मोबाइलचे मनोगत निबंध मराठी | मोबाइलची आत्मकथा निबंध मराठी | Mobile Che Manogat Essay in Marathi

मोबाइलचे मनोगत मराठी निबंध (Mobile Che Manogat Essay in Marathi )  : आज इथे आम्ही मोबाइलचे मनोगत / आत्मकथा या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत .हा निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकतो .

मी सादर करीत असलेला निबंध हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात.

मोबाइलचे मनोगत / आत्मकथा निबंधांचे सर्व शीर्षक ज्यांसाठी हा निबंध अनुकूल असेल

  • Mobile chi atmakatha in marathi
  • मोबाईल निबंध मराठी
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • मोबाईल तुमच्याशी बोलतोय मराठी निबंध
  • मोबाईल चे दुष्परिणाम निबंध मराठी
  • Mobile Che Manogat Essay In Marathi

मोबाइलचे मनोगत निबंध मराठी | मोबाइलची आत्मकथा निबंध मराठी ( 1०० शब्दांत )

हॅलो, हो मीच तुमचा प्रिय मोबाईल

तुम्ही तर मला ओळखतच असाल कारण आजकाल तर माझ्याशिवाय तुमचं जीवन तर अपूर्णच असं म्हणायला काय हरकत नाही

खूप लोक माझ्या वापर सतत करत असता, पण तुम्हाला माझ्या बद्दल काही माहिती आहे का?

निदान मला मराठीत ‘भ्रमणध्वनी’ म्हणतात हे तरी माहिती आहे ना ? हसू नका हं माझ्या मराठीतील नावाला.

माझ्या जन्म ह्या जगात प्रथम मोटोरोला या कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्ती मुले झाला तेही 1976 साली व भारतात मी प्रथम आलो ते 1995 साली.

जेव्हा मला सुरवातीला बनवलं गेलं तेव्हा मला खूप बटन होती पण जस जस काळ बदलत गेला तसा मी सुद्धा बदलत गेलो

आणि आज मी पूर्ण स्क्रीनटच झालो आहे आणि पूर्ण चक्क चमकतो

मोबाइलचे मनोगत निबंध मराठी | मोबाइलची आत्मकथा निबंध मराठी ( 2०० शब्दांत )

नमस्कार मी मोबाईल

मला येवून फक्त 20-25 वर्षे झाली असतील,

माझ्या स्क्रिनवर तुम्ही नुसता टच केलात की हव्या त्या व्यक्तीशी संपर्क करु शकता व संदेश ही पाठवू शकता

.आज अब्जावधी लोक माझा वापर करतायत, कारण मी फक्त संपर्क करु शकतो; एवढाच माझा मर्यादित वापर नाही तर तळहाता एवढ्या माझ्या जादुई पेटीत खुप खजिना भरलाय. इंटरनेट, रेडिओ, गाणी, बातम्या , कँलक्युलेटर, घड्याळ, जीपीएस्, कँमेरा… सर्वात आवडती व वेड लावणारी गोष्ट माझ्यात आहे ती म्हणजे ‘ सेल्फी ‘ होय.

ह्या सेल्फीने सर्व जगाला वेड करुन टाकलय. पण सेल्फी काढता काढता तुम्ही मात्र ‘सेल्फीश’ कधी झालात हे तुम्हाला ही कळले नाही. हो ना?

मोबाईल वर होणारे आरोप : काही लोक म्हणतात कि मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.

होय हे पण खरं आहे कि, माझा उपयोग तुम्हाला खुप होत असला तरी माझा तुम्ही जो अति वापर करताय त्यामुळे तुम्हाला दारु पेक्षा ही महाभयंकर व्यसन लागले आहे..

म्हणतात ना शेवटी अति तेथे मातीच. डोळ्यांचे विकार, मानदुखी व इतरही अनेक दुष्परिणाम अनेकांना झाले आहेत.

तुम्ही माझ्यात इतका गुंग झालाय की आपल्या आजुबाजूच्या माणसांचा ही त्याला विसर पडू लागलाय.

कुटुंबातील कोणत्याच व्यक्तिला ह्या मोबाईलमुळे एकमेकांशी बोलायलापण वेळ नसतो.

आणि मी तर असेही ऐकलय की माझ्यामुळे कित्येक घटस्फोटही झालेत.

म्हणूनच मी विनंती करतो, “हे मानवा Technology च्या इतका आहारी जाऊ नकोस.

हि टेक्नॉलॉजि हे विज्ञान फक्त तुझ्या सोयीसाठी आहे, पण सुख मात्र तुला तुझे प्रियजणच देणार आहेत हे लक्षात ठेव

तेव्हा माझा वापर ही गरजे पुरताच करावास असच मला वाटतय. जगात कितीही Technology आली, तरी माणूस माणसामुळेच सुखी होतो हे लक्षात ठेव.

मोबाइल चे मनोगत निबंध/ आत्मकथा ( २०० ते १००० शब्दांत ) | Mobile Che Manogat Essay in Marathi

मोबाइल चे मनोगत / आत्मकथा ( 2००-1000 शब्दांत )

हॅलो मी मोबाईल बोलतोय

ओळखलं ना ! का नाही ओळखणार आज जवळ जवळ सगळेच मला वापरतात,हे जग माझ्याविना जस अपूर्णच आहे..

माझा दर्जा सुद्धा हवा पाणी इतकाच महत्वाचा आज झाला आहे

जेव्हा मी जन्मलो नव्हतो तेव्हा लोकांना खूप अडचणी यायच्या ते लवकर नातेवाईकांन सोबत बोलू शकत नव्हते, ते पत्र लिहायचे आणि ते पोहचायला ४-५ दिवस लागायचे

पण माझ्या जन्मा नंतर माझा लोकांना खूप फायदा झाला, ते माझा उपयोग आता संपर्क करण्यासाठी करतात, मनोरंजन करण्यासाठी करतात, एवढेच नव्हे तर सेल्फी साठी तर भरपूरच करतात

माझ्या मुळे तुम्ही फक्त लोकांशी बोलूच नाही तर विडिओ कॉल द्वारे पाहू सुद्धा शकतात आणि याची मजाच वेगळी आहे

आज मी खूप आनंदी आहे, माझे नजर जिथे जिथे जात आहेत, तिथे सगळी कडे माझ्या कुटुंबाची भरभराट होत आहे.

गाव किंवा शहर, गरीब किंवा श्रीमंत, मुले किंवा म्हातारे, महिला किंवा पुरुष, निरोगी किंवा आरोग्यासाठी प्रत्येकाला मी आवश्यक आहे. आणि प्रत्येकजण मला इच्छित आहे. मी फक्त एक छंदच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक असलेला मोबाइल बनलो आहे.

हे पण वाचा :

1 thought on “मोबाइलचे मनोगत निबंध मराठी | मोबाइलची आत्मकथा निबंध मराठी | Mobile Che Manogat Essay in Marathi”

Leave a Comment

close