नमस्कार आज या आर्टिकल द्वारे आपण कारगिल विजय दिवस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत,
जसे कि युद्ध का आणि कसे घडले, कारगिल विजय दिवस कसा साजरा केला जातो?
आणि या पोस्ट मध्ये कारगिल विजय दिवस मराठी निबंध ( Essay on Kargil Vijay Diwas in Marathi ) देखील आम्ही दिलेला आहे.
कारगिल विजय दिवस निबंध :
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ मध्ये लढले गेलेले युद्ध होते, सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.
हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला.
हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले.
म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली.
कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे.
हिमालयाच्या इतर भागात प्रमाणे, कारगिलंमध्येही थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दीर्घ व कडक असतो व बऱ्याचदा तापमान -४० °C पर्यंतही उतरू शकते.
कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली.
लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैर्ऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.
इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला.
कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.
कारगिल विजय दिवस कसा साजरा केला जातो?
कारगिल युद्धातील विजय साजरा करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
दरवर्षी कारगिल विजय दिवशी भारतीय पंतप्रधान अमर जवान ज्योती जवळ शहिद जवानांना श्रद्धांजली वाहतात.
सगळीकडे देशभक्तीचे वातावरण असते. विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रभातफेऱ्यांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व जनतेकडून भारतीय सैन्याचे अभिवादन केले जाते.
सोशल मीडिया वर देखील बरेच कारगिल दिवस शुभेच्छा संदेश पाठवतात.
कारगिल विजय दिवस फोटो डाउनलोड
Kargil Vijay Diwav Video
कारगिल युद्धात किती भारतीय सैनिकानीं प्राण गमावले ?
युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले
कारगिल युद्धात किती पाकिस्तानी सैनिकानीं प्राण गमावले ?
४५०
कारगिल युद्ध किती दिवस चालले ?
हे युद्ध एकूण ६० दिवस चालले
कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले ( कारगिल युद्ध कधी झाले )
कारगिल युद्ध 1999 वर्षी झाले
कारगिल युद्ध कोणत्या दोन देशात झाले
Indian & Pakistan
कारगिल युद्ध पुर्ण माहिती
पूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा