एलपीजी सबसिडी : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पाहिजे का ? तर आजच करा हे काम

एलपीजी सिलेंडर ग्राहकांसाठी हि महत्त्वाची बातमी आहे. 79.26 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी म्हणून ग्राहकांच्या खात्यात येऊ लागले आहेत. तुम्हीही एलपीजी सिलिंडर खरेदी करत असाल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल, तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे.

जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर त्याचे मुख्य कारण म्हणजे एलपीजी आयडी खाते क्रमांकाशी लिंक केलेले नाही. यासाठी तुमच्या जवळच्या वितरकाशी संपर्क साधा आणि त्याला तुमची समस्या सांगा. तुम्ही १८००२३३३५५५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुमची तक्रार नोंदवू शकता.

सबसिडी कोणाला मिळते

एलपीजीची सबसिडी राज्यांमध्ये वेगळी आहे, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही.

किती सबसिडी मिळते ते जाणून घ्या

सध्याच्या काळात घरगुती गॅसवरील सबसिडी खूपच कमी राहिली आहे. ग्राहकांना आता खात्यात अनुदान म्हणून 79.26 रुपये मिळत आहेत. एकेकाळी 200 रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती, ती आता 79.26 रुपयांवर आली आहे. तथापि, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 एलपीजी सबसिडी मिळत आहे.

याप्रमाणे तुमची स्टेटस जाणून घ्या

  • http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी टाका.
  • तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  • तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.
  • आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा
  • तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल
  • एकदा पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल. तुमच्या मेलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • आता mylpg.in खात्यावर लॉगिन करा आणि पॉप अप संदेशात तुमची माहिती टाइप करा.
  • आता View Cylinder Booking History/Subsidy Transfer या पर्यायावर क्लिक करा.

अश्या प्रकार तुम्ही तुमचं सबसिडी स्टेटस जाणून घेऊ शकतात

Leave a Comment

close