राज्यात १ मे पासून लसीकरण होणार नाही? | Health Minister Rajesh Tope Press Conference Today 28 April 2021 | Maharashtra Cabinet Meeting Today 28 April 2021

Maharashtra Cabinet Meeting Today 28 April 2021 | Health Minister Rajesh Tope Press Conference Today 28 April 2021 काही दिवसांपूर्वी राज्यात १ मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होत असून १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण होणार असे जाहीर केले आहे. मात्र आज २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर लसच नसेल तर लसीकरण कसे होणार? असे आरोग्यमंत्रींनी वक्त्यव केले आहे. म्हणून राज्यात १ मे पासून लसीकरण होणार नाही का? अशी चिंता आता सर्वत्र पसरली आहे.

लसच नसेल तर लसीकरण कसे होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वाना लस द्यायचा आमचा प्रयत्न असला तरी लसच नसेल तर लसीकरण कसे होणार ? राज्यातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी लसी आयात करण्याचा आमचा विचार आहे. लसींचे योग्य वितरण झाल्यास व्यापक लसीकरण करता येईल, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी झाली असून लसीकरणात दीड कोटींचा टप्पा राज्यानं गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Cabinet Meeting Today 28 April 2021 | Health Minister Rajesh Tope Press Conference Today 28 April 2021

Coronavirus Vaccine | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लसीकरण: Health Minister Rajesh Tope Press Conference Today 28 April २०२१/ Maharashtra Cabinet Meeting Today 28 April २०२१

मोफत लसीकरणाचा अहवाल आरोग्य विभागानं कॅबिनेटला दिला आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लसीकरणाचा निर्णय आधीच जाहीर करणं योग्य नाही, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

कोविड लसीची लेटेस्ट अपडेट्स/ Latest vaccine updates | सामान्य माणसाच्या मनातले लसीबद्दलचे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं

“एखाद्या नागरिकाला फक्त शासकीय संचालित केंद्रांवर विनामूल्य लस दिली जाईल. नागरिकांना खासगी केंद्रांवर लस घेण्यासाठी मात्र पैसे देण्याची गरज भासणार आहे,” ते पुढे म्हणाले.

१ मे नंतरही महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कॅबिनेट बैठकीत पुढील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आहे. तरी हा लॉकडाऊन कधीपर्यंत वाढवण्यात येईल याचा तपशील अजून जाहीर झालेला नाही. तरी लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात यावा असे राजेश टोपे यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले. यामुळे राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन वाढू शकते.

त्यात म्हटले आहे की, कोविड -१९ लसच्या ५ लाख डोस पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात पोहचण्यासाठी तयारीमध्ये आहेत. महाराष्ट्रात लसींची मागणी वाढत आहे. २७ एप्रिलपर्यंत राज्यातील एकूण प्रकरणांची संख्या, ४४ लाख १० हजार ८५ इतकी होती तर मृत्यूंची संख्या, ६६.१९ असल्याचे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात ७ लाख २२ हजार ४३४ सक्रिय प्रकरणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांतील अनेकांना विविध सुविधांवर लसींचा तुटवडा लागल्याने लस टोचता आली नाही.

या अहवालानुसार, महाराष्ट्र आरोग्य विभागाने असे म्हटले आहे की, राज्यात केवळ १ करोड ५३ लाख ३७ हजार ८३२ लोकांना लस भेटली आहे आणि त्यामध्ये २५ लाख १५ हजार ७६ मुंबई मधील लोकांचा समावेश आहे.


आमच्या इतर पोस्ट् देखील वाचा……

Leave a Comment

close