ट्विटर म्हणजे काय ? आणि ट्विटर कसे वापरावे ? Twitter information in Marathi

आपल्या देशात बऱ्याच लोकांना माहित आहे की ट्विटर नावाचे काहीतरी आहे कारण त्यांना हे नाव कुठेतरी न्युज, सोशल मीडियावर ऐकायला मिळते. पण अजूनही बऱ्याच लोकांना ट्विटर म्हणजे काय आहे आणि नक्की हे ट्विटर कसे कार्य करते हे माहित नाही. म्हणूनच आजची पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना ट्विटरबद्दल जाणून घ्यायचे आहे.

आज या पोस्ट मध्ये आपण ट्विटर बद्दल माहिती पाहणार आहोत जसे कि ट्विटर म्हणजे काय ? आणि ट्विटर कसे वापरावे ? ट्विटर ची शब्द मर्यादा किती आहे इत्यादी,

तर चला मग सुरु करूया आणि पाहूया ट्विटर ची माहिती,

ट्विटर म्हणजे काय – twitter in marathi

ट्विटर ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे, जसे की फेसबुक, ज्याचा वापर करून तुम्ही त्यावरील लोकांशी कनेक्ट होऊ शकता. देश आणि जगातील सर्व प्रसिद्ध लोक ट्विटरचा वापर करतात.

ट्विटरची स्थापना 21 मार्च 2006 रोजी झाली. त्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. ट्विटर ही जगातील एक लोकप्रिय वेबसाइट आहे.

ट्विट करणे म्हणजे काय ? (What is Twin in marathi)

जेव्हा आपण ट्विटरवर कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करतो तेव्हा त्या प्रक्रियेला ट्विट करणे असे म्हणतात.

ट्विटर ची शब्द मर्यादा १४० शब्द आहे म्हणजेच तुम्ही एका वेळी फक्त 140 शब्द वापरू शकता कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा मुद्दा त्या शब्दांमध्ये पूर्ण करायचा आहे. आणि जर तुमचा मुद्दा अपूर्ण राहिला असेल तर तुम्ही पुन्हा दुसरा twit करु शकतात, जरी तुम्हाला पाहिजे तितके ट्विट करता येतील.

ट्विटरच्या साहाय्याने, तुम्ही दररोज त्या सर्व विषयांबद्दल जाणून घेऊ शकता ज्यावर देशात आणि जगात सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तुम्ही त्या विषयांवर तुमचे मत देखील देऊ शकता.

ट्विटरची एक खास गोष्ट आहे की, तुम्ही ट्विटर अकाउंट न बनवता लोकांनी केलेले ट्विट वाचू शकता, पण त्याबद्दल तुमचे मत काय आहे आणि तुम्ही त्याच्या शब्दांशी सहमत आहात का, इत्यादीसाठी तुम्हाला स्वतःचे ट्विटर खाते असणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्याकडे साहजिकच ट्विटर असणे आवश्यक आहे.

ट्विटर बद्दल थोडक्यात माहिती

ट्विटर वापरण्यापूर्वी, आपल्याला ट्विटरच्या मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण ट्विटरबद्दल चांगले जाणून घेऊ शकता आणि ट्विटर व्यवस्थित रित्या चालवू शकाल.

जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर सारख्या गोष्टींची माहिती असेलच त्याच प्रकारे ट्विटर वर देखील या गोष्टी असतात पण काही गोष्टी वेगळ्या देखील असतात, त्या आपण खाली पाहूया –

ट्विटर वापरकर्त्याचे नाव (@)

ट्विटरवर, तुम्हाला प्रत्येक वापरकर्तानावाच्या पुढे ऍट द रेट म्हणजेच (@) हे चिन्ह दिसेल. तुमचे ट्विटर अकाऊंट तयार केल्यानंतर ते तुमच्या नावापुढे आपोआप दिसेल.

username -

ट्विट्स म्हणजे काय ? ( What is Twits In Marathi )

जेव्हाही तुम्ही ट्विटरवर काही लिहितात किंवा पोस्ट करतात, तेव्हा त्याला Tweet असे म्हणतात. या tweet करण्याची म्हणजेच लिहिण्याची काही शब्द मर्यादा असते, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 140 शब्द वापरावे लागतात.

tweets -

रीट्वीट म्हणजे काय ? ( What is Re-tweet in Marathi )

हे नक्की शेअर करण्यासारखे आहे, जेव्हा तुम्हाला कोणाचे ट्विट आवडते, तेव्हा तुम्ही ते रीट्वीट करू शकता. असे केल्याने, ते ट्वीट तुमच्या टाइमलाइनवर दिसू लागते, जे तुम्हाला फॉलो करणाऱ्या लोकांपर्यंत देखील पोहोचते.

ट्विटर वर फोल्लोवर्स म्हणजे काय असत ? ( What is Followers on twitter in Marathi )

ट्विटरवर तुम्हाला प्रत्येक वापरकर्त्याच्या (User) प्रोफाइलवर फॉलो बटण मिळते. या बटणावर क्लिक केल्यानंतर, आपल्याला त्या वापरकर्त्याच्या प्रत्येक ट्विटची माहिती मिळत राहते.

username -

जे लोक तुमच्या प्रोफाईलवर येतात आणि फॉलो बटणावर क्लिक करतात, ते तुमचे फॉलोअर्स बनतात आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या प्रोफाईलवर जाऊन फॉलो बटणावर क्लिक करता, याचा अर्थ तुम्ही त्यांना फॉलो करत आहात.

ट्विटर हॅशटॅग म्हणजे काय (#) ( What is Hashtag on twitter )

आपण हॅशटॅग (#) चे नाव ऐकले असेल, ते ट्विटरवर पोस्ट लिहिताना वापरले जाते आणि जे लोक समान हॅशटॅग (#) वापरतात मग ते एका गटासारखे कार्य करते ज्यात लोक त्या विषयावर चर्चा करतात. हा हॅशटॅग वापरून कोणीही या चर्चेत सामील होऊ शकतो.

hashtags -

ट्विटर कसे वापरावे ? ( How to Use Tweeter in Marathi )

ट्विटर वापरणे अजिबात कठीण नाही, लोक जितके कठीण समजतात, ते वापरण्याचे काही मार्ग खालील विषयात तुम्हाला सांगितले आहेत.

तुम्हाला यात सांगितले आहे की तुम्ही ते कसे वापरू शकता, ट्विटरमध्ये कोणते शब्द वापरले जातात, तुम्ही तुमचे स्वतःचे ट्विट कसे करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या आसपासच्या जगात काय चालले आहे ते जाणून घ्यायचे असेल किंवा सांगायचे असेल तर तुम्हाला ट्विटरपेक्षा चांगले व्यासपीठ सापडणार नाही कारण ट्विटर हे एक प्रकारचे ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

जसे तुम्ही खालील फोटो मध्ये पाहू शकतात जिथे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक दिसत आहेत.

trending -

निष्कर्ष :

आज या पोस्ट मध्ये आपण पाहिले कि ट्विटर म्हणजे काय ? आणि ट्विटर कसे वापरावे?

आशा करतो तुम्हाला ट्विटर बद्दल माहिती समजली असेल,

तुम्ही ३६०मराठी च्या अकाउंट ला देखील ट्विटर वर Follow करू शकतात,

Follow On Twitter 

धन्यवाद !!!

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close