बातमी लेखन मराठी | बातमी कशी तयार करावी | News Writing in Marathi With Format

नमस्कार, आज या पोस्ट मध्ये आपण बातमी लेखन बद्दल माहिती पाहणार आहोत, बातमी कशी तयार करावी, त्यात शीर्षक कसे लिहावे, विषय कसे लिहावे, बातमीच वृत्तांत कसे लिहावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील.

जर तुम्ही शाळेत असाल, तर तुम्हाला गृहपाठ म्हणून बातमी लेखन नक्की मिळत असेल, आम्ही त्यासाठी तुम्हाला काही उदाहरण देखील सांगू कि, बातमी लेखन कसे लिहायचे.

तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया बातमी लेखन बद्दल माहिती..

बातमी लेखन म्हणजे काय – batmi lekhan in marathi

जगात घडणाऱ्या घटनांचे वृत्तांत म्हणजेच बातमी लेखन.

तुम्ही TV वर पाहत असाल कि, न्यूज चॅनेल वर तुम्हाला जगात घडणाऱ्या घटनांविषयी एक रिपोर्टर माहिती सांगत असतो, म्हणजेच तो बातमी देत असतो.. त्याच प्रकारे जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर, त्यात वेगवेगळ्या टॉपिक वर थोडक्यात लिहिलेले असते, त्यालाच बातमी लेखन म्हणतात.

बातमी लेखनाचे स्वरूप कसे असावे – how to write batmi lekhan in marathi

जर तुम्ही निरीक्षण करून वृत्तपत्रात बातमी वाचली तर, तुम्हाला कळेल कि प्रत्येक बातमीचा एक फॉरमॅट असतो म्हणेज स्वरूप असत.

ते आपण आता पाहूया –

बातमी लेखन मराठी | बातमी कशी तयार करावी | News Writing in Marathi

बातमीचे शीर्षक – घटनेबद्दल शीर्षक मोठ्या अक्षरात लिहा. आणि हे लक्षात घ्या कि बातमीचे शीर्षक नेहमी वर्तमान काळ मध्ये असावे.

२. दिनांक – येथे बातमीविषयी किंवा घटनेच्या वेळेविषयी माहिती द्या. तारीख, वार, वेळ इत्यादी येथे लिहू शकतात.

उदाहरण :

रिपोर्टर किंवा वृत्तसंस्थेचे नाव: उदा. आमच्या रिपोर्टरद्वारे/आमच्या स्थानिक रिपोर्टरद्वारे किंवा जसे कि ३६०मराठी द्वारे

तारीख: उदा. ३ ऑक्टोबर २०२१
शहर/शहराचे नाव: पुणे

३. बातमीचा परिचय: बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजेच paragraph परिचय म्हणून ओळखला जातो. हा पॅराग्राफ तीन /चार ओळी किंवा 30 शब्दांच्या आत असावा. हा परिच्छेद कोण, कसे, कुठे, कधी, का आणि काय यासारख्या प्रश्नांची उत्तरे प्रदान करतो. हे प्रश्न घटना किंवा घटनेच्या संदर्भात विचारले जातात.

हा पॅराग्राफ लिहितांना नेहमी लक्षात ठेवा कि, हा आकर्षक असावा, म्हणजेच पूर्ण बातमीचे थोडक्यात वर्णन यात असावे, जर हा पॅराग्राफ तुम्ही उत्तम प्रकारे लिहिला तर, वाचक तुमची बातमी पुढे वाचतो.

4. संपूर्ण बातमी : आता पूर्ण घटनेचे वर्णन येथे करा, लिहित्यांना सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा..

आता आपण accident मध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला या विषयी एक बातमीचे उदाहरण पाहू :



आमच्या स्टाफ रिपोर्टर द्वारे ( जसे कि ३६०मराठी द्वारे )
पुणे: ३ ऑक्टोबर

    
पुणे-सोलापूर महामार्गावर देगावजवळ पहाटे 4 वाजता बसच्या ब्रेक प्रॉब्लेममुळे बस मोठ्या झाडावर आदळल्याने एका विचित्र अपघातात सुमारे 12 जण ठार आणि 13 जखमी झाले.

     चिपळूणहून येणारी आणि सोलापूरला जाणारी सुपर एक्स्प्रेस बस पहाटे 4 वाजता देगावजवळ आली. अचानक एका मोठ्या झाडाला धडकली. अपघात खूप भयानक होता .बसचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला. बरेच लोक झोपेत असल्याने त्यांना समजू शकले नाही. बसमध्ये 6 प्रवासी होते .12 जणांपैकी 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सरकारने रु. मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 100000/-  घोषित केले आहेत 
महाराष्ट्रात प्रचंड पावसामुळे जीवन विस्कळीत झाले

३६०मराठी रिपोर्टरद्वारे,मुंबई: ३ ऑक्टोबर 

महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील मुंबई आणि कोकण परिसरात 3 दिवस जोरदार मुसळधार पावसामुळे 5 लोकांचा बळी गेला आहे आणि आता सर्व हालचाली स्थिर आहेत.

  गेल्या 24 तासात या भागात एकूण 10 मिमी पाऊस झाला. संपूर्ण परिसरात रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम झाला .अलिबाग सारख्या काही जिल्ह्यांमध्ये दूरध्वनी लाईन विस्कळीत झाल्याची माहिती आहे. बहुतेक मुख्य रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. अनेक भागात विजेचे खांब खाली पडले आहेत. वीजपुरवठ्यामुळे मुंबई अंधकारमय झाली. अनेक सखल भागात पुरामुळे अनेक झोपड्या आणि फुटपाथवरील रहिवासी बेघर झाले. पालिका अधिकाऱ्यांनी ड्रेनेज साफ करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक M.L.A. ने घटनास्थळी भेट दिली आणि बाधित लोकांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. उद्याचा अंदाज वर्तवतो की पाऊस कमी होईल.

बातमी लेखन विषय – Batmi lekhan topics in marathi

आम्ही वर दिलेल्या २ बातमी उदाहरणातून तुम्हाला समजेलच असेल कि बातमी कशी तयार करावी, आता गृहपाठ म्हणून तुम्ही खालील विषयांवरून बातमी लेखन करू शकतात.

  • batmi lekhan in marathi on plastic bandi
  • batmi lekhan in marathi on teachers day
  • batmi lekhan in marathi on marathi divas
  • बातमी लेखन तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा
  • आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची बातमी तयार करा
  • batmi lekhan on independence day in marathi
  • batmi lekhan on bal diwas in marathi
  • batmi lekhan on children’s day in marathi
  • batmi lekhan on coronavirus
  • batmi lekhan on krida mahotsav in marathi
  • batmi lekhan in marathi 10th class 2021
  • vriksharopan batmi lekhan in marathi
  • vachan prerna din batmi lekhan in marathi
  • vasundhara din batmi lekhan in marathi
  • vidnyan pradarshan batmi lekhan in marathi
Source : Youtube

निष्कर्ष :

आजच्या पोस्ट मध्ये आपण बातमी लेखन आणि बातमी कशी तयार करावी याबद्दल माहिती जाणून घेतली.

आशा करतो तुम्हाला Batmi lekhan बद्दल सर्व माहिती समजली असेल.

आम्ही दिलेल्या वरील बातमी लेखन टॉपिक वर नक्की बातमी लिहा आणि आम्हाला ई-मेल करून पाठवा, आम्ही तुमची बातमी तुमच्या नावासोबत या लेख मध्ये नक्की पब्लिश करू.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

1 thought on “बातमी लेखन मराठी | बातमी कशी तयार करावी | News Writing in Marathi With Format”

Leave a Comment

close