ITBP कॉन्स्टेबल भरती 2021 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाने 65 गट ‘क’ पदांसाठी अर्ज काढले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. जी 2 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे, त्याबद्दल या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊया अधिक माहिती
इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने कॉन्स्टेबलच्या 65 पदांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. जी 2 सप्टेंबर पर्यंत चालेल. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईट वर जाऊन भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांवर पुरुष आणि महिला उमेदवारांची भरती केली जात आहे. ही सर्व पदे गट ‘क’ शी संबंधित आहेत. हि नियुक्ती क्रीडा कोट्या अंतर्गत केली जाईल. एकूण 12 प्रकारचे क्रीडा खेळाडू या पदांसाठी अर्ज करू शकतात. ज्यात कुस्ती, कबड्डी, कराटे, तिरंदाजी, बॉक्सिंग आणि इतर खेळांचा समावेश आहे.
या पदासाठी अश्या प्रकारे करा अर्ज
उमेदवार recruitment.itbpolice.nic.in वेबसाइट ला भेट देऊ शकतात. जिथे त्यांना ‘न्यूज’ चा कॉलम मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर सूचनेची लिंक मिळेल. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला नोंदणी करावी लागेल. अर्ज ऑनलाईन करावा लागेल, त्यामुळे उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती स्वतःकडे ठेवाव्यात.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात.
या व्यतिरिक्त, संबंधित क्रीडा आणि शारीरिक क्षमतेसाठी देखील पात्रता ठेवण्यात आलेली आहे. जे तुम्हाला recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईट कळेल.
वरील भरतीसाठी, अनारक्षित, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
वय मर्यादा
18 ते 23 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
Team 360Marathi.in