जनधन खाते कसे काढायचे | जन धन योजना अकाउंट ओपनिंग फॉर्म

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज या पोस्ट मध्ये आम्ही जनधन अकाउंट म्हणजे काय ? जनधन खाते कसे काढायचे या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, तसेच जन धन योजना अकाउंट ओपनिंग फॉर्म देखील दिला आहे जेणेकरून तुम्ही त्याची प्रिंट काढून बँकेत जमा करू शकाल.

मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी असे अनेक लोक आहेत ज्यांचे बँकांमध्ये खातेही नाही. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा देशात आपत्ती येते तेव्हा गरीब लोकांपर्यंत पोहोचणे कठीण होते.

जन धन योजना (प्रधानमंत्री जन धन योजना) हीच गोष्ट लक्षात ठेऊन सुरू करण्यात आली जेणेकरून कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवता येईल. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या टर्ममध्ये लागू केली होती.

या योजनेअंतर्गत भारतातील सर्व नागरिक ज्यांचे कोणत्याही बँकेत खाते नाही ते जन धन योजनेद्वारे सहज खाते उघडू शकतात. आम्ही तुम्हाला या लेखात सांगू की तुम्ही जन धन योजनेमध्ये ऑनलाइन तसेच बँकेत जाऊन खाते कसे उघडू शकता. त्याचे इतर कोणते फायदे आहेत जे तुम्हाला मिळू शकतात.

तर चला सुरु करूया आणि पाहूया जनधन खाते बद्दल माहिती & जनधन खाते कसे खोलायचे

काय आहे जनधन योजना ( What is jandhan Yojana in Marathi )

प्रधानमंत्री जन धन योजना केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा उद्देश देशातील सर्व नागरिकांपर्यंत बँक संबंधित सुविधा पोहोचवणे हा होता.

तसेच, देशातील प्रत्येक नागरिक किंवा देशातील कुटुंबातील एका व्यक्तीचे बँक खाते असले पाहिजे, जेणेकरून सबसिडी आणि इतर योजनांचा लाभ वेळोवेळी देशातील प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचू शकेल.

जन धन योजने चे फायदे ( jan dhan yojana benefits in marathi )

बँकेच्या सर्व सुविधा सर्व लोकांपर्यंत जनधन मार्फत पोहचतील

किमान शिल्लक राखणे आवश्यक नाही, जसे के सेविंग अकाउंट मध्ये ५०० ते १००० ठेवावे लागतात, तसे जनधन मध्ये नसते, तुम्ही किमान शिल्लख शून्य रुपये देखील ठेऊ शकतात

आपत्तीच्या काळात आर्थिक मदत दिली जाईल, जसे कि कोरोना दरम्यान देखील सरकार मार्फत प्रत्येक जनधन खात्यात ५०० रुपये देण्यात आले होते, अश्या प्रकारे आपत्तीच्या काळात आर्थिक मदत तुम्हाला मिळू शकेल

अनुदान आणि इतर योजनांचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये थेट येतात तत्यामूळे घोटाळे कमी होतील.

बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाल्यामुळे बँका देखील मजबूत स्थितीत असतील.

अशे अनेक फायदे जनधन अकाउंट चे असतात

जनधन खाते साठी पात्रता आणि कागदपत्रे ( Jandhan Account Opening Document In Marathi )

  • योजनेचे लाभ मिळवण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • जन धन मध्ये खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे दुसरे खाते असू नये
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकार फोटो
  • खाते उघडण्यासाठी किमान वय 10 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
  • आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट तुम्ही यापैकी कोणत्याही आयडेंटिटी द्वारे तुम्ही खाते उघडू शकता

जनधन खाते कसे काढायचे ( How to open jandhan account in marathi )

जर तुम्हाला जन धन योजने अंतर्गत तुमचे खाते उघडायचे असेल तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. तुम्ही जवळच्या सरकारी बँक किंवा खाजगी बँकेत जा जेथे जन धन योजनेअंतर्गत खाती उघडली जातात.

किंवा तुम्ही ऑनलाईन देखील हे काम करू शकतात,

चला पाहूया दोघी पद्धतीने खाते कसे उघडलं

बँकेत जाऊन जनधन खाते कसे उघडावे

  1. बँकेत जातांना तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी म्हणजेच ( Xerox ) घेऊन जा.
  2. बँकेत जा आणि तेथील कर्मचाऱ्याला जन धन खात्यांसाठी फॉर्म विचारा,
  3. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा आणि त्यात तुमच्या कागदपत्रांची एक प्रत जोडा.
  4. त्यानंतर ते बँकेत जमा करा. अशा प्रकारे तुम्ही बँकेत जाऊन जन धन खाते उघडू शकतात.

ऑनलाईन जनधन खाते कसे उघडावे ( How to open online jandhan account in marathi )

मित्रांनो ऑनलाईन जनधन खाते साठी तुम्हाला त्याचा फॉर्म डाउनलोड करावा लागतो, पण तुमच्या सुविधेसाठी आम्ही याच पोस्ट मध्ये देखील तो फॉर्म दिलेला आहे..

हिंदी आणि इंग्लिश या २ भाषा मध्ये तो फॉर्म दिलेला आहे, तो आधी खालील लिंक वरून डाउनलोड करा.

जन धन योजना अकाउंट ओपनिंग फॉर्म ( Jandhan account form in marathi )

आता या फॉर्म ला डाउनलोड करा आणि आणि त्यात तुमची माहिती भरून जवळच्या बँकेत जमा करा.

अश्या प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने जनधन चे खाते ओपन करू शकतात

निष्कर्ष

आशा करतो तुम्हाला जनधन खाते कसे काढायचे हे समजले असेल, काही प्रश्न असल्यास तुम्ही कंमेंट करून विचारू शकतात

धन्यवाद

Team 360marathi

Leave a Comment

close