मित्रांनो तुम्ही बऱ्याच लोकांना पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतांना पाहिले असेल, कारण PPF खाते तुम्हाला केवळ उत्कृष्ट व्याजच देत नाही, तर त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला पूर्ण कर सूट देखील मिळते म्हणजेच या गुंतवणुकीवर तुम्हाला टॅक्स देखील लागत नाही.
आणि PPF ( Public Provident Fund ) सरकारी बचत योजना असल्याने, त्यात जमा केलेल्या पैशांची सुरक्षिततेची देखील पूर्णपणे हमी आहे. हे खाते उघडण्यासाठी, कोणतेही विशिष्ट वय किंवा विशेष पात्रता आवश्यक नाही.
या लेखात आम्ही PPF खात्याबद्दल सांगितले आहे. जसे कि पीपीएफ म्हणजे काय असते ? आणि कश्या प्रकारे तुम्ही पीपीएफ अकाउंट सुरु करू शकतात.
PPF अकाऊंट म्हणजे काय – PPF Account Information in Marathi
पीपीएफ ही भारतातील लोकप्रिय बचत योजनांपैकी एक योजनां आहे. ही योजना केंद्र सरकारने सुरु केली असल्याने, या योजनेत गुंतवलेले पैसे आणि रिटर्न सुरक्षित आणि गारंटीड असतात.
पीपीएफ योजनेचा मुख्य उद्देश लोकांना लहान मोठी बचत करण्यात मदत करणे आणि त्यांच्या बचतीवर चांगले रिटर्न देणे हा आहे. पीपीएफ योजना उत्तम आकर्षक व्याज देते आणि या व्याजातून मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही कर (टॅक्स) लावला जात नाही म्हणून पीपीफ योजना लहान मोठ्या गुंतवणुकीसाठी मोठे आकर्षण ठरते
पीपीएफ योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये आणि पीपीएफ सुविधा देणाऱ्या बहुतांश बँकांमध्ये ऑनलाईन देखील सहज उघडता येते. अकाउंट उघडण्यासाठी व अर्जाची पडताळणी आणि प्रिंट करण्यासाठी तुम्हाला फक्त एका बँकेच्या शाखेला भेट देण्याची आवश्यकता आहे.
PPF अकाऊंट कसे सुरु करावे ( PPF Account Opening Steps Marathi )
पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता
SBI बँकेत जाऊन देखील तुम्ही PPF खाते सुरु करू शकतात कारण हि बँक देखील ppf खात्याची सुविधा पुरवते.
इतर सरकारी बँका आणि प्रमुख खाजगी बँका देखील पीपीएफ खाते उघडण्याची सुविधा देतात.
पीपीएफ खाते उघडण्याची सुविधा पोस्ट ऑफिसच्या शाखांमध्येही उपलब्ध आहे.
आम्ही खाली काही बँकांची लिस्ट दिलेली आहे, ज्या पीपीएफ खाते उघडण्याची सुविधा देतात
स्टेट बैंक ऑफ इंडिया |
एक्सिस बैंक |
इंडियन ओवरसीज़ बैंक |
IDBI बैंक |
बैंक ऑफ इंडिया |
बैंक ऑफ बड़ौदा |
पंजाब नेशनल बैंक |
ओरिएंटल बैंकऑफ कॉमर्स |
कॉर्पोरेशन बैंक |
PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- PPF खाते उघडण्याचा फॉर्म
- तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र ( कोणतेही वैध ओळखपत्र जसे पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड )
- पत्त्याचा पुरावा ( कोणताही निवास पुरावा. पासपोर्ट / वीज बिल / रेशन कार्ड / बँक पासबुक )
PPF खाते उघडण्यासाठी पात्रता
- पीपीएफ खाते उघडण्यासाठी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- अनिवासी भारतीय (NRIs) आणि हिंदू अविभाजित कुटुंबांना (HUFs) PPF खाते उघडण्याची परवानगी नाही.
- एखादी व्यक्ती स्वतःच्या नावावर फक्त एकच खाते उघडू शकते.
पीपीएफ व्याज दर
सध्या मे 2021 पासून पीपीएफ खात्यावर 7.1% व्याज दर लागू आहे. तसे, सरकार दर तीन महिन्यांनी पीपीएफ खात्यासह सर्व लहान बचत योजनांच्या व्याज दराचा आढावा घेते आणि नवीन व्याज दर जाहीर करते.
इतर पोस्ट :
- Share market information in marathi
- Mutual Funds information in marathi
- Term insurance information in marathi
पीपीएफ बद्दल अधिक माहिती साठी हा विडिओ नक्की पहा
मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही पीपीएफ म्हणजे काय या विषयी माहिती दिली, आशा करतो कि तुम्हाला पीपीएफ विषयी असलेले प्रश्न या लेखाद्वारे सुटले असतील
जर अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचार
धन्यवाद
टीम ३६०मराठी