स्त्रियांची ओटी का भरतात ? | ओटी पदरात का घेतात ? | Striyanchi Oti Ka Bhartat ?

Striyanchi Oti Ka Bhartat – भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सौभाग्यवती किंवा सुवासिनी किंवा गर्भिणी स्त्रियांच्या लुगड्याच्या ओच्यात किंंवा साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इ. वस्तू घातल्या जातात यालाच ओटी भरणे असं नामाभिदान प्राप्त.

ओटी भरणे, हे खरं तर गर्भधारणेचे प्रतीकविधान आहे. नवीन लग्न झालेली स्त्री किंवा जी सौभाग्यवती आहे तिची ओटी भरली जाते. त्यातही सासुरवाशीण माहेरी जाऊ लागली म्हणजे तिला फक्त कुंकू लावतात परंतु तिची ओटी भरत नाहीत मात्र माहेरवाशीण सासरी जाऊ लागली म्हणजे तिची ओटी भरतात. ओटी म्हणजे बेंबीखालचे पोट असून या ओटीपोटातच गर्भाशय असते.

गर्भधारण आणि ओटी भरणे यांचा संबंध

गर्भाधानालाही ओटीभरण अशीच संज्ञा प्राप्त झालेली आहे. ओटीत घातलेली फळे, पुष्पे ही संतीतीची सूचक आहेत. तर तांदूळ हे विघ्ननिवारक आहेत. लग्नसमारंभामध्ये अनेक सुवासिनीच्या, सौभाग्यवतींच्या ओटी भरल्या जातात यामध्येसुध्दा विवाहीत वधूला संतानप्राप्ती व्हावी, असाच गर्भित उद्देश या मागे असतो. पहिल्या गर्भारपणात व पाचव्या महिन्यात गर्भिणीची ओटी भरण्याचा सोहळा संपन्न झाला की मग, प्रसूतीपर्यंत गर्भिणीची ओटी भरत नाहीत.

ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा संस्कार असला, तरी शहरातल्या कुटुंबामध्ये ही प्रथा आता कमी होत चालली आहे आणि टेस्ट ट्युब बेबीच्या काळात या संस्काराला किती महत्त्व असेल हे त्याच कुटुंबाला माहीत..!

ओटी घेताना सुवासिनी पुढच्या पदराच्या ओट्यातच का घ्यावी ?

मोठ्या पदराच्या ओट्यात खुप काहि मावतं. परमेश्वर द्यायला उभा आहे तर मागायला संकोच कशाला ? अमाप दे! उदंड दे! ओटी भर भरून दे! पुढचा पदर पसरूंन मागावं”ओट्यात पडतं! घरची गृह लक्ष्मी म्हणजे गृहिणी घरातील सर्व माणसाचे अपराध ओट्यात घेते. म्हणून घराला घरपण येते. ती क्षमा करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करते, सन्मार्गला लावते. चुकलं सावरलं तरी सुधारणा करते, असं सांगणारी सुवासिनी आपल्या ओट्यात सगळं माप घेते. दिलेलं दान सुरक्षित राहतं.

साड़ी-चोळी-खण – नारळ -गहु-तांदूळ यानी सुवासिनीच्या ओटीला मान-सन्मानाने शोभा आणतात. ओटी पोटीजवळ साडीचा ओटा येतो. पोटात मावतं ते ओटित मावतं! मंगल प्रसंगी, हळद कुंकु, समारंभ, सणासुदीच्या वेळी, लग्न समारंभात सुवासिनी ओटी नारळ -सुपारी – फळं घेऊन गव्हाने भरतात. स्रियांच्या पोटात गर्भा शय असते. म्हणून गर्भा धारण संस्काराच्या वेळीही ओटी भरतात.

म्हणून त्याला ओटी भरण्याचा विधि असेही म्हणतात. गरोदरपणी पाच फळानीओटी भरतात. ओटी भरणे हा संतति सूचक कुलाचार आहे. साडीच्या पदरानेच पोट झाकले जाते. संततीला नीट सांभाळले जाते. ओटी म्हणजे ओट्यात घेणे. म्हणुन सुवासिनी पुढच्या पदरात ओटी घेतात…!!

Team 360Marathi

Leave a Comment

close