सचिन तेंडुलकर माहिती, फॅमिली, पुरस्कार, शिक्षण मराठीमध्ये | Sachin Tendulkar information in Marathi

Topics

“सचिन रमेश तेंडुलकर” हे नाव महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं आणि पूर्ण जगात “The God of Cricket” म्हणून प्रसिद्ध झालं. आज आपण अशा एका व्यक्तीची बायोग्राफी बघणार आहोत ज्याने फक्त आपल्या महारष्ट्र राज्यात नव्हे, भारतात नव्हे तर संपूर्ण जगात क्रिकेट खेळात ख्याती मिळवली आहे. आज आपण सामान्य सचिन ते भारत रत्न सचिन तेंडुलकर इथपर्यंतचा सर्व प्रवास बघणार आहोत.

क्रिकेटचा राजा आणि क्रीडा विश्वातील सुप्रसिद्ध खेळाडू सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहिला आहे. तो एक उत्तम फलंदाज आहे आणि तो आजपर्यंत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. त्याचे चाहते त्याला क्रिकेट विश्वाचा देव म्हणतात. सचिनने आपल्या क्षमतेने आणि कौशल्याने क्रिकेट विश्वात आपले नाव अजरामर केले. त्यांना भारत सरकारने अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

अशा एका थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनप्रवासावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण सचिन तेंडुलकर चे चरित्र, बायोग्राफी, अचिवमेंट्स, अनमोल वचन, आणि पहिला सामना (Sachin Tendulkar Biography, records, awards In Marathi) या सर्व गोष्टी बघणार आहोत.

चला तर बघूया, Sachin Tendulkar information in Marathi

सचिन तेंडुलकर यांचा जीवनपटन (Sachin Tendulkar’s biography in Marathi)

पूर्ण नाव “सचिन रमेश तेंडुलकर”
निक नाव (Nick Name) The God of Cricket, लिटिल मास्टर, मास्टर ब्लास्टर
काम (Profession)Cricketer, बैट्समन
वय (२०२१)४८
राशी चिन्ह (Zodiac Sign)कुंभ
नागरिकत्व (Nationality)भारतीय
होमटाउन (Home Town)मुंबई, महाराष्ट्र, भारत
शाळा (School)इंडियन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे (पूर्व), मुंबई शारदाश्रम विद्यामंदिर शाळा दादर, मुंबई
कॉलेज (College)खालसा कॉलेज मुंबई
धर्म (Religion)हिंदू (Hindu)
समाज (Cast)ब्राह्मण
पत्ता (Address)19 – ए, पॅरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई
छंद (Hobbies)घड्याळे, परफ्यूम, सीडी गोळा करणे, संगीत ऐकणे
शिक्षण (Education Qualification)ड्रॉपआउट
वैवाहिक स्थिती (Marital status)विवाहित
लग्नाची तारीख (Marriage date)२४ मे १९९५
बॅटिंग स्टाइल (Batting Style)राईट हैंडेड
बॉलिंग स्टाइल (Bowling Style)राईट-आर्म लेग स्पिन , ऑफ स्पिन , मीडियम पेस
Sachin Tendulkar short information chart in Marathi

सचिन तेंडुलकर चे बालपण, जन्म ठिकाण आणि कौटुंबिक माहिती (Sachin Tendulkar’s childhood, place of birth and family information in Marathi)

सचिन तेंडुलकर कुटुंबाची माहिती थोडक्यात

जन्म तारीख (DOB) २४ एप्रिल १९७३
जन्म ठिकाण (Birth Place) निर्मल नर्सिंग होम, दादर, मुंबई
आई (Mother) रजनी तेंडुलकर ( विमा कंपनीत Job)
वडील (Father) रमेश तेंडूलकर ( मराठी कादंबरी लेखक )
भाऊ (Brothers) अजित तेंडुलकर, नितीन तेंडुलकर
बहिण (Sister) सविता तेंडुलकर
पत्नी (wife) अंजली तेंडुलकर
मुलगा (Son) अर्जुन तेंडुलकर
मुलगी (Daughter) सारा तेंडुलकर
Brief information about Sachin Tendulkar family in Marathi

सचिन तेंडुलकर चा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी, निर्मल नर्सिंग होम, दादर, मुंबई येथे एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात झाला. सचिनच्या आई चे नाव रजनी तेंडुलकर, वडिलांचे नाव रमेश तेंडूलकर होते. सचिनचे वडील मराठी कादंबरी लेखक होते आणि आई विमा कंपनीत काम करत होती.सचिनला २ भाऊ आणि १ बहीण आहे, त्यातला सचिन सर्वात लहान आहे. सचिनच्या भावांचे एकाचे नाव अजित तेंडुलकर तर दुसऱ्याचे नितीन तेंडुलकर होते. आणि बहिणीचे नाव सविता तेंडुलकर असे होते. सचिनची हि तीन भावंडे त्याच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीची मुले होती.

सचिनने २४ मे १९९५ मध्ये अंजली तेंडुलकर सोबत लग्न केले आणि आता त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ज्यांची नावे अर्जुन आणि सारा तेंडुलकर अशी आहेत.

sachine tendulkar family -

सचिनने आपल्या बालपणाची सुरवातीची काही वर्षे बांद्रा पूर्वेतील साहित्य सहवास सहकारी गृहनिर्माण सोसायटी मध्ये घालवली. आत्ता जर सचिनकडे कोणी पाहिले तर अगदी शांत आणि सभ्य असा सचिन आपण बघतो, परंतु आत्ताच्या तुलनेत सचिन हा त्याच्या बालपणात अगदी उलट होता, कारण त्याला शाळेत भांडणे, तंटे आणि मुलांना धमकावणे या गोष्टी फार आवडायच्या.

किशोरवयात, सचिन अमेरिकेच्या आघाडीच्या टेनिसपटूंपैकी एक जॉन मार्कनेरो चा खूप मोठा चाहता होता. अजितने सचिनच्या खट्याळ स्वभावाची मोठ्या कष्टाने सुटका केली आणि १९८४ मध्ये त्याला क्रिकेटमध्ये रस दाखवण्याचा आग्रह धरला. त्याने सचिनची ओळख रमाकांत आचरेकर यांच्याशी केली, जे त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध क्लब क्रिकेटर तसेच एक उत्तम प्रशिक्षक होते. रमाकांत आचरेकर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटचा सराव करायचे.

आचरेकरांनी सचिनची प्रतिभा लक्षात घेतली, जी त्यांना खुप मनाला भावली, त्यानंतर त्यांनी सचिनला शारदाश्रम विद्यामंदिर (इंग्रजी) माध्यमिक शाळा सोडण्यास सांगितले आणि दादरमध्येच असलेल्या त्यांच्या शाळेत प्रवेश घेण्यास सांगितले. शाळा स्थानिक क्रिकेट मंडळाच्या शीर्षस्थानी होती आणि त्या वेळी अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू येथून उदयास आले होते. याआधी सचिनने वांद्रे पूर्व येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

सचिन तेंडुलकरचे शिक्षण (Sachin Tendulkar’s education Information Marathi)

लहानपणापासुनच सचिन ला खेळात आवड असल्याने आणि घरच्यांनी सुद्धा क्रिकेट मध्ये करिअर करण्याच्या त्याच्या स्वप्नाला पाठिंबा दिल्याने सचिन शिक्षणात किंवा त्या शिक्षणा चा पुढे काही खास फायदा करून घ्यायचाय या हेतु मध्ये अजिबात नव्हता. सचिन अभ्यासात फारसा चांगला नव्हता, तो एक मध्यमवर्गीय विद्यार्थी होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण वांद्रेच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले.

मग क्रिकेटमधील त्याची आवड पाहून, त्याचे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सांगण्यावरून, त्याला दादर, मुंबई येथील शारदाश्रम विद्या मंदिरात दाखल करण्यात आले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईच्या खालसा महाविद्यालयात गेले, त्यानंतर त्यांनी मध्येच त्यांचा अभ्यास थांबवला आणि क्रिकेटला त्यांचे एकमेव स्थान बनवले.

हे देखील वाचा,

क्रिकेट विश्वात सचिनचे आगमन (Sachin’s arrival in cricket)

सचिनच्या लहानपणाचे क्रिकेट प्रेम आणि मोठेपणा –

सचिन शाळेत एक महान मुलगा मानला जायचा आणि मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा सामान्य विषय नेहेमीच बनलेला असायचा. तो माटुंगा गुजराती सेवा मंडळ शिल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या शाळेच्या संघातील सर्वात उत्तम आणि प्रभावशाली खेळाडूंपैकी एक होता. सचिन शालेय क्रिकेट तसेच क्लब क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात यशस्वी झाला आणि त्याने प्रतिष्ठित कांगा लीगमध्येही कामगिरी केली. सचिनचा पहिला क्लब जॉन ब्राइट क्रिकेट क्लब होता, जो नंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) झाला.

अगदी सुरवात म्हणाल तर ती अशी झाली होती –

सचिन नेहेमी म्हणतो की क्रिकेट हे त्याचे पहिले प्रेम आहे, तो त्याचा खूप आनंद घेतो आणि यामुळे त्याला एक नवी ऊर्जा मिळते. सचिनला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती, त्याला अभ्यास करायची कधीच इच्छा होत नसे, तो दिवसभर त्याच्या इमारतीसमोर मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. सुरुवातीला तो टेनिस बॉलने सराव करायचा, त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने क्रिकेटकडे त्याचा कल लक्षात घेतला आणि त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांच्याशी चर्चा केली.

अजित म्हणाला की जर आपण सचिनला योग्य मार्गदर्शन केले तर तो क्रिकेटमध्ये काहीतरी चांगले करण्यास सक्षम आहे. सचिनच्या वडिलांनी सचिनला बोलावून घेतले, तेव्हा तो फक्त १२ वर्षांचा होता आणि त्याने सचिनचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यास सांगितले. सचिनचे क्रिकेटवरील प्रेम पाहून त्याला क्रिकेट प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतले आणि नंतर सीझन बॉलने त्याचा सराव सुरू केला.

सचिनचे सर्वात पहिले गुरु रमाकांत आचरेकर होते, रमाकांत सरांनी त्यांची प्रतिभा पाहून त्यांना शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल ला जाण्यास सांगितले कारण या शाळेची क्रिकेट टीम खूप चांगली होती आणि अनेक चांगले खेळाडू येथून बाहेर पडले होते. आचरेकर सर त्यांना शाळेच्या वेळेपासून सकाळी आणि संध्याकाळी जास्तीचे क्रिकेट प्रशिक्षण द्यायचे. यामुळे सचिनची अनेक संघांमध्ये खेळाडू म्हणून निवड करण्यात अली होती

सचिनची पहिली हार, महत्वाचा पुरस्कार आणि सुनील गावसकर कडून प्रोत्साहन

सचिनने वेगवान गोलंदाज होण्याच्या सरावासाठी वयाच्या १४ व्या वर्षी मद्रास येथील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये हजेरी लावली. तथापि, तिथले नेतृत्व करणाऱ्या डेनिस लिली हे या लहान मुलाच्या गोलंदाजी ने प्रभावित झाले नाही आणि सचिनला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यावेळी सचिनला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट कनिष्ठ क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकता आला नाही, त्यामुळे तो अस्वस्थ झाला, पण त्याला श्री सुनील गावस्कर यांच्याकडून अल्ट्रा लाईट पॅडची एक जोडी मिळाली, ज्यात लिहिले होते की मी स्वतः हा पुरस्कार या वयात जिंकू शकलो नव्हतो.

सुनील गावस्कर यांचा ३४ व्या कसोटी शतकाचा विक्रम मोडल्यानंतर सचिन म्हणाला की त्यावेळचे त्यांचे शब्द माझ्यासाठी कदाचित सर्वात मोठे प्रोत्साहन असल्याचे सिद्ध झाले आहेत.

सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला अनुभव (Tendulkar’s first experience of international cricket)

सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला अनुभव तेव्हा मिळाला, जेव्हा तो इम्रान खानच्या टिम चा पर्याय म्हणून एका प्रदर्शनातील सामन्यात दिसला, कारण तो सामना सीसीआयच्या सुवर्ण महोत्सवी सेलिब्रेशनचा भाग म्हणून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. सचिन देखील या ठिकाणी सराव करायचा १९८७ मध्ये जेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप सेमीफायनल सामना मुंबईत खेळला गेला, तेव्हा सचिनने गोलंदाजाची भूमिका बजावली.

सचिनच्या प्रतिभेची पहिली झलक

१९८८ हे वर्ष सचिनसाठी एक विलक्षण वर्ष होते, कारण त्याने प्रत्येक सामन्यात शतक झळकावले होते. सचिनचा मित्र आणि टीम इंडियाचा सहकारी विनोद कांबळीसह लॉर्ड्स हॅरिस शील्ड इंटरस्कूल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूलविरुद्ध नाबाद ६६४ धावा केल्या. सचिनने त्या सामन्यात ३२६ धावा केल्या आणि त्या स्पर्धेत १००० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सचिनचे वर्चस्व असे होते की विरोधक त्याच्याबरोबर सामने खेळण्यास मागे पुढे बघायचे आणि तो काळ गोलंदाजासाठी खरोखरच वेदनादायक होता.

सचिन नेहेमी म्हणतो की प्रत्येक सकाळ एका नवीन दिवसाचे वर्णन करत असते आणि हे वाक्य खर्च सचिनसाठी योग्य होते. मेहनती, तसेच अदम्य नैसर्गिक प्रतिभा आणि धावपळीचा तरुण मुंबईकर (सचिन) यांनी उत्तम कामगिरी केली कारण त्याची वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निवड झाली होती आणि पाकिस्तान टिम तेव्हा वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक स्वभावामुळे त्या काळातील सर्वात मजबूत संघांपैकी एक होता. सचिनने त्या दौऱ्यातील बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली होती.

सचिन तेंडुलकरची लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन (Marathi Information about Sachin Tendulkar’s love life and married life)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशी एक व्यक्ती असते जिच्या सोबत आयुष्य जगावं अशी त्याची इच्छा असते, तसेच सचिन सोबत पण झालय. सचिन च्या लाजाळू आणि शांत स्वभावामुळे त्याने या त्याच्या लव्ह स्टोरी बद्दल कधी मोकळे नाही सांगितले, परंतु मीडिया मध्ये जेव्हा जेव्हा त्याने किंवा त्याच्या बायको अंजलीने संदर्भ केले आहेत ते नक्कीच जोडले जाऊ शकतात.

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची लव्ह स्टोरी (Sachin and Anjali Tendulkar’s love story in Marathi)

sachine and anjali tendulkar -

सचिनच्या पत्नीचे नाव अंजली तेंडुलकर आहे, अंजली हि बालरोगतज्ञ आहे आणि ती प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांची मुलगी आहे. सचिन आणि अंजली ची पहिली भेट हि मुंबई विमानतळावर झाली होती आणि नंतर ते पुन्हा एका त्यांच्या mutual मित्राच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटले. मग त्या दोघांमध्ये हळू हळू संभाषण सुरू झाले. बघायला गेलं तर अंजली ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती, साहजिकच तिला क्रिकेटमध्ये जास्त रस नव्हता. सचिन क्रिकेटर आहे हे तुला माहित सुद्धा नव्हते. जेव्हा या दोघांमध्ये भेटण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा अंजलीमध्ये आपोआपच क्रिकेटमध्ये आवड व्हायला सुरुवात केली.

जेव्हा हे दोघे एकमेकांना भेटायला बोलायला लागले, नुकतंच तेव्हा अंजली तिच्या वैद्यकीय कारकीर्दीत सराव करत होती आणि सचिनचा सुद्धा नुकताच क्रिकेट प्रवास सुरू झाला होता. नंतर हळू हळू सचिनने क्रिकेट विश्वात स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. यामुळे या दोघांना सहज कुठेपण भेटणे इतके सोपे नव्हते, कारण सचिन जिथे जायचा तिथे सचिनच्या चाहत्यांची आणि मीडिया ची गर्दी व्हायची. एकदा जेव्हा दोघांनी काही मित्रांसोबत “रोजा” चित्रपट बघायला जाण्याचा विचार केला, तेव्हा सिनेमागृहातील त्याच्या चाहत्यांना घाबरून सचिन बनावट दाढी घालून थिएटरमध्ये गेला होता, पण तरीही त्याच्या चाहत्यांनी त्याला ओळखले आणि त्याला घेरले आणि ऑटोग्राफ घेतले. .

अंजली सांगते की जेव्हा सचिन आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होता तेव्हा सचिनशी बोलण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय फोनचे बिल वाचवण्यासाठी तो सचिनला प्रेमपत्र लिहित असे.

सचिन आणि अंजली चे वैवाहिक जीवन (Sachin and Anjali’s married life)

सचिन अंजलीचे हे बाहेर भेटणे, बोलणे, लपून छपून भेटणे असे सुंदर नाते ५ वर्षे चालले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सचिन अंजली हे दोघे २४ मे १९९५ रोजी विवाह बंधनात अडकले. त्या नंतर लग्नाच्या २ वर्षानंतर, १२ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांना कन्यारत्न झाले, जिचे नाव त्यांनी सारा तेंडुलकर ठेवले. २ वर्षानंतर, पुन्हा त्यांना पुत्रप्राप्ती होऊन एक मुलगा झाला, ज्याचे नाव अर्जुन ठेवले आणि अशा प्रकारे सचिनचे कुटुंब पूर्ण झाले.

मुलांनंतर, अंजलीला तिचे बालरोगतज्ज्ञ करिअर मध्येच थांबवावे लागले, तिने सर्व लक्ष तिच्या मुलांच्या संगोपनासाठी दिले. तिने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की तिला आपले करिअर सोडण्याचे दुःख नाही, तिला तिच्या पती आणि मुलांना वेळ देणे आवडते आणि तिने एक आदर्श आई आणि पत्नीचे कर्तव्य पार पाडले आहे आणि एक यशस्वी वैवाहिक जीवन स्थापित केले आहे.

सचिन तेंडुलकर चे करिअर (Career information of Sachin Tendulkar in Marathi)

  1. सचिनची क्रिकेट कारकीर्द सर्व वर्तमान आणि आगामी खेळाडूंसाठी मार्गदर्शक आहे. यासाठी त्याचे वडील, भाऊ आणि मुख्य म्हणजे त्याचे प्रशिक्षक सर आचरेकर यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. सचिन खूप मेहनती आहे, त्याने हे स्थान मिळवण्यासाठी आपले सर्वस्व दिले आहे.
  2. १९८८ मध्ये त्याने राज्यस्तरीय सामन्यात मुंबई संघाकडून खेळून आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या सामन्यातील त्याची कामगिरी पाहून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. ११ महिन्यांनंतर, त्याने प्रथमच भारत पाकिस्तान सामन्यात भारतासाठी क्रिकेट खेळले.
  3. सचिनचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तानशी होता, त्यानंतर त्याने आपली दमदार कामगिरी दिली आणि या सामन्यात त्याला नाकावर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला, पण त्याने हार मानली नाही आणि अतिशय उत्तम खेळून पाकिस्तानी खेळाडूं चा घाम काढला होता.
  4. १९९० मध्ये, त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला, जो भारत आणि इंग्लंड दरम्यान होता. आणि इथे त्याने शतक करून तरुण वयात शतक करण्याचा नवीन रेकॉर्ड केला.
  5. प्रत्येकजण त्याच्या कामगिरीने मोहित झाला होता, म्हणून १९९६ च्या विश्वचषकात त्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले. १९९८ मध्ये, त्याने कर्णधारपद सोडले, परंतु १९९९ मध्ये त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले, परंतु त्याचे कर्णधार पद संघाला कधी शोभले नाही आणि त्याने २५ पैकी फक्त ४ कसोटी सामने जिंकले, म्हणून त्याने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा कधीही कर्णधार न होण्याचा निर्णय घेतला.
  6. २००१ मध्ये, तो एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटू बनला. २००३ चा काळ हा त्याचा सुवर्णकाळ होता, त्याचे चाहते वाढत होते. २००३ मध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या आणि टीम इंडियाला विजयाच्या काठावर नेले आणि सर्वांचा आवडता खेळाडू बनला.
  7. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होता, ज्यामध्ये भारत हरला, पण इथे सचिनला सामनावीर ही पदवी मिळाली.
  8. यानंतर सचिनने अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला आणि एकेकाळी त्याने खूप वाईट वेळ देखील पाहिली जेव्हा त्याच्यावर सामना हरवल्याचा आरोप झाला, पण त्याने कशावरही लक्ष न देता त्याच्या खेळाकडे लक्ष दिले आणि पुढे जाऊन उंची गाठली.
  9. २००७ मध्ये त्याने एका कसोटी सामन्यात अकरा हजार धावा करण्याचा विक्रम केला. यानंतर, २०११ च्या विश्वचषकात, तो पुन्हा आपल्या सर्व सामर्थ्याने दिसला, त्याने द्विशतक ठोकले आणि मालिकेत ४८२ धावा केल्या.
  10. २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताने विजय मिळवला. सचिनने लहानपणापासून जे स्वप्न पहिले होते, ते विश्वचषकातील त्याचा हा पहिला विजय होता.
  11. आपल्या कारकिर्दीतील सर्व विश्वचषकांमध्ये २००० धावा आणि ६ शतके करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. हा विक्रम अद्याप कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेला नाही.

हे देखील वाचा,

सचिन तेंडुलकर ने केलेले वर्ल्ड रेकॉर्डस् ची यादी (List of world records made by Sachin Tendulkar in Marathi)

sachine tendulkar images -

  1. मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध १०० वे शतक झळकावले.
  2. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला.
  3. वनडे मध्ये सर्वाधिक (१८००० पेक्षा जास्त) धावा केल्या.
  4. वनडे मध्ये सर्वाधिक ४९ शतके केली.
  5. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा.
  6. सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक (५१) शतके आहेत
  7. ५ नोव्हेंबर २००९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ च्या डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला.
  8. सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम.
  9. सचिन तेंडुलकर, कसोटी क्रिकेटमध्ये १३००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज.
  10. एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज.
  11. वनडे मध्ये सर्वाधिक सामनावीर.
  12. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३०००० धावा करण्याचा विक्रम.

सचिन तेंडुलकरचे टेस्ट मैच / कसोटी सामने रेकॉर्डस् (Sachin Tendulkar’s Test Match Record list in Marathi)

सचिनने एकूण २०० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झाली आहेत, त्याच्या कसोटी सामन्याच्या कामगिरीचा तपशील खाली दिलेल्या यादीमध्ये दिलेला आहे.

सचिन तेंडुलकरच्या टेस्ट match रेकॉर्डस् ची यादी

इनिंरन रेकॉर्डस्३२९
नॉट आउट३३
फोर रन रेकॉर्ड (4 Run Records)२०५८
सिक्स रन रेकॉर्ड (6 Run Record)६९
सर्वाधिक धावा२४८
सरासरी५३.८१
स्कोरिंग रेट५४.०८
अर्धशतक६८
शतक५१
बेस्ट इनिंग्स१४५
विकेट्स४६
इकोनॉमिक रेट३.५३
बॉल्स४२४०
Sachin Tendulkar’s Test Match Record list in Marathi

सचिन तेंडुलकर चे वनडे मॅच रेकॉर्ड्स (Sachin Tendulkar’s ODI match records)

सचिनने एकूण ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. आणि त्यात सचिनने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली आहेत. त्याच्या एकदिवसीय सामन्याचा विक्रम खालील यादीमध्ये दिलेला आहे.

सचिन तेंडुलकर च्या वनडे मॅच रेकॉर्ड्स ची यादी

इनिंरन रेकॉर्डस्४५२
नॉट आउट४१
फोर रन रेकॉर्ड (4 Run Records)२०१६
सिक्स रन रेकॉर्ड (6 Run Record)१९५
सर्वाधिक धावा२००
सरासरी४४.८३
स्कोरिंग रेट८६.२४
अर्धशतक९६
शतक४९
बेस्ट इनिंग्स२७०
विकेट्स१५४
इकोनॉमिक रेट५.१
बॉल्स६८५०
Sachin Tendulkar’s ODI match records list in Marathi

सचिन तेंडुलकर चे टी -20 मॅच रेकॉर्डस् (Sachin Tendulkar’s T20 match record list in marathi)

सचिनने फक्त १ टी -२० सामना खेळला आहे, या सामन्यात त्याने १० धावा केल्या आणि २ चौकार मारले. त्याच्या टी -२० सामन्याच्या रेकॉर्डची माहिती खालील यादीमध्ये दिली आहे.

सचिन तेंडुलकर च्या टी-२० match च्या रेकॉर्डस् ची यादी

इनिंरन रेकॉर्डस्
नॉट आउट
फोर रन रेकॉर्ड (4 Run Records)
सिक्स रन रेकॉर्ड (6 Run Record)
सर्वाधिक धावा१०
सरासरी१०
स्कोरिंग रेट८३.३३
अर्धशतक
शतक
बेस्ट इनिंग्स
विकेट्स
इकोनॉमिक रेट४.८
बॉल्स१५
Sachin Tendulkar’s T20 match record list in Marathi

सचिन तेंडुलकरचे आयपीएल मॅच रेकॉर्ड (IPL Match Records of Sachin Tendulkar)

सचिनने त्याच्या कारकिर्दीत एकूण ७८ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याच्या IPL करिअर मध्ये सचिनने एकूण २९५ चौकार आणि २९ षटकार ठोकले आहेत. आणि १ शतक आणि १३ अर्धशतके केली आहेत. बाकीच्या IPL रेकॉर्डस् ची यादी पुढे दिली आहे,

सचिन तेंडुलकर च्या आयपीएल मॅच च्या रेकॉर्डस् ची यादी

इनिंरन रेकॉर्डस्७८
नॉट आउट
फोर रन रेकॉर्ड (4 Run Records)२९५
सिक्स रन रेकॉर्ड (6 Run Record)२९
सर्वाधिक धावा१००
सरासरी३३.८३
स्कोरिंग रेट११९.८२
अर्धशतक१३
शतक
बेस्ट इनिंग्स
विकेट्स
इकोनॉमिक रेट९.६७
बॉल्स३६
IPL Match Records list of Sachin Tendulkar in Marathi

सचिन तेंडुलकर ला मिळालेले पुरस्कार (List of awards received by Sachin Tendulkar in Marathi)

सचिनला क्रिकेट विश्वात देवाचा दर्जा देण्यात आला आहे, त्याने अनेक विक्रम मोडले आणि नवे बनवले, शतके आणि द्विशतके केली आणि अनेक वेळा सामनावीराचे विजेतेपद पटकावले. अनेक सामन्यांमध्ये त्याने आपल्या कामगिरीने भारताच्या विजयाचा झेंडा फडकवला आहे. सचिनला अनेक पुरस्कार, पदके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना भारत सरकारने अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील केले आहे. सचिनला मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार खालील यादीत दिले आहेत.

सचिनला मिळालेल्या पुरस्कारांची यादी

सचिन चे पुरस्कार (Awards)वर्ष (Year)
भारतरत्न २०१३
पद्मश्री१९९९
विसडन क्रिकेटर ऑफ़ द इयर१९९७
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार१९९७
पद्मविभूषण२००८
सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी२०१०
विसडन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड२०१०
महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००१
एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड २०१०
आउटस्टैंडिंग अचीवमेंट इन स्पोर्ट्स २०१०
अर्जुन अवार्ड१९९४
ICC ODI टीम ऑफ़ द इयर२००४, २००७,२०१०
कैस्ट्रोल इंडियन क्रिकेटर ऑफ़ द इयर२०११
विसडन इंडिया आउटस्टैंडिंग अचीवमेंट अवार्ड २०१२
वर्ल्ड टेस्ट XI२०११ , २०१० , २०००
पीपल्स चॉईस अवॉर्ड २०१०
बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयर २०११
List of awards received by Sachin Tendulkar in Marathi

सचिन तेंडुलकर चा लुक टेबल (Look Table)

आपणा सर्वांनाच माहित आहे कि सचिन हा क्रिकेट विश्वाचा मेगा स्टार आहे आणि खेळाडूसाठी तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप महत्वाचे आहे. सचिनच्या तंदुरुस्त शरीराबद्दल काही माहिती जसे कि सचिन तेंडुलकर ची उंची, वजन, छाती सर्व काही पुढे टेबलमध्ये दिली आहे.

सचिन तेंडुलकर ची उंची (Height)१६५ सेमी,/ १.६५ मीटर / ५ .५’ फूट
सचिनचे वजन (Weight)६२ kg / १३७ ibc
शारीरिक बांधा (Figure)३९ -३० -१२
डोळ्यांचा रंगगडद भूरा
केसांचा रंगकाळा

सचिन तेंडुलकर ची आवड आणि नावड (Sachin Tendulkar’s likes and dislikes in Marathi)

कोणताही चाहता असो, ते त्यांच्या आवडत्या क्रिकेटर बद्दल किंवा कोणत्याही आवडत्या सेलेब्रिटी बद्दल प्रत्येक माहिती मिळवण्यासाठी उत्सुक असतात. सचिनचे अनेक चाहते आहेत ज्यांना त्याच्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणून, खालील सारणीमध्ये सचिनच्या काही मुख्य पसंद, नापसंद बद्दल माहिती गोळा करून खाली नमूद केलेली आहे.

आवडते जेवणबॉम्बे डक, क्रॅब मसाला, कीमा पराठा, लस्सी, चिंगरी प्रॉन्स, मटन बिर्याणी, मटण करी, बेगन भरता, सुशी
आवडता अभिनेताअमिताभ बच्चन, आमिर खान, नाना पाटेकर
आवडती अभिनेत्रीमाधुरी दीक्षित
आवडते चित्रपटशोले , कमिंग टू अमेरिका
आवडते खेळक्रिकेट, लॉन टेनिस
आवडता रंगनिळा
आवडती जागा (Destination)न्यूझीलंड, मसूरी
आवडते संगीतकारसचिन देव बर्मन , बप्पी लहरी , दीरे स्ट्रेट्स
आवडता गायक (सिंगर)किशोर कुमार, लता मंगेशकर
आवडते गाणेबप्पी लाहिरी यांचे “याद आ रहा है तेरा प्यार” हे गाणे
आवडते रेस्टॉरंटबुखारा , दिल्ली चे मौर्य शेराटन
आवडते हॉटेलहॉटेल पार्क रॉयल डार्लिंग – सिडनी
आवडता खेळाडूजोन मकएनरॉय और रॉजर फेडरर
आवडता परफ्यूमकमे डेस गर्कोंस
आवडते क्रिकेट मैदानसिडनी

सचिन तेंडुलकर च्या काही न ऐकलेल्या गोष्टी (Some unheard things of Sachin Tendulkar)

  1. सचिनच्या वडिलांना संगीताची फार आवड होती, म्हणून त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध संगीतकाराच्या नावावर सचिनचे नाव ठेवले आहे, पण सचिनचा छंद फक्त क्रिकेटमध्ये होता, पण सचिनची मुलगी साराचा आवाज खूप चांगला आहे आणि ती अतिशय सुमधुर संगीत गाते.
  2. प्रसिद्धी मिळण्यापूर्वी त्यांनी वांद्रे पूर्वच्या साथी सहवास सहकारी गृहनिर्माण सोसायटी मध्ये काही काळ घालवला.
  3. सचिनला लहानपणी लॉग टेनिसची खूप आवड होती आणि जोआन मॅकरेनो ला तो आपला आदर्श मानायचा, पण नंतर त्याने क्रिकेटमध्ये आवड निर्माण करून आपली कारकीर्द घडवली.
  4. सचिनचे क्रिकेट गुरू “रमाकांत आचरेकर” होते, त्यांनी सचिनला एक यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली.
  5. आपल्या कारकिर्दीतील जुने दिवस आठवत एका मुलाखतीत सचिनने सांगितले होते की त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे त्याच्या क्रिकेट सरावाच्या वेळी विकेटवर नाणे ठेवत असत. जो कोणी त्यांना आऊट करत असे, हे नाणे त्या खेळाडूला दिले जात असे, अन्यथा ते नाणे स्वतः ठेवून घेत असत. सचिनकडे अशी तेरा नाणी आहेत, जी त्याच्या जीवनाचे अनमोल बक्षीस आहेत, असं तो म्हणतो.
  6. विनोद कांबळी हा सचिन चा शारदा श्रम शाळेत जवळचा मित्र होता, या दोघांच्या क्रिकेटचा प्रवास येथूनच सुरू झाला आणि दोघे या उंचीवर पोहोचले.
  7. सचिनने प्रेमविवाह केला, तो पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता.
  8. सचिनची पत्नी त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे.
  9. ते गणेश जीला आपले देव मानतात आणि ते दरवर्षी त्यांच्या घरात गणपतीची स्थापना करतात आणि ते गणेश चतुर्थीच्या सणाला वर्षातील सर्वात महत्वाचा सण मानतात.
  10. लहानपणी सचिनला वेगवान गोलंदाज व्हायचे होते.
  11. सचिन १९८७ च्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात बॉल बॉय बनला होता.
  12. सचिन ने एकदा पाकिस्तान साठी फिल्डिंग केलेली आहे, होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे, सचिन १९८८ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सामन्यात पाकिस्तानसाठी मैदानात उतरले होते.
  13. पाकिस्तानमधील त्याच्या पहिल्या सामन्यात सचिनने सुनील गावसकरकडून मिळालेला पॅड परिधान केला होता.
  14. .सचिनला झोपेत चालण्याची आणि बोलण्याची सवय आहे.
  15. सचिनला १९९० मध्ये शॅम्पेनची बाटली ही मिळाली होती जेव्हा त्याला सामन्या साठी मॅन ऑफ द मॅच पद मिळाले. पण त्याला ते उघडण्याची परवानगी नव्हती कारण त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते.

सचिन तेंडुलकरशी संबंधित झालेले काही वाद (Some controversies related to Sachin Tendulkar)

  • सचिन तेंडुलकर खूप चांगला गोलंदाज होता, त्याच्या गोलंदाजीची वेगळी पद्धत होती, तो प्रभावी गोलंदाज होता. २००१ मध्ये, जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सामना होता, क्रिकेटपटू सौरव गांगुलीने सचिनवर बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप केला (बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड). यामुळे सचिन खूप दुःखी झाला आणि त्याच्यावर कसोटी सामन्यात बंदी घालण्यात आली. रेफरीला खूप आश्चर्य वाटले, त्यावेळी माईक डेनिस रेफरी होता. बराच वाद झाला आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली, जुनी फुटेज तपासून पाहण्यात आली, त्यानंतर आयसीसीने संपूर्ण प्रकरण ताब्यात घेतले आणि सचिन निर्दोष सिद्ध झाला.
  • सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या खास मित्रांनी आणि नातेवाईकांनी पार्टीची योजना केली, या वाढदिवसाच्या पार्टीत केकवर तिरंग्याची रचना होती. २०१० मध्ये जेव्हा त्याने केक कापला तेव्हा त्याच्यावर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाला होता.
  • सचिनला त्याच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती किंवा त्याच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र नव्हते, यासाठी बीएमसीने त्याला दंड केला, सचिनला हा दंड भरावा लागला आणि प्रकरण संपले.
  • २००२ मध्ये २९ कसोटी शतके पूर्ण केल्याच्या आनंदात सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला फेरारी ३६० स्पोर्ट्स कार भेट दिली. लाच देऊन सचिनने एक कोटीहून अधिकचे आयात शुल्क माफ केल्याचा आरोप होता. यासाठी न्यायालयात खटलाही चालवण्यात आला आणि नंतर ही रक्कम सचिनला द्यावी लागली होती.

निष्कर्ष

पूर्ण जगात क्रिकेट खेळात ख्याती मिळवून महाराष्ट्र राज्याचे आणि संपूर्ण भारताचे नाव लौकिक करणाऱ्या, मराठी मातीत जन्म घेतलेल्या क्रिकेट चा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर बद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. असा खेळाडू पुन्हा होणे नाही. सचिन तुझे क्रिकेट बद्दलचे प्रेम आणि देशासाठी क्रीडा क्षेत्रात घेतलेले तू कष्ट आम्ही कधीच विसरणार नाही.

मित्रांनो जर तुम्हाला आमची हि सचिन तेंडुलकर biography पोस्ट आवडली असेल तर कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, धन्यवाद !!!

Team, 360Marathi.in

हे देखील वाचा,

Leave a Comment

close