NDA Information in Marathi | NDA बद्दल माहिती

देशभक्ती प्रत्येकाच्या हृदयात आहे पण प्रत्येकजण सीमेवर जाऊन देशाची सेवा करू शकत नाही. पण ज्यांना याबद्दल इच्छा आहे आणि देशासाठी काही तरी करायचे आहे, आणि त्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे , म्हणूनच ते एनडीए म्हणजे काय आणि त्यासाठी कशी तयारी करायची हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया NDA बद्दल माहिती..

NDA काय आहे

एनडीए ( National Defence Academy ) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकॅडेमि , भारताच्या सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षण अकॅडेमि आहे. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला यूपीएससी द्वारे वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना SSB (सेवा निवड मंडळ) द्वारे आयोजित मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागते. जे उमेदवार या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना NDA मध्ये प्रवेश मिळतो.

एनडीए परीक्षेसाठी पात्रता :

जर तुम्हाला NDA मध्ये जॉईन व्हायचे असेल तर यासाठी तुम्हाला काही आवश्यक पात्रता पूर्ण कराव्या लागतील, त्यानंतरच तुम्ही NDA परीक्षा देऊ शकता.

एनडीए साठी पात्रता खालीलप्रमाणे :

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 10+12 वी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे किमान वय 16.5 वर्षे आणि कमाल वय 19 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.
  • उमेदवाराची किमान उंची 157 सेमी असावी.
  • इत्यादी

NDA मध्ये कसे जॉईन व्हावे

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीमध्ये जॉईन होण्यासाठी, उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) घेतलेल्या प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे.

त्याची एप्रिल आणि सप्टेंबर या दोन महिन्यात परीक्षा असतात म्हणजे वर्षातून दोनदा त्याची परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये तुम्हाला उपस्थित राहावे लागते.

एनडीएमध्ये सामील होण्यासाठी, एसएसबी, मेडिकल आणि नंतर गुणवत्ता यादीमध्ये दिसणे आवश्यक आहे.

एसएसबी, मेडिकल आणि नंतर गुणवत्ता यादी नंतर जर तुमचं selection झालं कि त्यानंतर ट्रैनिंग सुरु होते..

NDA मध्ये जॉईन होण्यासाठी खालील स्टेप असतात –

विज्ञान शाका सह बारावी उत्तीर्ण

NDA मध्ये जॉईन होण्यासाठी आधी तुम्हाला 12 वी उत्तीर्ण व्हावे लागेल. लक्षात ठेवा की 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर, आपण 11 वी विज्ञान मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय निवडावा. आर्मीसाठी, तुम्ही कोणताही विषय निवडू शकता, परंतु जर तुम्हाला नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये सामील व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला 11 वी आणि 12 वीच्या विज्ञानात गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 60% गुणांसह उत्तीर्ण आवश्य हवे.

UPSC NDA परीक्षा पास करा

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा बारावीची अंतिम परीक्षा देण्यापूर्वीच, तुम्ही एनडीए परीक्षेसाठी अर्ज करू शकता आणि परीक्षेत बसू शकता. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेली एनडीए परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. राष्ट्रीय स्तरावर NDA परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात दोनदा घेतली जाते

SSB मुलाखत पास करा

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला SSB द्वारे घेतलेल्या मुलाखतीसाठी बोलावले जाते- जसे शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत इ. मुलाखत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्याला तीन वर्षांसाठी पुण्यात प्रशिक्षणासाठी पाठवले जाते

पूर्ण प्रशिक्षण ( Training )

तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार किंवा तीन वर्षांची कामगिरी पाहून लष्कर, नौदल आणि हवाई दलापैकी एक मिळते. त्यानंतर लष्कर निवडणारे विद्यार्थी आयएमए देहरादूनला जातात, नौदलाचे विद्यार्थी भारतीय नौदल अकादमी, केरळला जातात आणि हवाई दल एएफए हैदराबादला जातात. जिथे ते दुसर्या वर्षासाठी प्रशिक्षण देतात. त्यानंतर एक वर्षानंतर ते भारतीय लष्कराचा भाग बनतात.

NDA चा Syllabus

खालील NDA syllabus PDF मध्ये तुम्ही याबद्दल सर्व माहिती पाहू शकतात.

निष्कर्ष :

आज या पोस्ट मध्ये आम्ही NDA बद्दल माहिती दिली. आशा करतो तुमचे NDA बद्दल सर्व प्रश्न सुटले असतील. अधिक माहिती साठी तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात.

Team 360Marathi

Leave a Comment

close