डेबिट कार्ड माहिती : उपयुक्तता, फायदे-तोटे, प्रकार, कसे काढावे | Debit Card Information in marathi

Topics

Debit Card Information in marathi – जर तुमचे स्वतःचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला एटीएम किंवा डेबिट कार्ड काय आहे हे स्पष्टपणे माहित असेल? परंतु जर तुम्ही पहिल्यांदा बँकेत तुमचे खाते उघडत असाल, तर तुमच्या मनात प्लास्टिक कार्ड (डेबिट कार्ड) बाबत खूप गोंधळ होईल. तुमच्या या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये डेबिट कार्डची संपूर्ण माहिती मराठीमध्ये देऊ.

सध्या डिजिटल इंडिया चा नारा जोरात चालू आहे, आणि फक्त नाराच नाही तर त्या दिशेने भारत पाऊल टाकताना सुद्धा आपण बघत आहोत. यामुळे cash व्यवहार 90% कमी झाले ज्याचा फायदा black money चे प्रमाण कमी करण्यात नक्कीच झाला. सर्व व्यवहार पारदर्शक तर झालेच शिवाय transaction नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग ने अगदी सेकंदात व्हायला लागले ते सुद्धा एका क्लिक वर.

यामुळे लोकांचा टाइम फार वाचला कारण आधी प्रत्येक वेळेस पैसे हातात घेण्यासाठी बँक मध्ये जावं लागायच, लाईन मध्ये उभं राहून स्लिप भरून मग पैसे मिळायचे. या दोघांच्या मध्ये ATM cards आले, या ATM cards आणि Debit cards मुळे सुद्धा लोकांचा टाइम वाचायला लागला होता, कारण ठीक ठिकाणी ATM मशीन्स install केलेले होते आणि ते ATM card आत टाकून आपला पासवर्ड टाकून पैसे काढता यायला लागले.

एक मिनिट ! तुम्हाला माहितीये का? ATM card आणि Debit Card दोघे वेग वेगळे आहेत? याबद्दल माहीत नसेल तुम्हाला तर माहीत करून घ्या की ATM card, Debit Card, आणि Credit Card हे तिघी कार्ड्स वेगवेगळे आहेत.

आजच्या या आमच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला या बद्दलच माहिती देणार आहोत. डेबिट कार्ड म्हणजे काय? डेबिट कार्ड कसे वापरतात ? डेबिट कार्ड साठी registration / apply कसे करावे? डेबिट कार्डचे प्रकार सर्व गोष्टी अगदी सविस्तर सांगणार आहोत.

चला तर सुरू करूया, Debit Card Information In Marathi,

डेबिट कार्ड म्हणजे काय? (What is Debit card In Marathi)

सोप्प्या भाषेत डेबिट कार्ड ची व्याख्याडेबिट कार्ड हे प्लास्टिक मनी कार्ड आहे, ज्याचा वापर आपण एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी करू शकतो. डेबिट कार्ड थेट आपल्या बचत किंवा चालू खात्याशी जोडलेले आहे. ज्याद्वारे आपण बँकेत न जाता आपले पैसे काढू शकतो किंवा ऑनलाईन काही पण खरेदी करू शकतो. किंवा

डेबिट कार्ड हे एक पेमेंट कार्ड आहे. जर वापरकर्त्याने काहीपण खरेदी करण्यासाठी या डेबिट कार्ड चा वापर केला, तर त्या कार्डाशी जोडलेल्या खात्यातून(बँक अकाउंट) मधून थेट पैसे कापले जातात किंवा Deduct होतात.

हे डेबिट कार्ड आपल्या bank account सोबत जोडलेले असल्या कारणाने, जेव्हा जेव्हा आपण हे कार्ड वापरून पैसे काढू किंवा एखादे Bill pay करू तेव्हा तेव्हा आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे कमी होत असतात. यामळे सर्व व्यवहार अगदी लवकर होतात. नेहेमी नेहेमी बँकेत जाऊन line मध्ये उभं राहून, स्लिप भरून पैसे काढण्याचा ताण या डेबिट कार्ड मुळे कमी झाला. ऑनलाईन काही खरेदी केल्यास या कार्ड वर असलेले details भरून आपण ताबडतोब कोणतेही payment अगदी सेकंदात करू लागलोय.

डेबिट कार्ड वर छापलेल्या सर्व गोष्टींचा आढावा

 • डेबिट कार्ड पूर्णपणे प्रीपेड असते, ज्यामुळे प्रत्येक व्यवहारावर काढलेले पैसे तुमच्या खात्यातून कापले जातात.
 • कार्डच्या पुढच्या बाजूला १६ अंकी क्रमांक लिहिला असतो, ज्यामध्ये पहिल्या ६ क्रमांकाला बँक ओळख क्रमांक (Bank Identification Number) म्हणतात आणि शेवटचा १० क्रमांक त्या कार्ड धारकाचा (card holder) खाते क्रमांक (Account Number) म्हणून ओळखला जातो.
 • कार्डमध्ये मागच्या बाजूला ३ अंकी CVV (card verification value) कोड अस्तो, जो आपण ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्यासाठी सुरक्षा कोड म्हणून वापरतो.

डेबिट कार्ड आणि ATM कार्ड मधला फरक (Difference Between Debit card and ATM card in marathi)

ATM CARD

ATM – ज्याचा अर्थ Automatic Teller Machine (ऑटोमेटिक टेलर मशीन) असा होतो. आणि त्यातून पैसे काढण्यासाठी आपण वापरत असेल कार्ड म्हणजे ATM Card

 • एटीएम कार्डचा वापर फक्त एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी केला जातो.
 • या कार्डाद्वारे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन किंवा पासवर्ड) आवश्यक आहे.
 • ATM कार्ड तुमच्या चालू खात्याशी (Current account) किंवा बँकेत ठेवलेल्या बचत खात्याशी (Saving Account) जोडलेले असते.
 • एटीएम कार्ड क्रेडिट (उधार) देत नाही आणि म्हणूनच रिअल टाइम आधारावर म्हणजेच जेव्हा transaction झाले त्याच क्षणी पैसे कापले जातात.
 • जर इतर संबंधित बँक च्या ATM मधून तुम्ही पैसे काढत असाल तर तुम्हाला दुसरा कोणताही शुल्क भरावा लागणार नाही परंतु कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीन मधून व्यवहार होत असेल तर एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

Debit Card

 • डेबिट कार्डमध्ये त्या सर्व सुविधा असतात ज्या क्रेडिट कार्डमध्ये सुद्धा असतात, परंतु डेबिट कार्ड मध्ये क्रेडिटला परवानगी ​​नसते.
 • एटीएम कार्ड प्रमाणे, आपली खरेदी पूर्ण करण्यासाठी आपल्याला चार अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक म्हणजेच आपण सेट केलेला पासवर्ड आवश्यक असतो.
 • एटीएम मशीन व्यतिरिक्त, डेबिट कार्ड हे स्टोअर किंवा रेस्टॉरंटमध्ये वापरता येतात आणि ऑनलाइन पेमेंटसाठी देखील वापरले जाऊ शकतात.
 • एटीएम कार्ड प्रमाणेच डेबिट कार्ड तुम्हाला तुमच्या बचत खात्यातून पैसे वापरण्याची परवानगी देते.
 • हे क्रेडिट कार्डपेक्षा वेगळे आहे कारण ग्राहकाला व्याज भरावे लागत नाही.

हे देखील वाचा, (सुरक्षित गुंतवणूक) Mutual Fund Investment Information In Marathi

डेबिट कार्ड चे प्रकार किती व कोणते (Types Of Debit card in marathi)

तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर बऱ्याचदा विमान प्रवासाचे तिकीट काढताना सिनेमा थिएटर चे तिकिट काढताना किंवा एखादी ऑनलाईन शॉपिंग करतांना जेव्हा तुम्ही payment करतात तेव्हा एक condition असते कि मास्टर कार्ड च लागेल किंवा Visa कार्ड नेच payment करता येईल. मग कधी विचार केलाय का हो? काय असतं हे? तर मित्रांनो हे तुमच्या खिशात असलेल्या त्याच डेबिट कार्ड चे प्रकार आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया डेबिट कार्ड चे प्रकार किती आहेत? आणि कोणते आहेत? प्रत्येक डेबिट कार्ड चे कार्य काय आहे?

डेबिट कार्ड चे एकूण ५ प्रकार असतात.

 1. रुपे डेबिट कार्ड
 2. मास्टर कार्ड
 3. वीजा डेबिट कार्ड
 4. मैस्ट्रो डेबिट कार्ड
 5. कॉन्टैक्टलेस डेबिट कार्ड

1. रुपे डेबिट कार्ड (What Is Rupay Debit Card In Marathi)

रुपे कार्ड NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) चा आविष्कार आहे ज्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने मे २०१४ साली केली होती. RUPAY CARD हा शब्द Rupay आणि payment दोन्ही शब्द जोडून तयार करण्यात आला आहे, जेणेकरून त्याचे महत्त्व कळू शकेल की रुपे कार्ड हे पेमेंटशी संबंधित सर्व व्यवहारांच्या क्षेत्रात उपयुक्त असणारे कार्ड आहे. त्याचा उद्देश चेक आणि रोख व्यवहार कमी करणे हा आहे. त्याच वेळी, सर्व विभागांना कार्ड पेमेंटकडे खेचले पाहिजे.

2. मास्टर कार्ड (Master Card Information In Marathi)

मास्टरकार्डचा वापर ऑनलाईन पेमेंटसाठी देखील केला जाऊ शकतो. हे परदेशातही वापरता येते. हे अमेरिकन कंपनीद्वारे देखील चालवले जाते. हे २१० देशांमध्ये वापरले जाऊ शकते.

3. वीजा डेबिट कार्ड ( What Is Visa Debit Card In Marathi)

तुम्ही कार्डवर VISA लिहिलेले पाहिले असेल. हे VISA debit कार्ड अमेरिकन कंपनीद्वारे चालवले जाते. हे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये देखील वापरले जाते परंतु त्यावर एक निश्चित शुल्क भरावे लागते.

4. मैस्ट्रो डेबिट कार्ड

मैस्ट्रो डेबिट कार्ड ही आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे चालवली जाणारी डेबिट कार्ड सेवा देखील आहे. त्याची स्थापना १९९२ मध्ये झाली. बँकांना मेस्ट्रो डेबिट कार्ड जारी करण्याचा अधिकार आहे. हे जगातील अनेक देशांमध्ये वैध आहे.

5. कॉन्टैक्टलेस डेबिट कार्ड

पीओएस टर्मिनल वर कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे डिजिटल पेमेंट सुरक्षित आणि कॅशलेस पेमेंटसाठी योग्य बनते. हे मुख्यतः लहान पेमेंट करण्यासाठी वापरले जाते.

डेबिट कार्डचे फायदे-तोटे मराठी (Benefits & Disadvantages On Debit card in marathi)

डेबिट कार्ड चे अनेक फायदे आहेत, आणि तेवढेच नुकसान देखील आहेत. फायदे सर्वांनाच चालतात आणि फायदा होत असताना सर्वे खुश असतात किंवा निश्चिन्त असतात परंतु नुकसान जेव्हा होत तेव्हा चटका आणि अनुभव दोघेही देऊन जात. असाच चटका किंवा मोठा झटका तुम्हाला बसू नये यासाठी आम्ही तुम्हाला डेबिट कार्ड चे फायदे आणि नुकसान अगदी सविस्तर सांगणार आहोत.

डेबिट कार्डचे फायदे (Benefits Of Debit Card In Marathi)

 1. शून्य वार्षिक फी – कोणतेही वार्षिक शुल्क नाही.
 2. शून्य व्याज – कोणतेही व्याज शुल्क नाही
 3. सुरक्षित – (तुमच्या पासवर्ड शिवाय या कार्ड सोबत कोणीही काहीच करू शकत नाही.)
 4. आपतकालीन वापर – कोणत्याही क्षणी आपण ATM मधून पैसे काढू शकतो.
 5. बजेट बनवण्याचा सराव – क्रेडिट कार्ड सारखे पैसे नसताना खर्च करून कर्ज करून घेता येत नाही.
 6. ईएमआय पर्याय – कोणतीही वस्तू खरेदी केल्यास पूर्ण पैसे एकत्र न भरता आल्यास, दुकानदार आपल्या आर्थिक गुणवत्तेनुसार ग्राहकाला डेबिट कार्ड वर loan म्हणजेच EMI चा एक पर्याय देऊ शकतो. म्हणजे दरमहा तुमच्या कार्ड मधून आपोआप पैसे कापले जातील.
 7. स्मार्ट निवड – कोणतेही व्याज, अतिरिक्त फी, असुरक्षितता, अशी कोणतीही गोष्ट नसल्या कारणाने डेबिट कार्ड हि एक स्मार्ट निवड ठरु शकते.

डेबिट कार्ड चे तोटे किंवा नुकसान (Disadvantages of Debit Card In Marathi)

 1. डेबिट कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, परंतु आता तुमचा मोबाईल नंबर कार्ड ला कनेक्ट असल्याने तुम्ही लगेच बँकेत कॉन्टॅक्ट करून कार्ड ब्लॉक करू शकतात.
 2. सध्या ऑनलाईन व्यवहार चालतात आणि डेबिट कार्ड सुद्दा यात कनेक्ट असतात, म्हणून ऑनलाईन fraud होताना आपण नेहेमीच ऐकत असतो. म्हणून ऑनलाईन व्यवहार पहिल्यांदा करत असाल तर एखाद्या जाणकाराला विश्वासात घेऊन शिकून घेणे गरजेचे आहे.
 3. डेबिट कार्ड वापरून तुम्ही दिवसाला जास्तीत जास्त ४० हजार काढू शकतात. त्याहून जास्त रक्कम साठी तुम्हाला बँकेतच जावं लागेल.
 4. डेबिट कार्ड ATM मध्ये टाकून जेव्हा आपण पैसे काढायला जातो, तेव्हा कधी कधी पैसे हातात मिळतच नाही आणि खात्यातून पैसे debit झालेले असतात. अशा वेळेस बँकेत जाऊन तक्रार द्यावी लागते. आणि ते solve होई पर्यंत आपल्याला पैस्या साठी वाट बघावी लागते.
 5. डेबिट कार्ड च्या दिलेल्या लिमिट पेक्षा जास्त वापरल्यास अतिरिक्त प्रत्येक वापरावर शुल्क भरावा लागतो.

हे देखील वाचा,

डेबिट कार्ड साठी registration / apply कसे करावे? | How To Apply For Debit Card In Marathi

Debit card kase kadhayche? हा प्रश्न अनेकदा अनेक लोक विचारत असतात किंवा या बाबत ते थोडे confuse असतात, याचे कारण असे की बर्‍याच लोकांना बँकिंग विषयाबद्दल आधिक माहिती नसते.
चला तर या पोस्ट च्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया,

जेव्हा आपण कोणत्याही बँकेत नवीन खाते तयार करता, मग ते बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणतेही असो. तरच तुम्हाला पासबुक, चेकबुक सोबत डेबिट कार्ड सुद्धा दिले जाते ज्याला तुम्ही एटीएम कार्ड देखील म्हणू शकता. पण जर बँकर्सनी तुम्हाला हे डेबिट कार्ड प्रदान केले नसेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही कारण तुम्ही ते सहज मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

डेबिट कार्ड काढण्याचे किंवा डेबिट कार्ड साठी apply करायचे २ मुख्य प्रकार आहेत

 1. Online डेबिट कार्ड साठी apply करणे
 2. Offline डेबिट कार्ड साठी apply करणे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन डेबिट कार्ड रेजिस्ट्रेशन बद्दल सविस्तर बघूया,

आपण एक काम करूया, उदाहरणार्थ एखादी बँक च्या डेबिट कार्ड काढण्याची प्रोसेस समजून घेऊ. हीच सेम प्रोसेस कोणत्याही बँकेत लागू होईल. तर आपण उदाहरणार्थ sbi बँक चे डेबिट कार्ड कसे काढतात या बद्दल माहिती घेऊया.

ऑनलाईन डेबिट कार्ड कसे apply करावे किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड कसे काढावे?

ऑनलाईन डेबिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ज्या बँकेचे डेबिट कार्ड हवे आहे त्यांच्या अधिकृत Website वर जावे लागेल.

 1. Step 1 – SBI डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
 2. Step 2 -SBI इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला ई-सेवा बटण असलेला डॅशबोर्ड दिसेल. एसबीआय डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या बटणावर क्लिक करावे लागेल.
 3. Step 3– ई-सर्व्हिसेसच्या बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर उघडणार्या डॅशबोर्डमध्ये अनेक पर्याय असतील. त्याच वेळी, तुम्हाला ATM Card Services पर्याय निवडावा लागेल.
 4. Step 4 – एटीएम कार्ड सेवांवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला 5 पर्याय मिळतील ज्यात तुम्हाला नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी Request ATM/ Debit Card पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 5. Step 5 – Request ATM / Debit Card वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड उघडेल. येथे तुम्हाला तुमचे नाव आणि तुम्हाला हवे असलेले डेबिट कार्डचा प्रकार निवडायचा आहे.
  • आता या ठिकाणी गोंधळून जाऊ नका. इथे अनेक प्रकारचे डेबिट कार्ड निवडण्याचे पर्याय दिसतील, परंतु तुम्ही तुमच्या गरजेनुसार डेबिट कार्ड निवडावे. जर तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाइन फक्त भारतातच वापरायचे असेल तर तुम्ही रुपे डेबिट कार्ड निवडायला हवे.
  • आणि जर तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डासाठी ऑनलाईन व्यवहार करायचा असेल किंवा परदेशात वापर करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल इंटरनॅशनल व्हिसा किंवा मास्टर कार्डसाठी अर्ज करावा.
 6. Step 6 – SBI डेबिट कार्डचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला I Accept Terms & Conditions वर क्लिक करावे लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
 7. Step 7 – आता तुमचा पत्ता तुमच्या समोर उघडा असेल, हा पत्ता तो पत्ता आहे ज्यावर तुमचे SBI डेबिट कार्ड Deliver केले जाईल.
 8. Step 8 – आता तुम्हाला तुमच Verification कराव लागेल, यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिल्या ओटीपीच्या मदतीने जो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. दुसरा तुमचा प्रोफाइल पासवर्ड. तुम्ही तुमच्यानुसार दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

ही सर्व प्रक्रिया योग्यरित्या केल्यावर, तुमचे डेबिट कार्ड लागू केले जाईल आणि तुमचे डेबिट कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पुढील १० ते १५ दिवसांत तुम्हाला वितरित केले जाईल.

डेबिट कार्डसाठी अर्ज करताना आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स (Required Documents for debit card application in marathi)

Proof of IdentityProof of Address
PassportTelephone Bill
PAN CardElectricity Bill
Ration CardAadhaar Card
Aadhaar CardRation Card
Voter’s ID CardRental Agreement
Driving License
Necessary Documents to apply for a debit card

ऑफलाइन डेबिट कार्ड कसे Apply करावे किंवा ऑफलाइन डेबिट कार्ड कसे काढावे?

 1. जर तुम्हाला ऑफलाइन डेबिट कार्ड लागू करायचे असेल, तर यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल.
 2. बँकेत गेल्यावर तुम्ही थेट डेबिट कार्ड काउंटरवर जा आणि डेबिट कार्ड साठी असलेला अर्ज घ्या आणि तो सविस्तर भरा.
 3. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला १५ ते २० दिवस थांबावे लागेल. तुम्ही नमूद केलेल्या पत्त्यावर डेबिट कार्ड डिलिव्हर केले जाईल.
 4. बऱ्याचद हे डेबिट कार्ड लगेच दिले जाते. त्याच वेळी, डेबिट कार्ड मिळवल्यानंतर, आपल्याला त्याच्या आत असलेल्या पिन कोडच्या मदतीने ते active करावे लागेल. या बद्दलच्या सर्व guidelines तिथे सविस्तर नमूद केलेल्या असतात.
 5. एक गोष्ट जी तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तुमच्याकडे ठेवावी लागेल कारण तुमच्या मोबाइलवर ओटीपी activation च्या वेळी येऊ शकतो.

ATM पिन विसरल्यावर नविन पिन साठी बँकेला अर्ज कसा करावा – How to apply for a new PIN after forgetting the ATM PIN in Marathi

ATM पिन विसरल्यावर नवीन पिन साठी असा करा बँकेला अर्ज

FAQ: डेबिट कार्ड माहिती

डेबिट कार्ड काढण्यासाठी किती फी भरावी लागते?

हि फी प्रत्येक बँकेसाठी वेग वेगळी आहे परंतु २५० ते ४५० च्या दरम्यान हि फी असू शकते.

ATM कार्ड मिळवण्यासाठी किती वय पूर्ण असावे लागते ?

ATM कार्ड मिळवण्यासाठी 18 वय पूर्ण असावे लागते ?

डेबिट कार्ड चे प्रकार किती आहेत?

डेबिट कार्ड चे एकूण ५ प्रकार असतात.
1. रुपे डेबिट कार्ड
2. मास्टर कार्ड
3. वीजा डेबिट कार्ड
4. मैस्ट्रो डेबिट कार्ड
5. कॉन्टैक्टलेस डेबिट कार्ड

एटीएम आणि डेबिट कार्डमध्ये काय फरक आहे?

एटीएम मशीन व्यतिरिक्त, डेबिट कार्ड स्टोअर किंवा रेस्टॉरंटमध्ये वापरता येतात आणि ऑनलाइन पेमेंटसाठी देखील वापरले जाऊ शकतात. एटीएम कार्ड प्रमाणेच डेबिट कार्ड तुम्हाला तुमच्या बचत खात्यातून पैसे वापरण्याची परवानगी देते. हे क्रेडिट कार्डपेक्षा वेगळे आहे कारण ग्राहकाला व्याज भरावे लागत नाही.

ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Automatic Teller Machine (ऑटोमेटिक टेलर मशीन)

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण डेबिट कार्ड म्हणजे काय? डेबिट कार्ड चे प्रकार किती व कोणते आहेत? डेबिट कार्ड चे फायदे तोटे, डेबिट कार्ड साठी APPLY कसे करावे? इत्यादी, या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला.
अशा करतो कि तुम्हाला या पोस्ट मधून नक्कीच मदत मिळाली असेल. आणि पोस्ट आवडल्यास कॉमेंट आणि शेअर करायला विसरु नका. धन्यवाद !!!

आमच्या इतर काही पोस्ट,

Team, 360Marathi

Leave a Comment

close