10 Ways To Make Money Online in Marathi | ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

Make Money Online in Marathi :- नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे..

लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले, आणि बऱ्याच लोकांना आर्थिक अडचण आली, ज्यांचे व्यवसाय ऑफलाईन होते त्यांची दुकान बंद पडली, पण अश्या परिस्थितीत सुद्धा ज्यांचा व्यवसाय ऑनलाईन होता, किंवा जे लोक ऑनलाईन पैसे कमवत होते त्यांची इनकम जास्त वाढली,

बिल गेट्स म्हणतात कि जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन नसेल तर तुम्ही मार्केट मध्ये जास्त वेळ टिकणार नाहीत

म्हणून आज या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासोबत असेच काही मार्ग शेयर करणार आहेत ज्या द्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकतात, आणि खूप चांगल्या प्रमाणात कमवू शकतात जे तुम्ही योग्य पद्धतीने काम केले आणि संयम ठेऊन काम केले तर 

या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला काही ऑनलाईन Earning साठी माध्यम देणार आहोत ज्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट, फोन आणि कॉम्पुटर ची आवश्यकता असेल 

चला तर मग बघूया How to Make Money Online in Marathi

Make Money Online in Marathi 

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी काही उत्तम मार्ग खालीलप्रमाणे :

  • YouTube Channel
  • Facebook/ Instagram Page 
  • Freelancing 
  • Android Apps 
  • Blogging 
  • Share Market / Trading 
  • Affiliate Marketing 
  • Consulting 
  • Amazon Seller
  • Data Entry 
  • Paid Courses 
Make Money Online in Marathi | ऑनलाईन पैसे कसे कमवायचे
Make Money Online in Marathi

आता आपण प्रत्येकाबद्दल विस्तार मध्ये जाणून घेऊ…

YouTube Channel :

YouTube channel हा उत्तम मार्ग आहे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी, 

जर तुमच्यात एखादी स्किल आहे जसे तुम्हाला कूकिंग चांगली येते तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी चे विडिओ तुमच्या चॅनेल वर अपलोड करू शकतात, तुम्हाला जर विडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग किंवा काहीही स्किल जी तुम्हाला चांगल्या प्रमाणात येते त्याबद्दल तुम्ही चॅनेल सुरु करून त्यावर विडिओ बनवू शकतात 

मात्र हे लक्षात घ्या कि, YouTube हे Get-rich-quick scheme नाही म्हणजेच असे नाही कि तुम्ही आज YouTube चॅनेल सुरु केलं आणि त्यातून लगेच पैसे यायला लागतील, 

तुम्हाला त्यासाठी तुमच्या कामात सातत्य ठेवावं लागेल, तुमच्या प्रेक्षकांना जसे विडिओ आवडतात तसे अपलोड करावे लागतील, तुम्हाला एडिटिंग बद्दल शिकाव लागेल आणि इतर काही गोष्टी. 

तुम्हाला YouTube चॅनेल वरून पैसे कमवण्यासाठी त्याला Monetize करावं लागेल, त्यानंतर तुम्ही त्याद्वारे इनकम करू शकता

YouTube वर खालील माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता :

  • Advertisement ( Google Adsense )
  • Sponsorship 
  • Affiliate marketing 
  • स्वतःचे प्रॉडक्ट्स विकून 
  • Brands सोबत काम करून इत्यादी 

जर तुमच्यात अशी काही स्किल असेल तर YouTube चॅनेल नक्की सुरु करा

आणि जर अशी काही स्किल नसेल तर तुम्ही काही इतर प्रकारची चॅनेल देखील सुरु करू शकतात जसे कॉमेडी, Prank, Story, Experiments, Tips & Tricks ,Vlog अशे खूप काही..

तर अश्या प्रकारे तुम्ही YouTube वर चॅनेल सुरु करून ऑनलाईन पैसे कमवू शकतात…

Facebook/ Instagram Page :

सोशल मीडिया वर आज अशे लाखो लोक आहेत ज्या घरी बसल्या मोठ्या प्रेमात पैसे कमवताय,  फेसबुक आणि इंस्टाग्राम हे त्यातलं एक माध्यम आहे ज्याद्वारे कमवू शकतात 

तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम वर किंवा फेसबुक वर खूप pages आहेत जे memes, jokes, स्टेटस, quotes, tutorials, किंवा काही माहिती शेयर करतात, तुम्ही कधी विचार केलाय का कि ते का करतात, कारण त्यातून त्यांना पैसे मिळत असतात 

तुम्हाला बऱ्याच अकाउंट्स वर स्पॉन्सर पोस्ट्स  किंवा स्टोरी मध्ये प्रोमोशन दिसत असेल, आणि हा त्यांचा मुख्य मार्ग असतो कमवण्याचा 

जर तुमचे followers जास्त आहेत तर तुम्हाला sponsorship भेटतात ज्यासाठी तुम्ही तुमच्या फोल्लोवेर्स नुसार पैसे घेऊ शकतात 

साधारणतः १ पोस्ट किंवा स्टोरी साठी २००-१५०० रुपये तुम्हाला मिळतात, हे आणि हे तुमचे followers किती आहेत, तुमच्या अकाउंट चा टॉपिक काय आहे., तुमच्या पोस्ट वर किती लाईक्स येतात अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते 

Freelancing :

जर तुम्हाला एखादी स्किल येत असेल जर copy-writing, video एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, कोडींग ( प्रोग्रामिंग ), सोशल मीडिया मार्केटिंग, Adword Ads, SEO किंवा कोणतीही स्किल तर तुम्ही freelancing करू शकतात 

तुम्हाला काही freelancing वेबसाईट वर रजिस्टर करावे लागेल जसे, freelancerfiverrupwork, त्यांनतर तुम्हाला तिथे clients भेटतात 

जर तुमचा portfolio चांगला असेल किंवा त्या फील्ड बद्दल तुम्हाला चांगला knowledge असेल तर तुम्हाला येथून खूप क्लायंट मिळू शकतात 

Android Apps :

अँड्रॉइड अँप हा उत्तम मार्ग ठरेल जर तुम्हाला कोडींग येत असेल तर, 

तुम्ही स्वतःचे अँप्स बनवून प्ले स्टोर ला टाकू शकतात आणि त्यातून पैसे कमवू शकतात, पण यासाठी तुम्हाला आधी प्रोग्रामिंग शिकावी लागेल आणि नंतर मग तुम्ही अँप्स बनवू शकतात.. 

अँप बनवण्यासाठी तुमच्या कडे खूप मोठी आयडिया असणे असं आवश्यक नाही, खूप लोक बेसिक अँप जसे वॉलपेपर्स, जोक्स, स्टेटस, माहिती, आहे साधे अँप बनवून सुद्धा मिलिअन डाउनलोड करून घेतात 

Android App development साठी तुम्ही Java किंवा Kotlin या प्रोग्रामिंग language शिकू शकतात आणि नंतर Android studio शिकून अँप्स बनवू शकता

Blogging : 

ब्लॉगिंग सुद्धा एक उत्तम पर्याय आहे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी 

यात तुम्हाला एक ब्लॉग सुरु करायचा असतो ज्यावर तुम्ही वेगवेगळ्या विषयावर माहिती लिहू शकता, किंवा कोणत्याही एका niche ( टॉपिक ) बद्दल माहिती लिहू शकता जसे टेकनॉलॉजि, किंवा information इत्यादी 

ब्लॉग वर तुम्ही advertisement जसे गूगल ऍडसेन्स, affiliate मार्केटिंग द्वारे पैसे कमवू शकतात,

ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला Domain आणि Hosting ची आवश्यकता असते, किंवा तुम्ही blogger.com वर सुद्धा फ्री मध्ये ब्लॉग सुरु करू शकता

Share Market / Trading :

जर तुम्हाला share market बद्दल चांगली माहिती आहे तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे

अशे खूप अँड्रॉइड अँप्स आहेत जसे upstox, Groww, Zerodha, Angel Broking, ज्याद्वारे तुम्ही हे करू शकतात 

पण लक्षात घ्या शेयर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी त्याबद्दल माहिती करून घ्या नाहीतर तुमचं तुम्हाला यात लॉस सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही research केली नाही तर 

Affiliate Marketing : 

Affiliate मार्केटिंग मध्ये तुम्ही एखाद्या कंपनी चा प्रॉडक्ट किंवा सर्विस प्रमोट करतात आणि त्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळते 

जसे समजा तुमच्या मित्राला Amazon वरून Mobile घ्याचंय, तर तुम्ही त्याला तुमच्या Affiliate लिंक ने घ्यायला लावू शकता आणि त्याबद्दल तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल..

Consulting :

तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात चांगली माहिती असेल तर तुम्हीं त्याबद्दल consult  करून पैसे कमवू शकतात 

जसे समजा तुम्हाला जर digital marketing बद्दल माहिती आहे, आणि एका business मॅन ला त्याचा व्यवसाय ऑनलाईन घेऊन न्यायचा आहे,

तर तुम्ही त्याला consult करू शकतात कि कश्या प्रकारे तुम्ही तुमचा business ऑनलाईन नेणार आणि कश्या प्रकारे त्याची मार्केटिंग करणार अशी अजून काही माहिती, आणि त्या बद्दल तो तुम्हाला तुमची फीस देईल 

आज अशे हजारो लोक आहे जर फक्त consulting बिझनेस मधून लाखो कमवत आहे, पण त्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रात खूप माहिती घ्यावी लागेल 

Amazon Seller :

अमेझॉन सेलर सुद्धा पॉप्युलर पर्याय आहे, यात तुम्ही तुमचे प्रोडकट्स अमेझॉन वर लिस्ट करू शकतात आणि तुमच्या सेल्स वाढवू शकतात 

समजा तुमचा टीशर्ट प्रिंटिंग चा बिझनेस आहे, तर तुम्ही तयार केलेले टी शर्ट तुम्ही ऍमेझॉन वरून लिस्ट करू शकतात, यातून तुमच्या सेल्स मोठ्या प्रमाणात वाढतात कारण ऍमेझॉन वर शॉपिंग करणारे भरपूर ग्राहक आहेत 

Data entry : 

जर तुम्हाला excel, typing, बेसिक कॉम्पुटर च Knowledge आहे , तर तुम्ही ऑनलाईन डेटा एन्ट्री करून पैसे कमवू शकतात , त्यासाठी तुम्ही ऑनलाईन काही वेबसाईट आहेत जसे freelancer, upwork या सारख्या वेबसाईट वर रजिस्टर करावं लागेल 

Paid courses : 

या साठी तुम्ही एखाद्या स्किल मध्ये मास्टर असणे आवश्यक आहे, 

जसे समजा तुम्हाला विडिओ एडिटिंग खूप छान प्रमाणात येते , तर तुम्ही video edting बद्दल कोर्सेस बनवू बनवा आणि त्यांना विका, ते सेल करण्यासाठी तुम्ही ads चालवू शकता आणि तुमचा कोर्स प्रमोट करू शकतात..

निष्कर्ष 

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की कश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता ( Make Money Online in Marathi ) शकतात इंटरनेट द्वारे.

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल , जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

close