जर तुम्हीं जॉब साठी apply करत असाल तर आकर्षक resume असणे आवश्यक आहे, म्हणून आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला resume कसा तयार करावा याबद्दल माहिती देणार आहोत, तसेच resume formate marathi pdf देखील या पोस्ट आम्ही दिलेली आहे ज्यात फक्त काही मिनिटातच तुम्ही बदल करून तुमचा resume तयार करू शकतात
तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया कि resume कसा तयार करावा ( How to Make Resume in Marathi )
Resume कसा तयार करावा | how to make resume in marathi
सर्वात आधी आपण जाणून घेऊया कि resume म्हणजे नेमका काय असते आणि तो का बनवतात,
रेझ्युमे हा एक प्रकारे तुमची माहिती ची डेटा असतो, जो फक्त एक किंवा दोन पानांचा आहे, ज्यामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर थोडक्यात लिहितो.
रेझ्युमेमध्ये, आमची सर्व माहिती प्रभावी आणि लहान स्वरूपात लिहिलेली आहे. तुम्हाला ज्या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी जॉब प्रोफाईलनुसार रेझ्युमे बनवला जातो आणि तो प्रत्येक प्रोफाईलनुसार बदलला जाऊ शकतो.
resume मध्ये काय लिहावे
मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेझ्युमे हे 1 किंवा 2 पानांचे असते. त्यामुळे तुम्हाला तुमची सर्व माहिती रेझ्युमे मध्ये पॉईंट टू पॉईंट, शॉर्ट मध्ये लिहावी लागेल.
वैयक्तिक माहिती – कोणताही रेझ्युमे आपल्या वैयक्तिक माहितीसह सुरू केला जातो. वैयक्तिक माहितीमध्ये तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता इ.
करिअर गोल- यानंतर तुम्हाला तुमच्या कॅररचे लक्ष्य किंवा ध्येय लिहावे लागेल, ज्यात तुम्ही तुमच्या कॅरियर काय लक्ष्य ठेवले आहे किंवा येत्या काळात तुम्ही तुमच्या टार्गेटसह कसे काम कराल हे दाखवावे लागेल. हा भाग तुमचे विचार देखील दर्शवतो..
शिक्षण– या विभागात तुम्हाला तुमच्या सर्व शैक्षणिक शिक्षणाचा तपशील द्यावा लागेल, कोणत्या वर्षी तुम्ही तुमच्या शाळा आणि कॉलेजच्या गुणांसह शाळा आणि महाविद्यालय उत्तीर्ण केले आहे.
इतर पात्रता– जर तुमच्याकडे काही विशेष पात्रता असेल, तर तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये त्याची माहिती देखील प्रविष्ट करू शकता, जर तुमच्याकडे कोणतेही विशेष पुरस्कार किंवा प्रमाणपत्रे असतील, तर तुम्ही त्याची माहिती देखील रेझ्युमेमध्ये देणे आवश्यक आहे.
अतिरिक्त कार्य– अतिरिक्त कार्य मध्ये आपण आपल्या क्रीडा किंवा अतिरिक्त अभ्यासक्रम विषयी माहिती देऊ शकता.
कामाचा अनुभव– येथे तुम्ही तुमच्या मागील अनुभवाची माहिती देऊ शकता. तुम्ही कोणत्या संस्थेसह आधी काम केले आहे आणि तुम्ही किती वर्षे काम केले आहे, तुम्ही कामाच्या अनुभवात सर्व तपशील देऊ शकता.
या काही टिप्स तुम्ही resume बनवतांना नक्की follow करा
चला आता पाहूया resume कसा तयार करावा
Resume तयार करण्यासाठी तुम्हाला laptop किंवा desktop computer ची गरज असेल, किंवा तुम्ही word हे अँप डाउनलोड करून देखील हे बनवू शकतात
आता खालील दिलेल्या स्टेप फोल्लोव करा
1 ) सर्वात आधी वर दिलेला resume फॉरमॅट डाउनलोड करा आणि त्याला वर्ड मध्ये उघडा
2 ) आता इथे दिलेली माहिती तुमच्या माहिती नुसार बदल करणे सुरु करा
वरील फॉरमॅट मध्ये तुम्ही सर्व गोष्टी बदला जसे कि :
- तुमचं नाव
- तुमचा फोटो
- summery
- स्किल
- experience ( अनुभव )
- education ( शिक्षण )
- hobbies ( आवड )
- contact ( संपर्क साठी नंबर आणि ई-मेल )
- आणि तुमचं linkdln अकाउंट देखील असेल तर देऊ शकतात
हे सर्व झाल्यावर आता save बटनावर क्लिक करा
आता तुमचा resume बनून तयार झालेला आहे,
अश्या प्रकारे फक्त ५ ते १० मिनटात तुम्ही resume तयार करू शकतात
निष्कर्ष :
आशा करतो स्वतःचा resume कसा बनवायचा किंवा resume कसा तयार करावा हा प्रश्न तुमचा आता संपला असेल, जर resume तयार करण्यात काही अडचण येत असेल तर कंमेंट करून नक्की सांगा
धन्यवाद
टीम ३६०मराठी