संगणक माहिती मराठी | Computer Information in Marathi

Topics

Computer Information in Marathi : नमस्कार मित्रांनो, तुमचं ३६०मराठी या मराठी ब्लॉग वर स्वागत आहे. आज आपण संगण्क म्हणजे काय? संगणकाचा इतिहास, त्याची उपयुक्तता आणि वशिष्ट्ये या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर सुरु करूया,

संगणक काय आहे? | What Is Computer In Marathi

संगणकाची व्याख्या – संगणक एक असे मशीन आहे जे युजर ने INPUT केलेल्या डेटा वर प्रक्रिया करून सूचनांना RESULT च्या रूपात प्रदर्शित करते, किंवा सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर,संगणक हे असे ELECTRONIC DEVICE आहे जे युजर कडून दिल्या गेलेल्या सूचनांचं पालन करते.

Computer Information in Marathi

संगणक(काँप्युटर) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे.संगणक शब्दाची फोड – सं + गणक म्हणजे सूक्ष्म आणि किचकट विशेष सांख्यिकी गणना करण्यासाठी बनवले गेलेले आधुनिक यंत्र. तसेच

Computer हा शब्द, Latin शब्दकोषातीला आहे “computare” या शब्दापासून computer शब्द बनवला गेलेला आहे.याचा अर्थ Calculation करने किंवा गणना करने असा आहे. परंतु कॉम्प्युटर आता फक्त गणना करण्यापुरता मर्यादित नाही राहिलेत. या संगणकाच्या सहाय्याने तुम्ही तुमचा पर्सनल डेटा साठवून ठेवू शकता, तुमच्या महत्वाच्या फाइल्स तुम्ही यात सुरक्षित ठेवू शकतात, काही सेकंदात तुम्ही घरी बसून ई-मेल पाठवू शकतात, MOVIE बघू शकतात, फोटो विडिओ EDIT करू शकतात,आणि अजून अशा असंख्य गोष्टी तुमच्या या संगणकामुळे अगदी सोप्प्या झाल्या आहेत.

संगणकाचा शोध कोणी लावला? | Computer Cha Shodh Koni Lavla?

आधुनिक संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? अशा प्रकारे या संगणकीय क्षेत्रात बर्‍याच जणांचे योगदान आहे. परंतु या सर्वांपैकी चार्ल्स बॅबेजने अधिक योगदान दिले. त्याने प्रथम १८३७ मध्ये Analytical Engine चा शोध लावला. चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक देखील म्हटले जाते, जगातील पहिल्या यांत्रिक संगणकाच्या सिद्धांताचा शोध घेण्याचे श्रेय त्याला जाते.

संगणकाचा शोध कोणी लावला? | Computer Cha Shodh Koni Lavla?

आजही बर्‍याच लोकांमध्ये असा विश्वास आहे की १६२२ मध्ये आलेला Abacus  जगातील पहिला संगणक होता. ज्याचा शोध “William Oughtred” लावला होता. परंतु आपण आज वापरत असलेल्या आधुनिक संगणकांच्या Analytical Engine ने पाया घातला होता. याची सुरुवात ब्रिटीश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी 1833 ते 1871 दरम्यान केली होती.

कॉम्प्युटर काम कसे करते? Sanganak Kam Kase Karte?

आपण बघितले संगण्क म्हणजे काय? त्याचा शोध कोणी लावला? आता बघूया संगणकाची कार्यप्रणाली / Computer Functions in marathi

संगणक प्रामुख्याने तीन कार्ये करतात. पहिला डेटा घेने ज्यास आपण इनपुट देखील म्हणतो. दुसरे कार्य म्हणजे त्या डेटावर प्रक्रिया करणे आणि नंतर प्रक्रिया केलेला डेटा दर्शविणे ज्यास आउटपुट असे म्हणतात.

इनपुट (Input) → प्रोसेसिंग (Processing) → आउटपुट (Output)

  1. Input साठी, संगणकामध्ये कीबोर्ड, माउस इ. इनपुट साधने वापरले जातात, तसेच संगणकाला सॉफ्टवेअर द्वारे आज्ञा किंवा सूचना देता येते किंवा डेटा प्रविष्ट केला जातो .
  2. नंतर दुसर्या प्रक्रियेत म्हणजेच processing मध्ये आपण दिलेली कमांड किंवा डेटा सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध माहिती आणि निर्देशांनुसार प्रोसेसरद्वारे प्रक्रिया केली जाते.
  3. शेवटी असतो Output म्हणजे आपण दिलेल्या कमांडवर आधारित प्रक्रिया केलेल्या माहितीचे आऊटपुट म्हणजेच माहिती प्रदर्शित करणे, जे आपल्याला संगणकाद्वारे दिले जाते, जे आउटपुट डिव्हाइसद्वारे प्राप्त होते.

इनपुट म्हणजे काय?

संगणकाची पहिली प्रक्रिया म्हणजे Input. इनपुट ही एक Step आहे ज्यात इनपुट डिव्हाइस वापरुन संगणकात कच्ची माहिती घातली जाते. हे एक पत्र, चित्र किंवा एक व्हिडिओ देखील असू शकते. असे समजा कि या स्टेप च्या मदतीने आपल्याला संगणकामध्ये कोणतीही गोष्ट SAVE करण्यास मदत होते.

इनपुट डिव्हाइस | Computer Input Device Information In Marathi

इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? संगणकामध्ये इनपुट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कीबोर्ड, माउस इ. इनपुट साधने वापरले जातात, तसेच ते संगणकाला सॉफ्टवेअर द्वारे आज्ञा किंवा सूचना देता येते किंवा डेटा प्रविष्ट केला जातो. इनपुट डिव्हाइस अशी असतात की त्यांच्या सहाय्यानेआपला डेटा आणि सूचना संगणकात संग्रहित केल्या जाऊ शकतात किंवा प्रविष्ट केल्या जाऊ शकतात इनपुट साधने main मेमरी मध्ये संचयित केलेला डेटा आणि निर्देश बायनरीमध्ये रूपांतरित करतात.

संगणकांच्या इनपुट डिव्हाइस ची यादी | Sanganakachya Input Devices Chi List

  1. माऊस
  2. की-बोर्ड
  3. Scanner
  4. पेनड्राईव
  5. माइक्रोफोन
  6. कार्डरीडर 
  7. डी.वी.डी.ड्राइव

आउटपुट म्हणजे काय?

आउटपुट हि संगणकाची शेवटची प्रक्रिया असते. Output म्हणजे आपण दिलेल्या कमांडवर आधारित प्रक्रिया केलेल्या माहितीचे आऊटपुट म्हणजेच माहिती प्रदर्शित करणे, जे आपल्याला संगणकाद्वारे दिले जाते, जे आउटपुट डिव्हाइसद्वारे प्राप्त होते.

आउटपुट डिव्हाइस | Computer Output Device Information In Marathi

आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? यूजर ने दिलेल्या कमांडच्या किंवा सूचनेच्या आधारे प्रक्रिया केलेल्या माहितीचे आउटपुट आपल्याला संगणकाद्वारे दिले जाते, जे आपल्याला आउटपुट डिव्हाइस किंवा आउटपुट युनिटद्वारे प्राप्त होते. आउटपुट डिव्हाइस हे एक हार्डवेअर आहे. संगणकाचे मॉनिटर हे सर्वात चांगले आउटपुट डिव्हाइस आहे, यास i/o devices म्हणतात.

संगणकांच्या आउटपुट डिव्हाइस ची यादी | Sanganakachya Output Devices Chi List

Here is the List Of Computer Output Devices In Marathi

  1. मॉनिटर
  2. प्रिंटर
  3. स्पीकर
  4. हेडफोन
  5. प्रोजेक्टर
  6. प्रिंटर
Input & Output devices in marathi

संगणकाचे महत्वाचे भाग आणि त्यांची कार्ये | Computer che Parts ani tyanchi karye

तुम्हाला संगण्क म्हणजे काय आणि कॉम्प्युटर ची कार्यप्रणाली बद्दल समजले असेल. आता आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर चे सर्व भाग आणि त्यांची कार्ये या बद्दल माहिती देणार आहोत.

मित्रांनो, संगणक एक मशीन आहे आणि संगणकाच्या या मशीनरी parts ला संगणकाचे हार्डवेअर म्हटले जाते परंतु असे नाही की हार्डवेअर एकट्यानेच सर्व काम करू शकते. संगणकाचा दुसरा भाग देखील असतो ज्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो आणि याच सॉफ्टवेअरच्या मदतीने हार्डवेअरला सूचना देण्यात येतात. असे समजा कि हार्डवेअर संगणकाचे शरीर आहे तर सॉफ्टवेअर हे संगणकाचा आत्मा आहे आणि दोघांनी काम करणे आवश्यक आहे, कोणतेही काम करण्यासाठी ते संगणकाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींमधून महत्वाचे आहेत. हार्डवेअरचे आणि त्यांचे स्वतःचे स्वतंत्र कार्य आहेत जसे कि कीबोर्ड इनपुट देते आणि प्रिंटर आपल्याला आउटपुट देते अशा प्रत्येक कॉम्प्युटर parts चे वेग वेगळे कार्य आहेत, त्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

List Of Computer Parts And Their Uses in Marathi

  1. माउस ( Mouse )
  2. मॉनिटर ( Monitor )
  3. सेंट्रल प्रोसेसिंग ( Central Processing Unit )
  4. कीबोर्ड ( Keyboard )
  5. यू.पी.एस

1. माउस (Mouse) –

माउस संगणकाचा वापर सुलभ करते, हे एक प्रकारे रिमोट डिव्हाइस तसेच माउस इनपुट डिव्हाइस आहे. यामुळे आपल्याला मॉनिटर वर कोणतिही गोष्ट हाताळणे सहज सोप्पे होते. यात एक cursor असतो जो मॉनिटर वर एका बाणाच्या रूपात दिसत असतो. तो कर्सर आपण हाताने जसा mouse हलवतो तसा तो मॉनिटर वर हलतो. mouse मुळे आपण कॉम्प्युटर मध्ये सेव्ह असलेल्या कोणत्याही गोष्टी ओपन, close, edit, delete सर्व काही एका बटनावर करू शकतो.

computer Mouse information in marathi -

2. मॉनिटर (Monitor)

मॉनिटर किंवा एलसीडी: – मॉनिटर चा उपयोग म्हणजे संगणकात चालू असलेल्या किंवा आपण कार्य करत असलेल्या सर्व गोष्टीं प्रदर्शित करणे. मॉनिटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर मुळे आपल्यला आपण करत असलेले काम डोळ्यांना दिसते. काही काम करायचे असल्यास, एखादी फाईल सेव्ह करायची असेल किंवा एखादी गोष्ट edit अथवा delete करायची असेल तर फक्त mouse किंवा कीबोर्ड असून फायदा नाही, जो पर्यंत आपल्या डोळ्यांना ती गोष्ट दिसत नाही तो पर्यंत पुढे काम होऊच शकत नाही आणि हेच महत्वपूर्ण काम मॉनिटरच असत.

computer monitor information in marathi

3. कीबोर्ड (Keyboard)

हे संगणकात टाइप करण्यासाठी वापरले जाते, ते एक इनपुट डिव्हाइस आहे, आपण फक्त कीबोर्डद्वारे संगणक चालवू शकतो. कारण कीबोर्ड नसेल तर कोणताही इनपुट देणे अशक्य होईल. कीबोर्ड मुळे आपण फाइल्स मध्ये changes करू शकतो, महत्वाची माहिती documents मध्ये type करू शकतो, त्यांनतर काही shortkeys असतात आणि त्याचे तुंम्हाला ज्ञान असेल तर त्या वापरून तुम्ही mouse नसला तरी काही प्रमाणात कॉम्प्युटर चालवू शकतात.

Keyboard information in marathi

4. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing Unit)

सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट): – CPU हा संगणकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. CPU ला संगणकाचा मेंदू देखील म्हणतात. कारण संगणकाच्या सर्व महत्वाचे भाग जसे कि MOTHERBOARD, RAM, मेमोरि, CD-DRIVE इत्यादी यातच फिट केलेले असते.

5. यू.पी.एस (Uninterruptible Power Supply)

यूपीएस (अनइंटर्प्टेबल पावर सप्लाई): – यामुळे घरातील light एकदम गेल्यास कॉम्प्युटर बंद होण्यापासून वाचवते. हा battery backup आहे, जेणेकरून घरातील light गेल्यास आपले कॉम्प्युटर बंद होत नाही आणि आपले केलेले काम सुरक्षित राहते.

कॉम्प्युटर चे प्रकार | Types of Computer in Marathi

जरी संगणकाचे प्रकार फार आहेत, परंतु त्यांना सहजपणे समजण्यासाठी ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. जेणेकरून कोणालाही ते समजणे सोपे होईल.

मुख्यतः ते तीन वेगवेगळ्या आधारावर विभागले गेले आहेत.

  1. यंत्रणेवर आधारित (Based on Mechanism)
  2. उद्देशानुसार (Based on Purpose)
  3. आकारावर आधारित  (Based on Size)
  1. यंत्रणेवर आधारित संगणकाचे प्रकार (Based on Mechanism)
    • Analog,
    • Digital, and
    • Hybrid
  2. उद्देशानुसार (Based on Purpose)
    • General Purpose Computers – डेस्कटॉप संगणक,स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई.
    • Special Purpose Computers – Robot helicopter, Navigational system, etc
  3. आकारावर आधारित  (Based on Size)
    • सुपर कॉम्पुटर/ महासंगणक (Super Computer)
    • मेनफ्रेम संगणक (MainFrame Computer)
    • मिनीफ्रेम संगणक (Mini Computer)
    • Micro Computer
    • Laptop Computers
    • पाल्मटॉप कॉम्पुटर (PALMTOP Computer)

संगणकाचे सर्व प्रकार व त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचू शकतात

संगणकाचे ११ प्रकार, माहिती, उपयोग, कार्यक्षमता | Types Of Computer in Marathi with information, purpose, etc

संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

बघा मित्रानो, Computer Hardware म्हणजे अशी Physical Device किंवा वस्तू जी तुम्ही हाथ लावू शकता किंवा डोळ्याने बघू शकता. जसे कि मॉनिटर, कीबोर्ड ..हे hardware आहेत.


तसेच Computer Software म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही व ज्याला हाथ लावून काम करता येत नाही. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे एक codes च collection असत जे आपण hardware ला run करण्यासाठी machine च्या हार्ड ड्राईव्ह मध्ये install करतो. जसे कि इंटरनेट ब्राउझर ज्यावरून आपण वेबसाइटला भेट देतो आणि ज्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ते इंटरनेट ब्राउझर चालू आहे. अशा गोष्टींना आपण सॉफ्टवेअर म्हणतो.

संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे एक संयोजन आहे, दोघांचीही भूमिका समान आणि महत्वाची आहे, दोघेही एकत्र काम करू शकतात आणि दोघांनी सोबत काम केले तरच संगणक व्यवस्थित रित्या काम करेल.

संगणकाची वैशिष्ट्ये | Features Of Computer In Marathi

संगणकाने आपल्या Speed, Accuracy आणि Storage च्या सहाय्याने आपले मानव जीवन खूप सोपे केले आहे यात काहीच गैर नाही. चला संगणकाचे अजून काही वैशिष्टये बघूया…

  1. Speed – संगणक हे आधीच्या काळात calculation करणारे यंत्र म्हणून ओळखले जात होते परंतु आता संगणक हे केवळ calculation करणारे डिव्हाइस राहिले नाही. आता तो आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे.
    संगणकाचा मोठा फायदा म्हणजे त्याचा वेग, ज्यामुळे कोणतेही कार्य तात्काळ पूर्ण करण्यास मदत होते, यात जवळजवळ सर्व ऑपरेशन्स त्वरित करता येतात, जसे कि typing, मोठं मोठे calculations, engineering Drawing आणि कॉम्प्युटर शिवाय ती काम करायला खूप वेळ लागेल.
  2. मल्टीटास्किंग – मल्टीटास्किंग हा संगणकाचा एक चांगला फायदा आहे. सांगणात एकाच वेळी तुम्ही अनेक गोष्टी परफॉर्म करू शकतात जसे कि एका टॅब मध्ये तुम्ही EXCEL SHEET बनवत असाल तर दुसर्या ठिकाणी त्याच वेळी तुम्ही WORD DOCUMENT तयार करू शकतात, तिसऱ्या टॅब मध्ये गाणे लावून ऐकू शकतात. यामध्ये, एखादी व्यक्ती अनेक कार्ये, एकाधिक ऑपरेशन्स, काही सेकंदात संख्यात्मक समस्यांची सहज गणना करू शकते. संगणक प्रति सेकंदात ट्रिलियन सूचनांमध्ये सहज गणना करू शकतो. म्हणून मनुष्याचे जीवन वेगवान करण्यात संगणकाचा फार मोलाचा सहभाग आहे.
  3. STORAGE – संगणकात आपण आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी STORE करू शकतो, जसे कि तुमच्या ऑफिस च्या महत्वाच्या फाइल्स, तुमचे कौटुंबिक फोटो, MOVIES, PDF फाइल्स आणि अजून बरच काही. यामुळे आपला डेटा अगदी सेफ असतो. ज्या गोष्टी आपण स्वतः सांभाळू नाही शकत त्या सर्व गोष्टी संगणक सहजपणे स्वतःकडे STORE करून सुरक्षित ठेवतो.
  4. वर्क फ्रॉम होम – सध्याच्या कोरोना काळात LOCKDOWN मुळे बऱ्याच कंपन्या आपल्या WORKERS ला घरून काम करण्यास सांगत आहे. आता घरून काम करायचे म्ह्टल्यावर संगणक असल्याशिवाय पर्याय नाही. संगणकाला इंटरनेट जॉईन करून बऱ्याच कंपन्या या LOCKDOWN मध्ये सुद्धा चालू होत्या.

अजून कॉम्प्युटर चा उपयोग फोटो विडिओ एडिटिंग, engineering drawing आणि calculations, मोठ्या कंपन्यांचे database, मेडिकल industry मध्ये मेडिसिन्स चा database अशा असंख्य ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो,

संगणकाचा उपयोग/फायदे | Sangankache Fayde (Benefits of computer in marathi)

संगणकाचा उपयोग कुठे होतो? (Application of Computer In Marathi) – जर पाहिले तर आपण आपल्या जीवनात आता जवळ जवळ सर्वत्र संगणक वापरत आहोत जसे कि शाळा, OFFICES, court, इत्यादी आणि वापरत राहू. असे एक क्षेत्र नाही जिथे कॉम्प्युटर सिवापरला जात नाही. संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भागासारखा झाला आहे. मी आपल्यासाठी खाली संगणकाचे काही उपयोग लिहिले आहेत.

  1. आरोग्य आणि औषधासाठी संगणकाचा उपयोगसंगणक हे आरोग्य आणि औषधासाठी एक वरदानापेक्षा कमी नाहीये. यामुळे ऑपरेशन्स सुद्धा अगदी सहज झाली आहेत. संगणकाच्या मदतीने आजकाल रूग्णांवर उपचार खूप सहजपणे केले जातात. आजकाल सर्व काही डिजिटल झाले आहे, ज्यामुळे कोणताही रोग सहज ओळखला जातो आणि त्यानुसार त्याचे उपचार देखील शक्य होतात. कॉम्प्युटर मुळे लवकरात लवकर रोग समजून येतो व त्याचे निदान करणे शक्य होते, आणि याचमुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचतवणे डॉक्टरांना शक्य होत आहे.
  2. शिक्षणाच्या क्षेत्रात संगणकाचा उपयोग – तज्ञांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की संगणकाच्या मदतीने कोणत्याही विद्यार्थ्यांची शिकण्याची कामगिरी लक्षणीय वाढली आहे. आजकाल घरी बसून ऑनलाइन वर्गांच्या मदतीने अभ्यास करता येतो. मुलांना संगणकावर शिक्षण घ्यायला सुद्धा रस असतो. शिक्षणामध्ये संगणकाचा सर्वात मोठा हात आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यास एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर या मदतीने काही मिनिटांत ही माहिती त्याच्यासाठी उपलब्ध होते. बालवाडी पासून ते अगदी पदवी पर्यंत संगणकाचा वापर सध्या होत आहे, कारण यामुळे शिक्षण हे फार सोप्पे झाले आहे असे म्हणावे लागेल.
  3. विज्ञानाच्या क्षेत्रात संगणकाचा उपयोग – खरं तर संगणक ही विज्ञानाची च देणगी आहे. आणि आता हेच संगणक संशोधन करणे खूप सोपे करते आहे. रस्त्यावरच्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन असो किंवा मोठं मोठ्ठया इमारतींसाठी ENGINEERS करत असलेले CALCULATIONS असो नाहीतर चंद्रावर, मंगळावर सोडण्यात आलेले यान असो प्रत्येक ठिकाणी संगणकाचा सर्वात मोठं योगदान आहे. आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहे ज्याला Collaboratory असेही म्हणतात, जेणेकरुन जगातील सर्व शास्त्रज्ञ एकत्र काम करू शकतील, आपण कोणत्या देशातील आहात हे काही फरक पडत नाही. उलट आता असं म्हणावं लागेल कि विज्ञानामुळॆ संगणक उदयास आले पण आता तेच संगणक विज्ञानाला पुढे जायला मदत करतंय.
  4. मनोरंजन आणि करमणूक – करमणुकीसाठी संगणक हे एक नवीन आश्रयस्थान बनले आहे, आपण चित्रपट, खेळ किंवा विश्रांती अशा कशाबद्दलही बोला, संगणक सर्वत्र वापरले जातात. television वर चालणारे नाटक, movie यामुळे आपले मनोरंजन होते. पण त्या मनोरंजनामागे संगणकाचा केवढा मोठा हात आहे कधी विचार केलाय का? एखादा movie ची किंवा सिरीयल चोरी शूटिंग करण्यापासून ते एडिटिंग आणि प्रदर्शित करण्यापर्यंत कॉम्प्युटर शिवाय एकही काम होत नाही. म्हणजे पूर्वी मनुष्य करमणुकीसाठी माणसाला शोधायचा पण आता कॉम्प्युटर असले तरीही माणूस स्वतःच स्वतःचे मनोरंजन करू शकतोय.
  5. व्यवसायात संगणकाचा उपयोग – व्यवसायात म्हणाल तर आत्ताच्या काळात, शेअर ट्रेडिंग, मार्केटिंग, बँकिंग, सगळीकडे संगणकाचा बहुमूल्य वाटा आहे. प्रत्येक business मध्ये प्रॉफिट लॉस चे सगळे गणितं सुद्धा संगणकावर होतात. याशिवाय १ सेकंदात लाखो रुपये ट्रान्सफर होतात, यामुळे पारदर्शकता व्यवसायात आली, आणि व्यवहारांचा वेग देखील वाढला. एका देशातून दुसर्या देशात पाठविलेल्या मालाचा हिशोब असो नाहीतर २ उद्योगपतींची online मीटिंग असो संगणकाने सगळ्या गोष्टी एका बटनावर शक्य करून दिल्या आहेत. उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी संगणकाचा व्यवसायात मोठा हात आहे.
  6. संरक्षणात संगणकाचा वापर – सैन्यात त्यांचा वापरही बर्‍याच प्रमाणात वाढला आहे. ज्याच्या मदतीने आता आपले सैन्य अधिक सामर्थ्यवान बनले आहे. कारण आजकाल संगणकाच्या मदतीने सर्व काही नियंत्रित केले जाते. बॉर्डर वरील रडार सुद्धा कॉम्प्युटर च्या मदतीने दुष्मन सैन्याला हवेत च पकडून घेते.

हे फक्त काहीच उदाहरणे आम्ही तुमच्या सामोर मांडली, परंतु जगात असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे कॉप्युटर चा वापर केला जात नाही. मनुष्य बर्‍याच ठिकाणी आपल्या गरजेनुसार संगणकाचा वापर करतो.

संगणकाचे तोटे | Sangankache Tote (Disadvantages Of Computer in Marathi)

प्रत्येक गोष्टीला जसे फायदे असतात तसेच तोटे/ नुकसान देखील असतात. हीच गोष्ट संगणकाच्या बाबतीत पण आहे, चला तर मग बघूया Disadsvantages Of Computer In Marathi

  1. व्हायरस आणि हॅकिंग अटॅक – व्हायरस एक destructive program आहे आणि हॅकिंग म्हणजे अनधिकृत प्रवेश ज्यामध्ये मालकास आपल्याबद्दल माहित नसते. हे व्हायरस ईमेल संलग्नकाद्वारे सहजपणे पसरविले जाऊ शकतात, कधीकधी यूएसबी वरून किंवा कोणत्याही संक्रमित वेबसाइटवरून त्या आपल्या संगणकामध्ये प्रवेश करू शकतात. एकदा आपल्या संगणकावर पोहोचल्यावर तो आपला संगणक नष्ट करतो. याशिवाय आपला प्राइवेट डाटा सुद्धा सुरक्षित नसतो.
  2. रोजगार संधी कमी – संगणक एकाच वेळी बरीच कामे करण्यास सक्षम असल्याने रोजगाराच्या संधीची मोठी हानी होते. म्हणूनच, बँकिंग क्षेत्रापासून ते कोणत्याही सरकारी क्षेत्रांपर्यंत, आपल्याला दिसेल की लोकांच्या जागी सर्व संगणकांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे बेकारी फक्त वाढत आहे.
  3. ऑनलाईन सायबर गुन्हे – संगणक आणि नेटवर्क या ऑनलाइन सायबर-गुन्हे करण्यासाठी वापरले जातात. तर सायबरस्टॅकिंग आणि ओळख चोरीसुद्धा या ऑनलाइन सायबर-गुन्ह्यांखाली येते.
  4. विद्यार्थ्यांसाठी फार चांगले किंवा अगदी वाईट – आता तुम्ही म्हणाल कि students साठी तर संगणक चांगलेच आहे हे तुम्ही आधीच सांगितले, होय अगदी बरोबर पण अलीकडे तुम्ही बघाल तर संगणकाचा वापर विद्यार्थी शिक्षणासाठी कमी तर games खेळण्यासाठी, वेवेब सिरीज किंवा movies बघण्यासाठी जास्त करायला लागलेत. यामुळं त्यांचा अति वेळ हा वाया जातो आणि त्यांचे अभ्यासात मन लागत नाही.
  5. नजर कमजोर होणे – सतत कॉम्प्युटर समोर बसणारे लोकं म्हणजे बँक मध्ये काम करणारे कर्मचारी असो किंवा सतत संगणकावर वेळ घालवणारा तरुण वर्ग असो यांच्या नजरा या कमजोर व्हायला लागतात. कारण एकाच ठिकाणी continue नजर टिकवून बसल्याने ते पण संगणक मॉनिटर च्या प्रकाशासमोर , तर अशा वेळेस चष्मा लावण्याची वेळ ओढवते.

कॉम्पुटर बद्दल सगळे महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं

संगणकाबद्दल बऱ्याचदा परीक्षेमध्ये मुलांना प्रश्न विचारले जातात किंवा काही जण general knowledge म्हणून सुद्धा संगणकाबद्दल वाचत असतात. जसे कि,

  1. संगणकाचा शोध कोणी व कितव्या शतकात लावला?
  2. भारतात सर्वप्रथम संगणक कोठे स्थापित केला गेला?
  3. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो?
  4. जगातील सर्वाधिक संगणक असणारा देश कोणता मानला जातो?
  5. पहिल्या कॉम्पुटर चे नाव कोणी आणि काय ठेवले होते?

अजून असे बरेच प्रश्न कॉम्प्युटर वर विचारले जातात.म्हणून आम्ही आपले काम सोप्पे करत संगणकावरील सगळे शक्य असलेल्या प्रश्नांची यादी करून त्याचे उत्तरं सुद्धा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचू शकता –

50+ संगणका वरील बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरं | कॉम्पुटर बद्दल सगळे महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं |कॉम्पुटर GK

कॉम्पुटर चा फुल फॉर्म काय आहे?

कॉम्पुटर चा फुल फॉर्म अशा प्रकारे असतो.
C= Common
O= Oriented
M= Machine
P= Particularly
U= United and used under
T= Technical and
E= Educational
R= Research

संगणक काय कार्य करते?

एक संगणक वापरकर्त्याकडून इनपुट घेते, त्यानुसार त्या सूचनांनुसार प्रक्रिया करते आणि त्याचा परिणाम वापरकर्त्याला त्याच्या आउटपुट डिव्हाइसद्वारे दर्शवितो.

संगणकाची सर्व कामे कोण नियंत्रित करते?

सीपीयू संगणकाच्या सर्व भागांचे कार्य नियंत्रित करते.

Written by Team 360marathi,

4 thoughts on “संगणक माहिती मराठी | Computer Information in Marathi”

Leave a Comment

close