खो खो खेळाची माहिती | Kho Kho information in marathi

Topics

मित्रांनो, भारताचा असा कोणता पारंपारिक खेळ आहे ज्यामध्ये सहकार्य, भक्ती, उत्सुकता, स्वाभिमान, वेग आणि द्रुत विचार यासारख्या गुणांचा समावेश आहे? त्याचे उत्तर आहे खो-खो! हा पारंपारिक भारतीय खेळ हा खेळापेक्षा सुद्धा अधिक आहे. खो खो हा खेळ भारताचा लोकप्रिय खेळ जरी असला तरीही आपल्या महाराष्ट्र राज्यातून या खेळाची उत्पत्ती झाल्याचे इतिहास पुरावे सांगतात. खो खो खेळ त्या व्यक्तींसाठी आहे ज्या व्यक्तीला आव्हान स्वीकारणे आवडते, आणि त्याच्यासाठी हे वैयक्तिक विकासाचे साधन आहे. कोणीही स्पष्टपणे सांगू शकतो, खो-खो गेम हा एक स्वस्त पण अत्यंत आनंददायक खेळ आहे.

हा देशातील सर्वात लोकप्रिय पारंपारिक खेळांपैकी एक आहे. खेळाबद्दल काही मनोरंजक तथ्ये: खेळाडूंच्या बसण्याच्या जागा यादृच्छिक असतात; खेळाच्या सुरूवातीला, खेळाडूंचा समान क्रम त्याच क्रमाने बसलेला आढळणार नाही. खेळासाठी प्रचंड सहनशक्ती आणि वेग आवश्यक आहे. भारतामध्ये अनेक प्रसिद्ध खो-खो खेळाडू आहेत ज्यांनी खेळाला दुसऱ्या स्तरावर नेले आहे. अशा या सुंदर मैदानी खेळ खो खो ची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण खो खो खेळाची माहिती : फायदे, कौशल्य, नियम, खो खो मैदानाची माहिती, खो खो खेळाचे पुरस्कार इत्यादी अशा सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत.

चला तर मग सुरु करूया, Kho Kho information in marathi

खो खो खेळाची माहिती मराठी (Kho Kho information in marathi)

खेळाचे नाव खो खो
खेळाचा प्रकारमैदानी खेळ
खेळातील खेळाडूंची संख्यामैदानात खेळणारे ९ आणि राखीव ३ असे एकूण १२ खेळाडू
खो खो च्या क्षेत्रातील डाव 2 डाव (4 वेळा)
चौरसांची संख्या 8
चौरसात बसणारे खेळाडूअनुधावक
पकडणारा खेळाडूसक्रिय अनुधावक
खो-खो मैदानाचा आकारआयताकृती
खो-खो मैदानाची लांबी२९ मीटर
खो-खो मैदानाची रुंदी१६ मीटर
एका खेळासाठी दिलेला वेळ४० मिनटे

खो खो खेळाचा इतिहास (History of Kho Kho In Marathi)

खो-खोचे मूळ शोधणे कठीण आहे, परंतु अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे ‘पकडा-पकडी’ खेळाचे चे सुधारित रूप आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, खो खो हा शब्द संस्कृत “स्यु (syu)” या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ ‘उठ आणि जा’ असा होतो . भारतातील खो-खोचा इतिहास खूप खोल आहे, तो प्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झाला आणि मराठी भाषिक लोकांमध्ये खो-खो खूप लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्रात त्याच्या उत्पत्तीसह, खो-खो प्राचीन काळी रथांमध्ये खेळला जात होता आणि त्याला रथेरा म्हणून ओळखले जात असे.

पूर्वी खो-खो मध्ये कोणतेही नियम नव्हते, पहिला नियम पुण्यातील डेक्कन जिमखान्याचे संस्थापक लोकमान्य टिळक यांनी बनवला होता, म्हणूनच वर्ष १९१४ मध्ये, या खेळाचे सुरुवातीचे नियम डेक्कन जिमखाना, पुणे यांनी सादर केले. या खेळाशी संबंधित साहित्य महाराष्ट्र शारीरिक शिक्षण समितीने अनुक्रमे १९३५, १९३८, १९४३ आणि १९४९ या वर्षांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत प्रकाशित करून प्रसारित केले.

नंतर १९४९ मध्ये स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये पहिल्यांदा हा खो खो खेळ खेळण्यात आला. भारतात प्रथमच, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (K.K.F.I.) ची स्थापना १९५६ मध्ये करण्यात आली. आणि खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया च्या स्थापनेनंतर १९५९-६० मध्ये आंध्र प्रदेशच्या विजयवाड़ा येथे पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली. आणि १९८२ मध्ये पहिल्यांदा खो-खोचा आशियाई क्रीडा स्पर्धेत डेमो म्हणून समावेश करण्यात आला.

यावेळी खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (K.K.F.I.) ने फेडरेशन कपच्या स्वरूपात चॅम्पियनशिप आयोजित केली. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी ‘इंटरनॅशनल खो-खो फेडरेशन’ ची स्थापना करण्यात आली.

खो खो खेळ कसा खेळतात? (How To Play Kho-Kho In Marathi)

चला समजून घेऊया, नेमकं हा खो खो कसा खेळला जातो?

खो-खो चा सामना दोन संघांमध्ये खेळला जातो. एक संघांमधील सगळे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून आखलेल्या रेषेवर ठराविक अंतरावर बसतात आणि दुसर्या संघातील एक खेळाडू पळत असतो ज्याला विरुद्ध संघाला म्हणजे खाली बसलेले खेळाडूना याला पकडायचे असते. खो खो खेळात प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात आणि त्यापैकी ९ खेळाडू खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतात आणि बाकीचे ३ हे राखीव असतात. प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी सात मिनिटे दिली जातात आणि नियमित वेळेत त्या संघाला आपला डाव संपवावा लागतो.

Kho-Kho Khel kasa Kheltat? हे सोप्प्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण एक काम करूया, खाली बसलेली टिम ला “team A” आणि धावणाऱ्या टिमला “TEAM B” असे नाव देऊ.

NOTE – आता आधी हे समजून घ्या कि खाली बसलेल्या खेळाडूंना म्हणजेच टिम A ला विरुद्ध टिम च्या खेळाडूंना म्हणजेच टिम B ला धावून पकडायचे असते, हे करत असतांना खाली बसलेली टिम म्हणजेच टिम A मधली रेषा म्हणजेच खाली बसलेल्या खेळाडूंच्या मध्ये असलेल्या जागेतून क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही, असे केल्यास फाऊल पकडला जाईल. परंतु धावणारी टिम म्हणजेच टिम B स्वतःचा बचाव करताना खाली बसलेल्या टिम च्या मधल्या जागेतून क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाऊ शकते.

खो खो खेळण्याची पद्धत (Kho-Kho Khel kasa Kheltat?)

 1. खेळ सुरु करताना दोन्ही संघातील एक एक खेळाडू उभा राहतो आणि शिट्टी वाजताच पाठलाग करणाऱ्या संघाचा खेळाडू म्हणजेच टिम A हि विरोधी पक्षाच्या खेळाडूला म्हणजेच टिम B ला पकडण्यासाठी धावते.
 2. त्याचवेळी टिम B चा धावणारा खेळाडू पंक्तीत बसलेल्या खेळाडूंची धावत धावत गोल गोल फेरी मारतो, आणि जर पाठलाग करणारा खेळाडू पळणाऱ्या खेळाडूच्या जवळ आला, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी तो खाली बसलेल्या खेळाडूंच्या मधून जाऊन दुसऱ्या बाजूला जातो,
 3. अशातच टिम A च्या पाठलाग करणाऱ्या खेळाडूला पटकन आपल्या दुसऱ्या खाली बसलेल्या खेळाडूच्या पाठीमागे जाऊन त्याला पाठीवर थाप मारून ‘खो’ शब्द जोरात म्हणून त्याला उठण्याचा संकेत द्यावा लागतो आणि स्वतः त्याच्या जागेवर बसून घेतो.
 4. कारण दुसरा खेळाडू हा विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला असतो ज्या दिशेला धावणारा खेळाडू गेलेला असतो.
 5. आणि जर टिम A ने टिम B च्या धावणाऱ्या खेळाडूला पकडले तर तो खेळाडू OUT होतो.

अशा रीतीने हा खो खो खेळला जातो.

खो खो खेळाची माहिती

खो खो खेळाचे मैदान माहिती (Kho Kho playground information in Marathi)

मित्रांनो खो खो आपण लहानपणी कुठेपण खेळून घ्यायचो. पटकन सगळे मित्र मंडळी जमा व्हायचे आणि जिथे जागा मिळेल खेळायला तिथे खेळ चालू होऊन जायचा, बरोबर ना ! परंतु जेव्हा हा खेळ आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाऊ लागला किंवा या खो खो ला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला मान्यता देण्यात आली तेव्हा त्यासाठी अनेक नियम, अटी घालून देण्यात आल्या जेणेकरून एक शिस्तबद्ध पद्धतीने हा खेळ खेळला जाऊ शकेल. खो खो चे नियम आपण पुढे सविस्तर बघणार आहोत.

खेळण्या आधी त्या खेळासाठी लागणारी जागा येते. मग आता खो खो खेळासाठी लागणारे मैदान सुद्धा अगदी विचार विनिमय करून आखले गेले आहे. खो खो खेळाच्या क्रिडांगणाची लांबी व रुंदी किती आहे? खो खो मैदानाची वैशिष्ट्ये काय? खो-खो मैदान माप

चला तर खो खो खेळाच्या मैदानाची सविस्तर माहिती बघूया,

खो खो खेळाची माहिती (Kho Kho Play Ground marathi information)

खो खो मैदानाच्या मोजमापाबद्दल बोलायचे झाले तर,

 1. खो खो खेळाच्या क्रिडांगणाची लांबी व रुंदी – खो खो खेळाचे मैदान हे २९ मीटर लांब आणि १६ मीटर रुंद असते.
 2. आयतच्या लांब बाजूच्या प्रत्येक टोकाला दोन छोटे आयताकृती विभाग असतात ज्यांची लांबी १६ मी आणि रुंदी २.७५ मीटर असते.
 3. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला असलेले लहान आयताच्या रेषेच्या आतील मध्यभागी १.२० मीटर लांब लाकडी खांब ठेवला आहे. हा लाकडी खांब मैदानाच्या दोन्ही बाजूला असतो.
 4. लाकडी खांबाचा घेर हा ३० ते ४० सेमी दरम्यान बदलतो.
 5. खांबाच्या दोन्ही बाजूला सरळ रेषा आहे. जिला आपण लेन सुद्धा बोलू शकतो. त्या लेन ची लांबी २४ मीटर बाय ३० सेमी रुंदी अशी आहे
 6. या दोन लाकडी खांबामध्ये समांतर रेषांच्या अशा ८ जोड्या आहेत.
 7. ओळींची प्रत्येक जोडी एकमेकांपासून ३० सेमी आणि पुढील जोडीपासून २.३० से.मी. अंतरावर आहेत.
 8. उपकरणांबद्दल बोलताना, गेममध्ये परिणाम लिहिण्यासाठी दोन घड्याळे, एक शिट्टी, एक मोजमाप टेप, बोरिक पावडर आणि स्टेशनरी आवश्यक आहे.

खो खो खेळातील महत्वाची शब्दावली (Terminology Of Kho Kho Game In Marathi)

प्रत्येक खेळात असे काही शब्द किंवा त्या खेळ बद्दलच्या terms असतात ज्यांच्या आधारे तो खेळ चालत असतो. तसेच खो खो खेळात सुद्धा असे काही मुद्दे आहेत जे समजून घेणे अत्यन्त महत्वाचे आहे.

 1. क्रॉस-लेन / Cross- Lane :- प्रत्येक आयताची लांबी १६ मीटर आणि रुंदी ३० सेमी आहे. हे मध्य रेषा काटकोनात म्हणजेच ९० अंशांना एकमेकांना भेटते. ते स्वतःही दोन अर्ध्या भागात विभागले गेले आहे. क्रॉस-लेनच्या छेदनबिंदूवर तयार झालेल्या ३० सेमी × ३० सेमीच्या क्षेत्राला चौरस म्हणतात.
 2. सेंट्रल लेन / Central Lane :- एक पोल पासून दुसऱ्या पोल मधल्या दोन समांतर रेषा.
 3. लॉबी / Lobby :- खेळाच्या मैदानाभोवती मोकळी जागा.
 4. मुक्त क्षेत्र / Free Zone :- ध्रुव रेषांच्या बाजूचे क्षेत्र ज्यामध्ये दिशा नियम पाळला जात नाही आणि धावपटू कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.
 5. अनुधावक किंवा चेजर / Chaser :- चौकात बसलेल्या खेळाडूंना Chasers किंवा चेझर्स म्हणतात. आणि जो विरोधी खेळाडूंना स्पर्श करण्यासाठी धावतो त्याला ऍक्टिव्ह चेझर म्हणतात.
 6. रनर / Runner :- चेजर च्या विरोधी खेळाडूला रनर म्हणतात.
 7. खो देने / To Give Kho :- एक चांगला ‘खो’ देण्यासाठी, सक्रिय चेझर (Active Chaser) ने मोठ्या आवाजात ‘खो’ शब्द म्हणताना चेझरला त्याच्या पाठीशी स्पर्श केला पाहिजे. हात ठेवण्याची आणि ‘खो’ म्हणण्याची कृती एकत्र केली पाहिजे.
 8. लेट खो / LATE KHO :- जेव्हा ऍक्टिव्ह चेजर दुसऱ्याला खो देताना स्पर्श करण्यात थोडा लेट होतो किंवा वेळ लावतो तेव्हा त्याला लेट खो म्हणतात, जो एक प्रकारचा फाऊल आहे.
 9. लाईन कट / LINE CUT :- रनर चा पाठलाग करताना चेजर ने जर सेंटर लाईन कट केली तर त्याला लाईन कट म्हणतात.
 10. Early getup/लवकर उठणे :- जेव्हा खो बसण्यापूर्वी बसलेला चेजर उठून जातो तेव्हा त्याला म्हणतात
 11. फाउल / Foul :-बसलेला चेझर किंवा ऍक्टिव्ह चेझर नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याला फाऊल म्हणतात.
 12. Minus-Kho / मायनस खो :- दिशात्मक दोषाचे उल्लंघन ज्यामध्ये पाठलाग केल्याने धावपटूला बाहेर काढता येत नाही जोपर्यंत खो दोन सहकाऱ्यांना परत पाठवला जात नाही किंवा खांबाला स्पर्श केला जात नाही.
 13. दिशा बदलणे / Taking Direction :- जेव्हा ऍक्टिव्ह चेझर एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जातो तेव्हा त्याला दिशा ग्रहण करणे / दिशा बदलणे म्हणतात. जेव्हा ऍक्टिव्ह चेझ नियमांच्या विरुद्ध चुकीच्या दिशेने जातो.
 14. चेहरा फिरवणे / To Turn the Face :- जर सक्रिय पाठक विशिष्ट दिशेने जाताना त्याच्या खांद्याच्या रेषेला ९० डिग्री अंशांपेक्षा जास्त कोनात वळवतो, तर त्याला चेहेरा फिरवणे म्हणतात आणि हा एक फाऊल आहे.
 15. पाय बाहेर येणे / Foot-Out :- जर धावपटूचे दोन्ही पाय सीमा रेषेच्या बाहेर स्पर्श करत असतील, तर त्याला पाय बाहेर(फुट आऊट) मानले जाते.
 16. लोना / Lona :- जेव्हा सर्व धावपटू ९ मिनिटांत आउट होतात, तेव्हा chasers कडून रनर्स च्या विरोधात लोना मिळवला जातो. परंतु लोनाला कोणतेही अधिक गुण नाहीत.
kabddi ground information -

खो खो खेळाचे नियम (Rules Of Kho-Kho Game In Marathi)

असा कोणताच खेळ नाही ज्यात नियम नसतात, आणि नियम व अटी असल्याशिवाय खेळ खेळण्यात मजा सुद्धा येत नाही. खेळात नियम असल्याने प्रत्येक खेळाडू प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो, आणि हरण्याची भीती आणि जिंकण्याचा आनंद या दोन्ही गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा नियमांची चौकट आखलेली असते.

मग आता खो खो सारखा मैदानी खेळ असल्यावर त्यात नियम असलेच पाहिजे. आणि खेळात रोमांच वाढवणारे हे नियम खो खो खेळात आहेत.

खो खो खेळाचे महत्वाचे २० नियम पुढील प्रमाणे :-

 1. चेझर किंवा रनर बनण्याचा निर्णय टॉसद्वारे घेतला जातो.
 2. एक्टिव चेजर च्या शरीराचा कोणताही भाग सेंटर लाइन ला लगयला नाही पाहिजे. अस झाल्यास फाउल पकड़ला जाईल.
 3. जर ऍक्टिव्ह चेझरने धावणाऱ्या खेळाडूला हाताने स्पर्श केला तर तो रनआऊट मानला जातो.
 4. ऍक्टिव्ह चेजर हा खाली बसलेल्या चेजर ला पाठीमागूनच खो देऊ शकतो.
 5. खो देताना पाठीवर थाप मारून खो म्हणावे लागते.
 6. पाठीवर थाप आणि खो आवाज या दोन्ही क्रिया एका वेळेसच व्हायला हवे.
 7. आधी खो म्हणून नंतर पाठीवर थाप मारल्यास लेट खो पकडला जाईल.
 8. आधी थाप मारून नंतर खो म्हटल्यास सुद्धा फाऊल पकडला जाईल.
 9. जो पर्यंत ऍक्टिव्ह चेजर खाली बसलेल्या चेजर ला खो देत नाही तोपर्यंत त्याला जागेवर उठता येत नाही.
 10. ऍक्टिव्ह चेजर ने खो दिल्या नंतरच तो चेजर च्या जागेवर बसू शकतो.
 11. ऍक्टिव्ह चेजर चा चेहरा हा तो पळतोय त्याच दिशेला असावा नाहीतर turn face चा फाऊल पकडला जातो.
 12. खो मिळाल्यावर चेजर त्याच दिशेला जाऊ शकतो जी दिशा त्याने आपल्या जागेवरून उठल्यावर लगेच ग्रहण केली आहे, म्हणजे तो reverse नाही येऊ शकत.
 13. चेजर आपल्या जागेवर आशा पद्धतीने बसलेला पाहिजे ज्यामुळे runner ला पळतांना कसलिहि अड़चन येणार नाही, आणि जर चेजर मुले रनर out झाला तर तो आउट नहीं मानला जात.
 14. एक्टिव चेजर ला पोल लाइन पार करने गरजचे असते.
 15. सर्व चेजर एकमेकांना विरुद्ध तोंड करून बसलेले हवे.
 16. बसलेला चेझर किंवा ऍक्टिव्ह चेझरने कोणतेही उल्लंघन केले तर ते फाऊल मानले जाते.
 17. एका दिशेने पळतांना ऍक्टिव्ह चेझरने त्याच्या खांद्याची रेषा ९० degree अंशांपेक्षा जास्त कोनात वळवली तर ते फाऊल मानले जाते. (९० डिग्री म्हणजे काटकोन. म्हणजे असं समजा कि पूर्वेकडे पळत असतांना फार त फार तुम्ही उत्तरेला किंवा दक्षिणेला फिरू शकतात, त्या पेक्षा जास्त वळू शकत नाही.)
 18. जर धावपटूचे दोन्ही पाय सीमा रेषेच्या बाहेर स्पर्श झाले, तर त्याला out मानले जाते.
 19. जेव्हा सर्व धावपटू ९ मिनिटांत out होतात, तेव्हा चेजर्स धावपटूंच्या विरोधात लोना मिळवू शकतात, परंतु लोनाला कोणतेही अधिक गुण नाहीत.
 20. खो खो खेळात २ अंपायर, १ रेफ्री आणि एक time keeper असतो.

खो खो खेळाचे फायदे (Benefits Of Kho Kho In Marathi)

 1. खो खो हा खेळ खेळल्याने शरीर निरोगी राहते आणि लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.
 2. खो खो खेळून शरीराचा सर्वांगीण विकास होतो, ज्यामुळे हृदयविकार, डायबेटिस, cholestrol सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी होते.
 3. हा खेळ खेळल्याने हात आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
 4. हा खेळ आळस दूर करतो आणि मन शांत ठेवतो.
 5. हा गेम खेळून एकाग्रता शक्ती वाढते. कारण धावणाऱ्या खेळाडूला पकडणे हा एकच ध्येय आपल्यासमोर असते.
 6. खो खो खेळात जोरात धावावे लागते, त्यामुळे तुमचे धावण्याचे कौशल्य वाढते.
 7. जवळ जवळ आलेला खेळाडू पटकन सेंटर line cross करून दुसऱ्या बाजूला जातो, आणि त्याला पकडता येत नाही अशा वेळेस सहनशक्ती चा विकास होतो.
 8. खो खो खेळात आपला stamina develop होतो.
 9. खो खो खेळात अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून तुम्ही देशाचं नाव मोठं करू शकता.

खो खो खेळाचे कौशल्य (Skills of kho-kho in Marathi)

प्रत्येक खेळात काही ना काही कौशल्य वापरून खेळाडू खेळ जिंकत असतात. मग खो खो खेळात कोण कोणते कौशल्य आहेत ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही खो खो खेळात विजयी होऊ शकाल? चला बघूया

खो खो खेळाची प्रमुख बचावाची कौशल्य

 1. पाठलाग करण्याचे कौशल्य (Chasing skills) : पाठलाग करताना, खो मोठ्या आवाजात दिला पाहिजे आणि खो ला कॉल करताना खेळाडूला स्पर्श केला पाहिजे.
 2. ध्रुवाकडे वळणे (Turning at pole) : ध्रुवाभोवती वळणे एका हाताने केले जाते आणि दुसरा मुक्त हात धावणाऱ्याला स्पर्श करण्यासाठी वापरला जातो.
 3. पाठलाग (Chasing) : पाठलाग क्रॉस लाईनच्या दिशेने फिरतो आणि धावण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो.
 4. डायव्हिंग (Diving) : जेव्हा पाठलाग करणारा धावपटू त्याच्या दृष्टीकोनात आहे असे वाटते, तेव्हा एक गोताखोरी / उडी घेतली जाते, आणि रनर ला पकडले जाते.
 5. धावण्याचे कौशल्य (Running Skills) : त्यासाठी सहनशक्ती आणि वेग आवश्यक आहे.
 6. डोजिंग (Dodging): हे धावण्यामध्ये वापरले जाणारे सर्वात महत्वाचे कौशल्य आहे. डोजिंग शरीराच्या धक्कादायक हालचालीद्वारे दिले जाते.

खो खो खेळाचे पुरस्कार (Kho Kho Sports Awards in Marathi)

खो खो खेळाडूंना खेळासाठी त्यांच्या समर्पणासाठी आणि त्यांच्या संपूर्ण खो खो खेळाच्या कारकीर्दीत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध पुरस्कार प्राप्त होतात.

खो खो खेळाच्या पुरस्कारांची यादी (List of Kho Kho sports awards IN Marathi)

 1. जानकी पुरस्कार (Janaki Award)
 2. वीर अभिमन्यू पुरस्कार (Veer Abhimanyu award)
 3. अर्जुन पुरस्कार (Arjuna Award)
 4. एकलव्य पुरस्कार (Eklavya Award)
 5. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (Rani Laxmi Bai award for women)
 6. द्रोणाचार्य पुरस्कार (Dronacharya Award)

खो खो खेळाचे पुरस्कार माहिती (Kho kho awards information in Marathi)

 1. जानकी पुरस्कार (Janaki Award) –
  • जानकी पुरस्कार हा खो खो खेळात १८ वर्षाखालील मुलींसाठी असतो.
  • खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जानकी पुरस्कार देण्यात येतो.
 2. वीर अभिमन्यू पुरस्कार (Veer Abhimanyu award)
  • खो खो खेळणाऱ्या १८ वर्षाखालील मुलांसाठी आणि
  • त्यांच्या विलक्षण कामगिरीबद्दल हा वीर अभिमन्यू पुरस्कार दिला जातो.
 3. अर्जुन पुरस्कार (Arjuna Award)
  • The Ministry of Youth Affairs and Sports(Government of India) खेळाडूंना ओळखते आणि
  • खो खो राष्ट्रीय खेळांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करते.
  • या अर्जुन पुरस्कारामध्ये ५००,००० रुपये आणि अर्जुनची कांस्य मूर्ती देखील समाविष्ट असते.
 4. एकलव्य पुरस्कार (Eklavya Award)
 5. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (Rani Laxmi Bai award for women)
  • खो खो गेममधील महिलांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल हा राणी लक्ष्मी बाई पुरस्कार देण्यात येतो.
  • पुरस्कारामध्ये १००,००० रुपयांची बक्षीस रक्कम समाविष्ट आहे.
  • राणी लक्ष्मीबाई पुरस्कार ब्रिटीश राज्याविरूद्ध शौर्याने लढलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे.
 6. द्रोणाचार्य पुरस्कार (Dronacharya Award)

FAQ About Kho kho In Marathi

खो खो खेळात किती खेळाडू असतात?

एकूण १२ खेळाडू खो खो खेळात असतात. मैदानात खेळणारे ९ आणि राखीव ३.

खो खो खेळाच्या क्रिडांगणाची लांबी व रुंदी किती आहे?

खो खो खेळाच्या क्रिडांगणाची लांबी व रुंदी – खो खो खेळाचे मैदान हे २९ मीटर लांब आणि १६ मीटर रुंद असते.

खो-खो मध्ये राष्ट्रीय स्तरावर कुमार गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला कोणता पुरस्कार दिला जातो?

‘वीर अभिमन्यु’ हा पुरस्कार भारतीय खो खो महासंघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ​राष्ट्रीय स्तरावरील कुमार गटाच्या (१८ वर्षाखालील) अजिंक्यपद खो खो स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणाऱ्या कुमार खेळाडूस दिला जातो.

अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो?

अर्जुन पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावतात. परंतु एवढेच नव्हे तर, खेळाचा प्रचार आणि प्रसार करतात, आणि स्वतः खेळाडू म्हणून निवृत्त झाले तरी वैयक्तिक पातळीवर खेळामध्ये आपले अमूल्य योगदान प्रदान करतात.

खो खो या खेळात स्तंभाची उंची किती असते

खो खो या खेळात स्तंभाची उंची १.२० मीटर असते.

खो खो खेळातील कौशल्य काय आहे?

खो खो खेळाचे कौशल्य पुढीलप्रमाणे –

1) पाठलाग करण्याचे कौशल्य (Chasing skills)
2) ध्रुवाकडे वळणे (Turning at pole)
3) पाठलाग (Chasing)
4) डायव्हिंग (Diving)
5) धावण्याचे कौशल्य (Running Skills)
6) डोजिंग (Dodging)

खो खो मध्ये एक धावपटू out झाल्यास किती गुण मिळतात?

धावपटू (runner) ला आऊट केल्याबद्दल एक गुण दिला जातो.

खो खो मधील महिला खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी कोणता पुरस्कार दिला जातो?

खो खो मधील महिलांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल हा राणी लक्ष्मी बाई पुरस्कार देण्यात येतो.

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाला कोणता पुरस्कार दिला जातो?

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.

निष्कर्ष

तर मित्रानो आजच्या या खो खो माहिती मराठी मध्ये आपण खो खो बद्दलच्या जवळ जवळ सर्वच गोष्टींचा सविस्तर अभ्यास केला. तुम्हाला हि खो खो खेळाची संपूर्ण माहिती कशी वाटली हे कृपया comment करून नक्की कळवा. धन्यवाद !!!

Team 360Marathi.in

हे देखील वाचा,

Leave a Comment

close