किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती | Kisan Credit Card Scheme in Marathi

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती | Kisan Credit Card Scheme in Marathi

नमस्कार मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजना बद्दल बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रश्न आहेत, कि किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय ? याचा फायदा तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकतात इत्यादी

म्हणून आम्ही हि पोस्ट घेऊन आलोय ज्यात आम्ही किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती दिली आणि आणि सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला आहे

तर चला मग सुरु करूया आजची पोस्ट आणि पाहूया किसान क्रेडिट कार्ड योजना बद्दल माहिती

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. या योजनेअंतर्गत कर्ज मिळवून शेतकरी आपली शेती चांगली करु शकतील. या योजनेचा लाभ देशातील 14 कोटी शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांचे व्याज ओझे कमी करणे हे या योजनेचे मुख्य लक्ष आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात 

या योजनेची सुरुवात सन 1998 – 99 साली करण्यात आली.

• पुरस्कृत बँक – व्यापारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक व सहकारी बँक 

किसान क्रेडिट कार्ड उद्देश 

शेतकऱ्यांसाठी अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे.उद्दिष्ट्ये – 

 1) शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी खर्च देणे.

 2) कापणी, मळणी, साठवणूक आणि वाहतूक खर्च करणे.

 3) शेतकऱ्यांच्या दैनंदिन आणि घरगुती गरजांची पूर्तता करणे.

4)  शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीच्या अवजारांची देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करणे.

 5) संपूर्ण शेतीविषयक उपक्रमांसाठी खेळते भांडवल.

2020 – 21 नुसार किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुधारित नियमावली आणि योजनेसाठी पात्रता – 

सर्व शेतकरी हे वैयक्तिक आणि संयुक्त भूधारक असले पाहिजे.

भाडेकरू शेतकरी 

ज्या शेतकऱ्यांची नावे किसान सन्मान निधी लाभार्थी यादीमध्ये असेल असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेची लाभ आणि वैशिष्ट्ये – 

 शेतकऱ्यांना विनातारण 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध 

नियमित कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना 4% व्याजदर आणि अनियमित भरल्यास 7% व्याजदर लावला जाईल.

3 लाख रुपयांपर्यंत च्या किसान क्रेडिट कार्डवर सर्व प्रक्रिया शुल्क माफ केला जाईल. 

1 लाख रुपयांच्या आतील कर्जावर व्याज नसेल. 

परतफेड – 

        1) खरीप पिके – पुढील मार्च

        2) रब्बी पिके – पुढील जून

        3) बागायती पिके – पुढील सप्टेंबर

वार्षिक पूनार्वलोकानुसर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 वर्ष असेल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – 

    कर्जासाठी अर्ज करावयाचा असल्यास फॉर्म नं – 138 अँक्लोजर B2

    अर्जदाराचे 7/12, 8 ए, 6 डी. ई. सर्व उतारे चातूर्सिमा 

    PACS सह आसपासच्या वित्तीय संस्था कडून अर्जदाराचे ना देय प्रमाणपत्र 

     1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेसाठी ज्या ठिकाणी जमीन गहाण ठेवली जाते अशा कर्जासाठी बँकेच्या पॅनेलवर असलेल्या वकिलाचा कायदेशीर सल्ला 

    इ. प्रकारचे कागदपत्र आवश्यक आहेत.

Source : Youtube.com
या योजनेअंतर्गत भारतातील 2.5 कोटी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारद्वारे वितरित करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत मासेमारी करणारे आणि पशुपालक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 2020 अंतर्गत Income Tax अंतर्गत येणारे शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात.

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close