झक्कास आयडियासोबत साजरा करा तुमचा वाढदिवस

दर वाढदिवसाला नेहमीप्रमाणे केक कापायचा, मित्रांना बर्थडे पार्टी द्यायची, आईकडून औक्षण करून घ्यायचं आणि सगळ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi स्वीकारायच्या हे तर आलंच. पण जर यंदाच्या वाढदिवसाला तुम्हाला काहीतरी हटके प्लॅन करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास आणि झक्कास आयडियाज घेऊन आलो आहे. वाचा आणि होऊ द्या तुमच्या वाढदिवसाची हवा. 

– दुपारी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये जायचं हे तर नेहमीचंच आहे. काही जण तर दुपारी मित्रमैत्रिणीसोबत तर रात्री घरच्यांसोबत हॉटेलला जातात. एकाच दिवशी बाहेरच इतकं खाऊन बोअर होतं की राव. मग मस्तपैकी घरच्या घरीच करा ना खास ब्रंच पार्टी. सगळे जमतील आणि फुल्ल धमाल येईल. 

– जर ब्रंच पार्टी शक्य नसेल तर हरकत नाही. पॉटलक लंच ठेवा. पॉटलक लंच म्हणजे बाकी नाही आपली डब्बा पार्टी हो. सगळ्यांना तुमच्या आवडीच्या डिशेस बनवून आणायला किंवा घेऊन यायला सांगा. एका ठिकाणी एकत्र या आणि त्यावर ताव मारा.

– आपल्या घरी किंवा हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वाढदिवसाच्या दिवशी मस्त थीम पार्कला भेट द्या. मग ते मित्रांसोबत असो वा फॅमिलीसोबत. आपल्या आसपास इमॅजिका आणि एस्सेल वर्डसारखी अनेक थीम पार्क्स आहेत. हाच दिवस आहे तिथे भेट देऊन अविस्मरणीय करण्याचा. 

– ऑफिस किंवा अभ्यासामुळे तुम्हाला बरेच दिवसात आवडते चित्रपट पाहायला मिळाले नसतील तर वाढदिवस आहे ना. मस्तपैकी मित्रमंडळीसोबत घरच्या घरी मूव्ही मॅरेथॉन प्लॅन करा. हातात पॉपकॉर्न घ्या आणि फुल्ल एन्जॉय करा. 

– वाढदिवस म्हटल्यावर फोटो तर काढणारच ना. पण यंदा जरा वेगळे काहीतरी म्हणजे सेल्फी पार्टी करा. सर्वांना सेल्फीसाठी वेगवेगळ्या आयडिया द्यायला सांगा आणि मग होऊ दे रात्रभर सेल्फी पार्टी. छान आठवणीही यानिमित्ताने तुमच्याकडे जमा होतील. 

-आजपर्यंत जर तुम्ही मित्रमंडळींसोबत रोड ट्रीपला गेला नसाल तर हाच तो दिवस आहे घरच्यांना राजी करण्याचा. अचानक भयानक फ्रेंड्ससोबत रोड ट्रीपवर जाऊन या. कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा है ना. 

-स्लंबर पार्टीबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? तसंही रात्री 12 वाजता केक घेऊन फ्रेंड्स येतातच. मग येताना त्यांना नाईट सूट्स किंवा पजामा घालून यायला सांगा. पजामा पार्टी म्हणजेच स्लंबर पार्टी. खा, पिओ आणि वाढदिवस सेलिब्रेट करो. 

-जर तुम्हाला वाढदिवस एकदमच हटके साजरा करायचा असेल तर थीम पार्टी ठेवा. हो कारण काही वाढदिवस हे खूपच खास असतात. मग सर्व फ्रेंड्सना पार्टी थीमप्रमाणे तयार होऊन यायला सांगा. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी एवढं तर ते करतीलच. 

रोड ट्रीप शक्य नसेल तर नो प्रोब्लेम. वाढदिवसाच्या वेळी वीकेंड असेल तर निकल पडो माथेरान किंवा अलिबागला. मस्तपैकी वीकेंड आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत घालवा. 

-जर तुम्हाला अनोळखी ठिकाणी किंवा लांब जायचं नसेल आणि आपल्या फ्रेंड्सना स्वतःच्या फार्महाऊसवर न्यायचं असेल तर बेस्टच आहे. जगात भारी फार्म हाऊस पार्टी करा आणि दंगा घाला. आपलंच फार्म हाऊस आहे म्हटल्यावर काय प्रोब्लेम नाही का. 

-वरील सगळ्या कल्पना जुन्या वाटत असतील तर ही तुम्हाला नक्कीच आवडेल. वाढदिवसाच्या दिवशी असं एखादं अॅडव्हेंचर प्लॅन करा जे तुम्ही आधी केलं नसेल. मग ते बंजी जंपिग असो वा पॅरासेलिंग असो.

-बार्बेक्यूची सध्या जोरदार हवा आहे आणि थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात बार्बेक्यूची मजा काही औरच असते नाही का. मग वाढदिवसाच्या निमित्ताने जरूर करा बार्बेक्यू पार्टी

जर तुम्हाला वरील कोणत्याच गोष्टी करण्यात रस नसेल तर दोन सोपे पर्याय आहेत. एक म्हणजे मस्तपैकी सुट्टी टाका आणि ताणून द्या. नाहीतर वाढदिवसाच्या दिवशी होऊ दे खर्च. करा मनसोक्त शॉपिंग. वाढदिवस असल्यामुळे कोणी ओरडणारही नाही आणि मनसोक्त शॉपिंग पण करता येईल.

Team, 360Marathi.in

Leave a Comment

close