शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होत. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते होते. बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाला असून त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे रुग्णालयाने दिवसापूर्वी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांचा घरात पाय घसरल्याने ते जखमी देखील झाले होते आणि त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्याअतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांचे पुत्र अमृत पुरंदरे यांनी सांगितले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या 100 व्या वर्षी पदार्पण केले. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. पांढऱ्या दाढी, घट्ट कोट आणि गळ्यात जॅकेट घातलेले श्रीमंत बळवंत मोरेश्वर आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रांनी हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले.

images 7 -

पुरंदरेंनी आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या सप्तक्षरी मंत्राचे पठण केले. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळील सासवड येथे झाला.

पुण्यातील भारत इतिहास शोधक मंडळातून त्यांनी इतिहास संशोधक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. 2015 पर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील किल्ले आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला.

skzoeoep10 202111720717 -

अशा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या शिवभक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी ६.३१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

Team, 360Marathi.in

Leave a Comment

close