नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे,
तुम्हाला प्रश्न पडत असेल कि डोमेन म्हणजे काय असत ? आणि डोमेन ची गरज काय ? कश्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन डोमेन विकत घेऊ शकतात आणि त्यासाठी किती पैसे लागतात, या सर्व गोष्टीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत
ला तर मग बघूया डोमेन बद्दल माहिती
डोमेन म्हणजे काय? (What Is Domain In Marathi)
तुम्ही बऱ्याच दा TV वर महेंद्र सिंग धोनी ची & Godaddy कंपनी ची जाहिरात बघीतली असेल ज्यात ते Business चालू करायचा असल्यास website बनवायला सांगतात आणि त्यासाठी Godaddy वरून डोमेन घ्यायला सांगतात.
सोप्या भाषेत सांगायला गेलं तर, समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरु केलं त्यासाठी तुम्ही सामान ठेवण्यासाठी दुकान लागतो, आणि त्या दुकानाचा पत्ता असतो जिथे जाऊन ग्राहक वस्तू विकत घेऊ शकतात.
त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता तेव्हा तुमच्या वेबसाईट ला पण नाव दिले जाते( For Example : 360Marathi.in )आणि तुम्ही ते नाव browser किंवा सर्च इंजिन जसे google मध्ये जाऊन शेअरच करू शकतात आणि त्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.
जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवतात तेव्हा तुमच्या सगळ्या फाइल्स, फोटोस, आणि कन्टेन्ट एखाद्या सर्वर वर होस्ट केलेले असते आणि तुम्हाला एक ip address जसे ( 192.158. 1.38. ) दिला जातो ज्याने तुम्ही त्या वेबसाईट ला access करू शकतात.
पण हा एवढा नंबर लक्षात ठेवणे जरा अवघडच म्हणून डोमेन असतो, हा डोमेन त्या सर्वर ( होस्टिंग ) ला कनेक्ट केला जातो आणि मग तुम्ही फक्त डोमेन नाव टाईप करून त्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात..
डोमेन चे किती प्रकार असतात ? (Types Of Domain In Marathi)
डोमेन चे अनेक प्रकार असतात, ते खालीलप्रमाणे :
1 ) TOP Level Domain :
टॉप लेवल डोमेन चे examples :
- .com
- .in
- .org
- .gov
- .edu
- .info
2 ) Country Code Top Level Domain :
CcTLD country code top level domain हा देशाच्या नावावरून ठरवला जातो.
जसे समजा तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा आहेत, आणि तुमचे टार्गेटेड ग्राहक फक्त भारतातील आहे तर तुम्ही .in हा डोमेन घेऊ शकतात.
तसेच प्रत्येक देशासाठी हा डोमेन वेगवेगळा असतो जसे,
- .us ( United State )
- .Ca ( canada )
- .ch ( China )
- .pk ( Pakistan )
- .Uk ( United Kingdom )
3 ) Generic Top-Level Domain
4 ) Second-Level Domain
5 ) Third-Level Domain
ऑनलाईन डोमेन विकत कुठून घेतात ?
खालील website वरून तुम्ही डोमेन विकत घेऊ शकतात,
- Godaddy
- Namecheap
- Domain.com
- BuyDomains
- Hostgator
- BlueHost
- Google Domain
डोमेन विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात ? (How Much Money Required to buy Domain in marathi)
हे तुमच्यावर अवलंबून असत कि तुम्ही कोणता डोमेन विकत घेत आहेत जसे .com.in .org
जेवढा पॉप्युलर डोमेन तेवढी जास्त किंमत, पण साधारणतः ५००-१००० रुपये दरम्यान तुम्हाला डोमेन मिळून जातो.
निष्कर्ष
मित्रांनो आज आपण पाहिलं कि डोमेन म्हणजे काय (What is Domain Name in Marathi) आशा करतो कि तुम्हाला डोमेन बद्दल माहिती समजली असेल, जर तुम्हाला डोमेन विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकतात. धन्यवाद !!!!
Team 360Marathi,
धन्यवाद sir, मराठी मध्ये आपण चांगली माहिती पुरवीत आहात. मी तुमच्या सारखे बनण्याचे विचार करतोय. शिष्य म्हणून आपण ला स्वीकारावे. ब्लॉगिंग शाळेत मी Jr. KG मध्ये आहे.
धन्यवाद अप्पाराव राठोड, तुम्ही आमच्या पुरवलेल्या माहितीची तारीफ करून आमचा आत्मविश्वास अजून वाढवला आहे. आणि तुम्हाला ब्लॉगिंग शिकायची आहे अतिशय चांगला विचार आहे. आम्ही तुम्हाला आमच्या काही पोस्ट्स recommend करतो ज्या वाचून नक्कीच तुम्ही आमच्यासारखे ब्लॉग्स बनवू शकाल. आणि काही अडचण आल्यावर आम्ही आहोतच म्हणून काळजी नसावी, धन्यवाद !!!!
(Detailed) ब्लॉग कसा तयार करावा | How To Start A Blog in Marathi | What is Blogging in Marathi
SEO म्हणजे काय संपूर्ण माहिती – What is SEO in Marathi