५० पेक्षा जास्त मराठी कोडी व उत्तरे | Marathi Kode With Answers | Marathi puzzles with answers

नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या सोबत ५० पेक्षा जास्त मराठी कोडी व त्यांची उत्तरे शेयर करणार आहोत.

तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया मराठी कोडे आणि त्यांची उत्तरे.

मराठी कोडी व उत्तरे – Marathi Kode With Answers

कोडे – पांढरे पातेल पिवळा भात?
उत्तर : अंडी

कोडे – तिखट मीठ मसाला, चार शिंगे कशाला?
उत्तर : लवंग

कोडे – सुपभर लाह्या, त्यात एक रुपया?
उत्तर : चंद्र आणि चांदण्या

कोडे – हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली?
उत्तर : भेंडी

कोडे – आकाशातून पडली घार, तिला केले ठार. मास खाऊ मटामट रक्त पीयु गटागट.
उत्तर: नारळ

कोडे – दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते.
उत्तर: चप्पल

कोडे – वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव.
उत्तर: चष्मा

कोडे – अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिता बरोबर नष्ट होते.
उत्तर: तहान

कोडे – ना अन्न खातो न पगार घेतो, पण तरही पहारा दिवस रात्र देतो. सांगा बरं कोण?
उत्तर: कुलूप

कोडे – अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.
उत्तर: गरम मसाला

कोडे – कंबर बांधून घरात राहते, सकाळ संध्याकाळ कामी येते.
उत्तर: झाडू

कोडे – राहुल च्या वडिलांची चार मुले आहेत. 1) रमेश 2) निलेश 3) गणेश चौथ्या चे नाव सांगा.
उत्तर: राहुल

कोडे – काळी आहे पण कोकिळा नाही. लांब आहे पण दांडी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. सांगा पाहु मी कोण?
उत्तर: वेणी

कोडे – एका राजाची अद्भुत राणी, दमादमाने पिते पाणी.
उत्तर: दिवा

कोडे – तीन पायांची तिपाई, त्यावर बसला शिपाई?
उत्तर : चूल आणि तवा

कोडे – काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा निघालास कुठे शेंबड्या पोरा ओळखा पाहू मी कोण
उत्तर- फणस

कोडे – एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
उत्तर- नारळाच्या झाडावर केळी नसतात

कोडे – माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही सांगा मी आहे कोण

उत्तर- Keyboard

कोडे – असे फळ कोणते त्याच्या पोटात दात असतात
उत्तर- डाळिंब

कोडे – तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
उत्तर : घड्याळ

कोडे – पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तर : कणीस

कोडे – काळ्या रानात हत्ती मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
उत्तर : कापूस

कोडे – अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?
उत्तर : वाहणारे नाक

कोडे – अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही?
उत्तर : ज्ञान

कोडे – ती माय माउली जग तिच्यावर जगते, घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?
उत्तर : जमीन

कोडे – तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण
उत्तर- तुम्ही

निष्कर्ष –

मित्रांनो आशा करतो या पोस्ट मधले मराठी कोडी व उत्तरे ( marathi riddles with answers ) आवडले असतील, जर तुमच्या कडे देखील मराठी कोडी असतील तर नक्की कंमेंट करा..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

1 thought on “५० पेक्षा जास्त मराठी कोडी व उत्तरे | Marathi Kode With Answers | Marathi puzzles with answers”

Leave a Comment

close