पितृ पक्षाबद्दल माहिती : कथा, कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो, गाईला मागुन नमस्कार का करतात

भारतीय संस्कृती नुसार आपण आपल्याला सोडून गेलेल्या लोकांची आठवण किंवा वर्षातून एकदा त्यांची आठवण निघावी यासाठी पितृ पक्ष हे दिवस आपण त्या लोकांसाठी देतो. त्यांना आगारी देऊन पुरण पोळी च जेवण देन्याची आपली प्रथा आहे. त्यांच्या फोटो ला व्यवस्थित साफ करून त्यांची पूजा केली जाते.

परंतु तुम्हाला कधी असे प्रश्न पडले आहेत का ?

  • पित्र का करतात?
  • पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो?
  • गाईला मागुन नमस्कार का करतात?
  • माणसाच्या १० वा १३ व पितृपंधरवड्यात कावळेच का यावे लागतात?
  • यमुनेच्या तीरी श्राध्द का करतात किंवा का करावे?

आज आपण या सर्व गोष्टींवर थोडा अभ्यास करूया चला,

पितृ पक्षाची संपूर्ण कथा

दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हां राम, सिता, लक्ष्मण वनवासंत होते. त्यामुळे रामाला आपल्या वडीलाचे कोणतेच कार्य करवयास मिळाले नाही. रावणवध करुन राम राज्यवर बसला तरी सुध्दा रामाने वडीलांचे कोणतेच कार्य केले नव्हते. एकदा राम व सिता जंगलांतु जात असताना एका तळ्यामधे आकाशातुन फारमोठी वस्तु त्या तळ्यात पडते. राम जवळजाउन बघतो तर तो स्वर्गातुन पडलेला य़क्ष असतो.

तो रामाला सांगतो की, दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही कारण त्याचे क्रियाकर्म व्यवस्थीत झालेले नाही. राम घरी येतो व वडीलाचे श्राध्द घावयाचे आहे त्याची तयारी करणाची आज्ञा देतो. ही गोष्ट जेव्हां राजपुरोहीताच्या कानावर जाते तव्हां ते पुरोहीत सांगतात की स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेेल.

यमुना नदीच्या किनारी राम व सीता श्राध्द / क्रियाकर्मासाठी जातात

राम व सिता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. सकाळी राम सितेला जमुना किनारी बसवुन गावांत काही मिळते का बघण्यास जातो. दुपारची बाराची वेळ होते तरी राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मघ्यान्ह टळायला लागते या चिंतेत, सिता व ब्राम्हण बसलेले असतात, त्याच वेळेला नदीतुन दशरथ महारांजांचे दोन्ही हाताची ओजंळ बाहेर येते.

सिता म्हणते, माझ्याजवळ देण्याारखे काहीही नाही. महाराज तिला सांगतात तु ज्याठिकाणी बसली आहेस, तेथील वाळु माझ्या हातावर दिली तरी चालेल सिता त्याप्रमाणे करते व तातकाळ हात अदृष होतात. त्याच वेळेस राम तिथे येतो व सितेला म्हणतो तु हे काय केलेस, माझ्या वडीलाच्या हातावर वाळु ठेवलीस ति म्हणते असे करण्यास महाराजांनीच सागीतले.

घटनेला कावळा, गोमाता, भिक्षुक, यमुना माता, साक्ष असतात

ह्याला हा झाडावरचा कावळा, ही गोमाता साक्ष आहे, हे भिक्षुक साक्ष आहेत. यमुना माता साक्ष आहे. राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का १ कावळा भगवान रामा पुढे काहीही न बोलता गुपचुप बसतो. भिक्षुक,गोमाता,यमुना नदीसुध्दा शांत बसते. सर्व काही यांच्चा समोर झालेले असताना सुध्दा रामाच्या भिती पोटी गुपचुप बसतात.

सीता रागात कावळा, गोमाता, भिक्षुक, यमुना माता, यांना शाप देते

सिता संतापते व म्हणते सत्य माहीत असुन सांगायला तुम्ही कचरतात, मला खोटी पाडतात, मी तुम्हा सर्वंना शाप देते.

  • कावळ्या तु बाहेरुन तसा आतुन सुध्दा काळा आहेस आज पासुन लोक तुला अवलक्षणी समजतील तुझे दर्शन अपशकुन समजतील.
  • गोमाते तु एवढी पवित्र तु पण तशीच, तुला शाप देते तुझ्या पवित्र तोडांने घाण खाशील तुला लोक अपवित्र समजतील.
  • भिक्षुक तु ब्राम्हण असुन सुध्दा असा वागला तु आयुष्य भर भिकारी रहाशील.
  • यमुना नदी मध्यभागी कोरडी का आहे? – यमुना माते तुझ्या उदरातुन माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तु गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजु पर्यंत व उजव्या बाजु पर्यंत माझी नजर पोचेल तीतपर्यत तुझे पात्र केोरडे पडेल ( म्हणून यमुना नदी मध्यभागी कोरडी आहे )

एवढे सर्व होइ पर्यंत राम शांत बसलेला असतो. सितेने संतापुन एवढे जळजळीत शाप दिल्याचे पाहुन रामाला वाटते सितेचे म्हणने खरे आहे. मग तो कावळा, गाय, भिक्षुक व नदी ला विचारतात तुम्ही सर्वजण असे का वागलात. चौघे म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणुन आम्ही गप्प बसलो. राम म्हणतो केवळ माझ्यामुळे तुम्हाला शाप मिळाले आहेत ते मी सितेला परत घेण्याची विनंती करतो पण सिता शाप परत घेण्यास साफ नकार देते. शेवटी राम म्हणतो यावर उशाप दे.

रामाचे ऐकून सीता सर्वांना उशाप देते

दहाव्या, तेराव्याला आणि वर्ष श्राद्धाला आपण कावळा शिवण्याची वाट का बघतो?

सिता कावळ्याला म्हणते जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील तुझे दर्शन अपशकुन समजतील मी तुला उशाप देते तरी सुध्दा लोक १० ,१३ व व वर्ष श्राध्दाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावानी नेवेद्याचे ताट ठेवतील तुुला आग्रहाचे आमंत्रण देतील, या दिवशी तु जेवल्या शिवाय ते जेवणार नाहीत म्हणुन आपण १० ,१३, वर्ष श्राध्दाला व पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची वाट बघतो.

गाईला मागून नमस्कार का करतात?

सिता गाइला म्हणते जरी तु तोडांनी घाण खाशील मी तुला उशाप देतेकी तरी सुध्दा लोक तुझी पुजा करतील पण पाठी मागुन. म्हणुन गाइची पुजा किंवा नमस्कार पाठी मागुन करतो.

सिता भिक्षुकाला म्हणते तु आयुष्य भर भिकरी रहाशील पण मी तुला उशाप देते ज्या वेळेस तुझ्या घरांत लग्न वगैरे कार्य निघले त्या वेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल व तुझ्या घरांतले कार्य पुर्ण होइल.

यमुनेच्या तीरी श्राध्द का करतात किंवा का करावे? यमुना नदी मध्यभागी कोरडी का आहे?

सिता यमुनेला म्हणते उजव्या व डाव्या बाजु पर्यंत माझी नजर पोचते तितपर्यंत तुझे पात्र कोरड्च राहील पण मी तुला उशाप देते की जी लोक तुझ्या तटावर य़ेउन क्रिया कर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज भासणार नाही. आज आपण पहातो की यमुना नदीचे पात्र मध्य भागी कोरडे आहे.

निष्कर्ष

मित्रांनो हि होती पितृ पक्षाची कथा किंवा पित्र का करतात? त्याचा इतिहास तुम्हाला सर्वाना समजावा या साठी केलेला हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला हि कथा कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नककी कळवा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करायला विसरू नका, धन्यवाद !!!

Team, 360Marathi

Leave a Comment

close