नसेल किंवा ७/१२ शोधण्यात अडचण येत असेल तर हा विडिओ पहा

7/12 Utara in Marathi Online Video

७/१२ उतारा कसा वाचावा

जर तुम्ही वरील दिल्या स्टेप नीट फॉललो केल्या तर अगदी आरामात तुम्ही ७/१२ काढू वाचू शकतात

७/१२ चा उतारा म्हणजे काय

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला ऑनलाईन ७/१२ कसा शोधायचा ( 7/12 Utara in Marathi Online ) या प्रश्नच उत्तर मिळालं असेलच, जर काही अडचण येत असेल तर खालील कंमेंट मध्ये कळवा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा.

आणि अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा ब्लॉग ला भेट द्या

Other Posts,

धन्यवाद Team 360Marathi

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

2 thoughts on “२ मिनिटात ७/१२ उतारा काढायला शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close