वेबसाईट कशी तयार करावी | How To Make Website in Marathi

जर तुम्हाला वेबसाईट कशी तयार करावी हे जाणून घ्याच असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करत असाल, किंवा स्वतःचा ब्लॉग सुरु करत असाल, तर या पोस्ट मध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप सांगू कि वेबसाईट कशी बनवतात, वेबसाईट बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.

त्याचसोबत डोमेन काय असत ? होस्टिंग काय असत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळतील..

तर चला मग सुरु करूया आणि पाहूया कि वेबसाईट कशी तयार करावी

वेबसाईट म्हणजे काय – what is Website in marathi

जर आपण साध्या शब्दात वेबसाईट म्हणजे काय हे बघितलं तर वेब पेजेस एकत्रित मिळवून वेबसाईट बनते. म्हणजे, अनेक वेबपेजेस गोळा करण्यासाठी एक वेबसाइट हे एक माध्यम आहे. प्रत्येक वेबसाईटला अनेक वेगवेगळी वेब पेज असतात. या सर्व वेब पेजमध्ये वेगवेगळी माहिती साठवली जाते.

ब्लॉग म्हणजे काय – what is blog in marathi

ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात…

ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय – difference between blog and website

वेबसाईट किंवा ब्लॉग जवळजवळ सारखेच असतात, फरक फक्त एवढाच कि ब्लॉगवर वेगवेगळ्या विषयांची माहिती असते, तसेच वेबसाईट वर वेगळी माहिती असते.

जसे कि जर बिझनेस वेबसाईट असेल तर त्यावर प्रॉडक्ट बद्दल माहिती असू शकते..

हाच लहान असा फरक वेबसाईट आणि ब्लॉग मध्ये आहे..

आता आपण पाहूया कि वेबसाईट कशी बनवावी.

वेबसाईट कशी तयार करावी

वेबसाईट तयार करण्याआधी एक गोष्ट ठरवा कि वेबसाईट कशासाठी बनवायची आहे ? म्हणजे जसे बिझनेस साठी हवी आहे कि फक्त ब्लॉग तयार करायचा आहे.

त्यानुसार तुम्ही पुढील प्लांनिंग कराल.

वेबसाईट :

जर तुम्हाला एक full features असणारी वेबसाईट बनवायची असेल तर, तुम्हाला त्यासाठी एखादंया वेब डेव्हलपर कळून वेबसाईट बनवू शकतात..

जर तुम्हाला एखादी full कंट्रोल आणि फीचर्स वाली वेबसाईट बनवायची असेल तर खालील प्रोग्रामिंग भाषा वापरावी लागते –

तुम्हाला जर प्रोग्रामिंग बद्दल ज्ञान नसेल तर, तुम्ही वेब डेव्हलपर ला पैसे देऊन बनवू शकतात

ब्लॉग :

जर तुम्हाला ब्लॉग वेबसाईट बनवायची असेल तर, खालील स्टेप फॉलो करा –

प्लॅटफॉर्म निवडा :

ब्लॉग बनवण्यासाठी तुमच्या कडे २ पर्याय असतात

 • फ्री
 • पेड

फ्री ब्लॉग कसा बनवायचा :

जर तुम्हाला मोफत ब्लॉग बनवायचा असेल तर, तुम्ही ब्लॉगर या प्लॅटफॉर्म चा वापर करून तुम्ही मोफत वेबसाईट बनवू शकतात..

या साठी तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात..

पेड :

पेड म्हणजे थोडी इन्व्हेस्टमेंट करून, जसे कि डोमेन आणि होस्टिंग घेऊन, हे काय असत हे पुढे आपण पाहूच.

यासाठी तुम्ही वर्डप्रेस वर वेबसाईट बनवू शकतात..

आता आपण पाहूया कि स्टेप बाय स्टेप वेबसाईट कशी बनवायची :

या स्टेप फक्त वर्डप्रेस वेबसाईट साठी आहेत, फ्री ब्लॉग साठी तुम्ही वर दिलेले विडिओ पाहू शकतात.

डोमेन घ्या :

सोप्या भाषेत सांगायला गेलं तर, समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरु केलं त्यासाठी तुम्ही सामान ठेवण्यासाठी दुकान लागतो, आणि त्या दुकानाचा पत्ता असतो जिथे जाऊन ग्राहक वस्तू विकत घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता तेव्हा तुमच्या वेबसाईट ला पण नाव दिले जाते( For Example : 360Marathi.in )आणि तुम्ही ते नाव browser किंवा सर्च इंजिन जसे google मध्ये जाऊन शेअरच करू शकतात आणि त्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवतात तेव्हा तुमच्या सगळ्या फाइल्स, फोटोस, आणि कन्टेन्ट एखाद्या सर्वर वर होस्ट केलेले असते आणि तुम्हाला एक ip address जसे ( 192.158. 1.38. ) दिला जातो ज्याने तुम्ही त्या वेबसाईट ला access करू शकतात.

पण हा एवढा नंबर लक्षात ठेवणे जरा अवघडच म्हणून डोमेन असतो, हा डोमेन त्या सर्वर ( होस्टिंग ) ला कनेक्ट केला जातो आणि मग तुम्ही फक्त डोमेन नाव टाईप करून त्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

Domain कुठून घ्याल ?

 • Godaddy
 • NameCheap
 • BigRock
 • Google Domains

अधिक माहितीसाठी खालील पोस्ट वाचा –

डोमेन बद्दल माहिती

होस्टिंग घ्या :

वेब होस्टिंग म्हणजे काय आपण हे एका उदाहरण द्वारे समजू,

समजा जेव्हा तुम्ही एखाद व्यवसाय सुरु करतात किंवा शॉप सुरु करण्याचा विचार करतात तेव्हा तुम्हाला भांडवल किंवा मशीन किंवा सामान ठेवण्यासाठी जागा लागते,

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु करतात तेव्हा तुमच्या वेबसाईट वरील फाइल्स, फोटो, विडिओ इंटरनेट वर ठेवण्यासाठी जागा लागते आणि त्यालाच होस्टिंग म्हणतात..

होस्टिंग घेऊन तुमची तुमची वेबसाईट एखाद्या सर्वर वर होस्ट करू शकतात.

वेब होस्टिंग सर्विस तुम्हाला होस्टिंग पुरवत असतात.

 • Hostinger
 • Siteground
 • Greengeeks
 • A2Hosting
 • Bluehost
 • Kinsta Etc

अधिक माहितीसाठी खालील पोस्ट वाचा –

होस्टिंग बद्दल माहिती

थिम निवळा :

थिम म्हणजे तुमच्या वेबसाईट च दिसणे, बाजारात वेगवेगळ्या थिम आहेत, तुम्ही कोणतीही वेबसाईट विकत घेऊन किंवा फ्री थिम सुद्धा वापरू शकतात..

वेबसाईट लाँच करा :

डोमेन, होस्टिंग आणि थिम झाल्यानंतर वेबसाईट लाँच करा.

वेबसाईट लाँच म्हणजे वेबसाईट ला गूगल सर्च कंसोल मध्ये सबमिट करा, तसेच वेगवेगळ्या सर्च इंजिन मध्ये सबमिट करा, म्हणजे तुमची वेबसाईट ऑनलाईन दिसू शकेल…

या स्टेप फॉलो करून तुम्ही वेबसाईट बनवू शकतात आणि लाँच करू शकतात.

वेबसाईट कशी बनवायची याबद्दल अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा :

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला समजलेच असेल कि वेबसाईट कशी तयार करावी.

जर तुम्हाला ब्लॉगर वर किंवा वर्डप्रेस वर वेबसाईट बनवण्यासाठी खाली अडचणी येत असतील तर, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

3 thoughts on “वेबसाईट कशी तयार करावी | How To Make Website in Marathi”

Leave a Comment

close