पॅन कार्ड म्हणजे काय ? पॅन कार्ड कसे काढावे | पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

पॅन कार्ड म्हणजे काय : नमस्कार मित्रांनो, आता जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे, जर तुम्ही बँकेत जास्त रकमेचे व्यवहार करतात तर तिथे देखील तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे, आणि बऱयाच लोकांकडे पॅन कार्ड नसते, आणि त्यांना त्याबद्दल माहिती सुद्धा नसते.

म्हणूनच आज या पोस्ट मध्ये आम्ही पॅन कार्ड म्हणजे काय ? पॅन कार्ड कसे काढावे, पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे या सर्व विषयी माहिती दिलेली आहे

तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया पॅन कार्ड बद्दल माहिती

पॅन कार्ड म्हणजे काय ? What is pan card in Marathi

PAN कार्ड चा फुल्ल फॉर्म Permanent Account Number आहे म्हणजेच मराठीत (कायमस्वरूपी खाते क्रमांक)

पॅनकार्ड हा संपूर्ण भारतातील सर्व करदात्यांना दिलेला ओळख क्रमांक आहे. भारतीय आयकर विभागाकडून उपलब्ध असलेल्या पॅन कार्डमध्ये 10-अंकी क्रमांक दिला जातो.

भारतीय आयकर कायदा, 1961 द्वारे पॅनकार्ड भारतात लॅमिनेट कार्ड म्हणून जारी केले आहे. हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) देखरेखी खाली आयकर विभागाने जारी केले आहे आणि ते ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा देखील आहे.

पॅन कार्ड तुमच्या एटीएम कार्डसारखेच आहे, यामध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, तुमचा फोटो, सही आणि कायमस्वरूपी खाते क्रमांक इत्यादी छापलेले असते

पॅन कार्ड कसे काढावे | How to apply for pan card in marathi

पॅन कार्ड तुम्ही २ प्रकारे काढू शकतात,

  • ऑफलाईन
  • ऑनलाईन

ऑफलाईन पॅन कार्ड कसे काढावे | pan card online apply in marathi

  • अधिकृत पॅन कार्ड केंद्रात जा आणि पॅन कार्ड अर्ज मिळवा
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा आणि नंतर फीसह ते सबमिट करा
  • काही दिवसांनी पॅन कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे | pan card offline in marathi

  • NSDL किंवा UTIITSL वेबसाइटला भेट द्या
  • फॉर्म आणि शुल्क भरा आणि सबमिट करा
  • पॅन कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल

अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॅन कार्ड काढू शकतात

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे | Documents for pan card in marathi

तुमचं Identity Proof : सर्वप्रथम, ओळख पुरावा असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे खाली नमूद केलेल्या यादीनुसार कोणतेही एक ओळखपत्र असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

  1. पासपोर्ट
  2. मतदार ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड
  5. ड्रायव्हिंग लायसन्स
  6. केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र

तुमचं Address proof : पत्ता पुरावा . पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक डॉक्युमेंट वापरू शकता.

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट
  3. मतदार ओळखपत्र
  4. ड्रायव्हिंग लायसन्स
  5. पोस्ट ऑफिस पासबुक

जन्म प्रमाणपत्र: – तिसर डॉक्युमेंट म्हणजे जन्म प्रमाणपत्र आहे, ते आपल्या जन्माशी संबंधित माहिती देते. पुराव्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक डॉक्युमेंट वापरू शकता.

  1. आधार कार्ड
  2. मतदारांचे फोटो ओळखपत्र
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. पासपोर्ट
  5. मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र
  6. महापालिका प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र. फोटो: अर्ज करताना तुम्हाला 2 फोटो देखील सादर करावे लागतील.

नोट : नवा काढलेला फोटो च वापरावा

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे | How to link pan card to aadhar card in marathi

खालील प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

a) आयकर ई -फाइलिंग पोर्टल उघडा – https://incometaxindiaefiling.gov.in/

ब) त्यावर नोंदणी करा (आधीपासून केले नसल्यास). तुमचा पॅन (कायमस्वरूपी खाते क्रमांक) तुमचा वापरकर्ता आयडी असेल.

c) युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.

d) एक पॉप अप विंडो दिसेल, जे तुम्हाला तुमचे PAN आधारशी लिंक करण्यास सांगेल. नसल्यास, मेनू बारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.

e) पॅन तपशीलांनुसार नाव जन्मतारीख आणि लिंग असे तपशील आधीच नमूद केले जातील.

f) तुमच्या आधारवर नमूद केलेल्या पॅन तपशीलांची पडताळणी करा. कृपया. लक्षात घ्या की जर काही जुळत नसेल, तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांमध्ये ती दुरुस्त करणे आवश्यक आहे.

g) तपशील जुळत असल्यास, आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “लिंक” बटणावर क्लिक करा.

h) एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमचे आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या जोडले गेले आहे

i) तुम्ही तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला भेट देऊ शकता.

पॅन कार्ड स्टेटस | pan card status check marathi

screencapture tin tin nsdl pantan StatusTrack html 2021 09 16 08 56 39 -

पॅन कार्ड स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून दिलेली माहिती भरून चेक करू शकतात

Link : https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html

पॅन कार्ड चे उपयोग | pan card uses in marathi

बँक खाते उघडणे

जर तुम्ही बँकेत खाते उघडले तर तुम्हाला पॅन कार्ड लागेल. कोणत्याही बँकेत बचत किंवा चालू खाते असो, पॅन कार्ड आवश्यक असेल. यासह, जर तुम्ही कोणत्याही बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागेल.

आयटी रिटर्न भरताना

आयकर रिटर्न (ITR) भरताना पॅन क्रमांक वापरला जातो. ITR भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

दागिने खरेदी करण्यासाठी पॅन आवश्यक

जेव्हा तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदी करता, तेव्हा तुम्हाला दुकानात खरेदीच्या वेळी पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल.

क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पॅन क्रमांक द्यावा

कोणत्याही पोस्ट ऑफिस बचत खात्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन नंबर देणे बंधनकारक आहे. क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या अर्जासाठी पॅन कार्ड देखील दिले जाते. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त बिलांसाठी पॅन कार्ड देखील अनिवार्य आहे.

कार खरेदी किंवा विक्री

जर तुम्ही वाहन खरेदी करत असाल किंवा वापरलेली कार किंवा वाहन 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावा लागेल.

विमा प्रीमियम जमा करताना

आयकरच्या नियमांनुसार, जर तुम्ही वार्षिक विमा प्रीमियम 50000 रुपयांपेक्षा जास्त जमा केले तर तुम्हाला पॅन नंबर द्यावा लागेल.

पॅन कार्ड चे फायदे | pan card benefits in marathi

  • हे कार्ड तुम्हाला आयकरातील समस्या आणि अडथळ्यांपासून वाचवते.
  • तुम्ही पॅन कार्ड ला ओळख प्रमाणपत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरू शकतात
  • अशे अनेक फायदे पॅन कार्ड चे आहेत

पॅन कार्ड हरवले तर काय करावे

जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड गमावले असेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही, तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवर लॉगिन करा, भारतीय नागरिकांसाठी फॉर्म 49-A भरा किंवा तुमच्या पॅन कार्डच्या डुप्लिकेट कॉपीसाठी ऑनलाईन पैसे भरा. पॅन कार्ड तुम्हाला 45 दिवसांच्या आत पाठवले जाईल.

निष्कर्ष :

मित्रानो आज आम्ही या पोस्ट मध्ये पॅन कार्ड म्हणजे काय ? पॅन कार्ड कसे काढावे | पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे या विषयी माहिती दिली.

आशा करतो तुमचे पॅन कार्ड विषयीचे सर्व प्रश्न सुटले असतील, जर अजूनही काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की कळवा

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close