नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत योजना माहिती दिलेली आहे
तर चला मग पाहूया कि आयुष्मान भारत योजना काय आहे
आयुष्मान भारत योजना ही आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देते. जेणेकरून त्या व्यक्ती कॅन्सर आणि हृदय रोग यांसारख्या आजारांचा इलाज करू शकतील.
आयुष्मान भारत योजनेची घोषणा
माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे 2018 – 19 च्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली.
योजनेची सुरुवात
या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2018 रोजी करण्यात आली. आयुष्मान भारत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 14 एप्रिल 2018 म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी छत्तीसगडमधील ‘ बिजापूर ‘ जिल्ह्यातून शुभारंभ करण्यात आला.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी 25 सप्टेंबर 2018 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे ही योजना ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.
आयुष्मान भारत योजनेचे उद्देश
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आर्थिक स्वरूपाने कमजोर असलेल्या व्यक्तींना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे कॅन्सर आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा उपचार करता येईल.
योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कुटुंबास 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करण्यात येईल. तसेच 10 कोटी कुटुंब या विम्याचा प्रत्यक्ष लाभ प्राप्त करू शकणार आहेत. या योजनेमध्ये राष्ट्रीय आरोग्य विमा योजना ( 2008 ) सामाविष्ट करण्यात आली आहे.
योजनेचे लक्ष्य
आयुष्मान भारत योजना ही अंदाजे 10.74 कोटी गरीब, वंचित ग्रामीण कुटुंब आणि विस्तारित असलेले शहरी कामगार यांच्यापर्यंत कुटुंब विमा सुविधा पुरविणार आहे.
आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड केंद्र शासनाकडून केली जाईल यासाठी केंद्राने आपली अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लभार्थ्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक – आर्थिक जात गणना ( SECC – 2011 ) च्या आधारे करण्यात येते.
योजनेचे नाव ओळख
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री केअर सेंटर. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कॅन्सर व हृदयविकार यांसारख्या 1300 आजारांचा समावेश करण्यात आलेला असून 13,000 पेक्षा अधिक दवाखान्याचा समावेश यात करण्यात आलेला आहे.
टोल फ्री नं : 14555
आयुष्मान भारत योजना गोल्डन कार्ड ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
आपल्याला https://mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि एचएचडी कोड निवडावा लागेल. या कोडनंतर सामान्य सेवा केंद्रात आयुष्मान मित्राला द्यावे लागेल. आयुष्मान मित्र कॉमन सर्व्हिस सेंटर पुढील प्रक्रिया पूर्ण करेल.
Team 360Marathi.in