How To Earn Money From instagram Marathi | इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे

How To Earn Money From instagram Marathi:– नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे..

आज आपण पाहणार आहोत कि कश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकतात.

इंस्टाग्राम अँप म्हणजे सात वर्षांपेक्षा कमी कालावधीत सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर बनलेले टॉप चे ऍप.

गेल्या दोन वर्षात त्याने तब्बल 700 दशलक्ष युसर बनवले आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये इन्स्टाग्राम स्टोरीज सुरू केल्यापासून त्याची development अतिशय वेगाने झाली आहे.

आज आपण इंस्टाग्राम वरून earning साठी कोण-कोणत्या methods वापरल्या जातात ते पाहू.

चला तर मग बघूया इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे….

इन्स्टाग्रामवर पैसे कमविण्याची संधी

सुरूवातीस, मला इंस्टाग्रामवरून पैसे कमविणार्‍या लोकांच्या 3 मोटिवेशनल स्टोरीस तुमच्या समोर ठेवू द्या. जेणेकरून तुम्हाला बाकी गोष्टींचा अंदाज येऊन जाईल.

१. थेरेसा नुगेन हि एक १३ वर्षाची मुलगी आहे. होय बरोबर वाचलंत फक्त १३. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या घरातील बनवलेल्या स्लॅमचे व्हिडिओ शेअर करते ज्यात तिला शेकडो हजारो views मिळतात.

तिचे अकाउंट सुंदर अशा पोस्टने भरलेले आहे. तुम्हाला काय वाटते? इन्स्टाग्राम वापरनारे एवढ्या किशोरवयीन मुलांकडून घरगुती स्लॅम खरेदी करु शकतात?

जेव्हा मी तिची वेबसाइट तपासली तेव्हा सर्व फ्लेवर्स विकले गेले होते. टाईम डॉट कॉमने नोंदवले की ती 3,000$/ महिना कमावते. म्हणजे जवळ जवळ २,२४,००० रुपये महिना. खोटं जरी वाटत असलं तरीही ते खरं आहे.

थेरेसा एकटी नाही. कॅलिफोर्नियामधील 13 वर्षीय Rachel Albus आणि उत्तर कॅरोलिनामधील 12 वर्षीय Sarah Y. यांनीही हजारो फॉलोअर्ससाठी त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आहेत. आणि त्यांच्याकडून बक्कळ पैसे कमवतात.

वय फक्त एक संख्या आहे. पण मी बारा वर्षांचा असताना इतका हुशार असल्याचे मला तरी आठवत नाही!

2. सारा टास्कर यॉर्कशायरची 32 वर्षीय महिला, तिने एनएचएस स्पीच थेरपिस्ट म्हणून काम केले. चार वर्षांपूर्वी, चार महिन्यांच्या प्रसूतीच्या रजेवर असताना, तिने आपले इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. आता, ति 170 हजार followers सह micro-influencer म्हणून ओळखली जाते .

तिचे खाते तिच्या आयुष्यातील सुंदर जीवनशैली चित्रांनी भरलेले आहे. आणि तिने मागील वर्षी अंदाजे 120,000 डॉलर्स केले. म्हणजे 89,84,316 रुपये.

असे बरेच उदाहरणं आहेत. काय वाटत मग ? हे कमवू शकतात तर आपण का नाही.

इन्स्टाग्रामकडून पैसे कमवायचेय?: त्यासाठीच्या आवश्यक अटी आधी बघा.

  1. Reach and Influence / पोहोचा आणि प्रभाव टाका – लोकांपर्यंत स्वतःला आणि तुमचा विषय पोहोचवा आणि त्या बद्दल प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करा.
  2. Engaged Followers – फोल्लोवेर्स ला कायम स्वतःशी कनेक्ट ठेवा.
  3. Use relevant hashtags with every post – प्रत्येक पोस्टसह संबंधित हॅशटॅग वापरा.
  4. Improve the quality of your content – आपल्या कन्टेन्ट ची गुणवत्ता चांगली असू द्या.
  5. Stand out by producing video content – व्हिडिओस टाकून फोल्लोवेर्स ला आकर्षित करा.
  6. Build relationships with influencers and other businesses – प्रभावक, हुशार आणि इतर व्यवसायांशी संबंध निर्माण करा.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ( How to Earn Money From Instagram Marathi )

मित्रांनो इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याआधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि त्यासाठी काय आवश्यक आहे.

  • जास्त followers असणारे पेज किंवा अकाउंट 
  • चांगली engagement 
  • targeted audience 

जर या गोष्टी तुमच्या अकाउंट मध्ये असतील तर तुम्ही चांगली earning कराल..

आता आपण पाहूया अशे ५ मार्ग ज्याद्वारे तुम्ही इंस्टाग्राम वरून earning करू शकाल.

Sponsor Post / Paid Promotion :

जेव्हा तुमच्या अकाउंट वर जास्त प्रमाणात followers वाढतात तेव्हा, तुमच्या कळे प्रोमोशन साठी बऱ्याच ऑफर्स येतात, 

तुमच्या त्या ऑफर स्वीकारून तुमच्या पेज किंवा अकाउंट वर पोस्ट किंवा स्टोरी च्या माध्यमातून प्रमोट करू शकतात.. 

साधारणतः १०k तर १००k Followers असणाऱ्या पेज साठी तुम्ही १५० तर १५०० रुपये या दरम्यान charge कमवाल 

पण यासाठी तुमच्या पेज वर जास्त followers असणे आवश्यक आहे 

आणि लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुमचे followers वाढतात तेव्हा बरेच scammer तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील कि थोडे जास्त पैसे घे पण आमची पोस्ट किंवा स्टोरी टाक, पण मात्र पैश्या साठी तुमच्या followers सोबत scam करू नका, याने तुमच्यावरचा विश्वास कमी होईल 

Brand Deals :

जर तुमचे पेज niche पेज असेल जसे health, fitness, lifestyle, business तर तुम्हाला ब्रँड सोबत collaboration करता येऊ शकते, पण त्यासाठी तुमचे followers मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे 

Affiliate Marketing :

affiliate marketing हा उत्तम पर्याय आहे इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी, 

जर तुम्हाला affiliate marketing बद्दल माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो 

समजा एक कंपनी आहे आणि त्यांना त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, तर ते affiliate प्रोग्रॅम चालवतात, जो तुम्ही जॉईन करू शकतात, आणि त्यानंतर प्रत्येकाला एक unique लिंक मिळते, आणि जेव्हा कोणी तुमच्या लिंक वरून त्या कंपनी च प्रॉडक्ट विकत घेईल तेव्हा तुम्हाला कमिशन मिळेल 

आता या द्वारे पैसे कशे कमवाल ?

समजा तुमचं फिटनेस ची related इंस्टाग्राम पेज आहेत, ज्यावर तुम्ही workout चे, videos टाकतात,

आता साहजिकच आहे कि तुमचे followers ला फिटनेस मध्ये आवड आहे म्हणून तर त्यांनी तुम्हाला follow केलय 

तर तुम्ही त्यांना ऍमेझॉन फ्लिपकार्ट या सारख्या कंपनी च affiliate प्रोग्रॅम जॉईन करून त्यांना फिटनेस शी related प्रॉडक्ट जसे प्रोटीन वगरे प्रमोट करू शकतात, आणि जो तुमच्या लिंक वरून ते प्रोटीन विकत घेईल त्यात तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल, ( विकत घेणाऱ्याला extra पैसे द्वावे लागत नाही ) 

अश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वरून affiliate मार्केटिंग वापरून पैसे कमवू शकतात 

Product / E-Book : 

स्वतःचा प्रॉडक्ट किंवा सर्विस द्वारे देखील तुम्ही चांगली कमाई करू शकतात 

तुम्ही इंस्टाग्राम अशे खूप business चे पेज बघितले असतील जे तुम्हाला त्यांचे ईबुक घ्याल लावतात, आणि त्याद्वारे पैसे कमवतात 

तुम्ही कस कमवाल ?

आता समजा, तुमचं पेज आहे ज्यावर तुम्ही फिटनेस चे कन्टेन्ट टाकतात, तर तुम्ही तिथे diet plan, किंवा ऑनलाईन ट्रेनिंग साठी सर्विस देऊ शकतात आणि त्याबद्दल काही फीस घेऊ शकतात 

Sell Instagram Account : 

आणि शेवटचा पर्याय म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट विकूंन पैसे कमवणे,खूप लोक हि पद्धत वापरतात 

त्यासाठी ते एक अकाउंट सुरु करतात, त्यावर followers वाढवतात आणि नंतर ते विकतात, ऑनलाईन अश्या खूप वेबसाईट आहे जिथे तुम्ही तुमचं इंस्टाग्राम पेज किंवा अकाउंट सेल करू शकता 

निष्कर्ष 

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की कश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकतात इंटरनेट द्वारे. ( How To Earn Money From instagram Marathi).  

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल , जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या.

धन्यवाद !!!

8 thoughts on “How To Earn Money From instagram Marathi | इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे”

Leave a Comment

close