Marathi Abhang | ३० पेक्षा जास्त मराठी अभंग

नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही काही Marathi Abhang ( मराठी अभंग ) शेयर करणार आहोत, सोबतच मराठी अभंग mp३ आणि pdf देखील शेयर केली आहे

आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल, चला तर मग सुरू करूया आणि पाहूया ३० पेक्षा जास्त मराठी अभंग.

Marathi Abhang List :

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी Lyrics :

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी

जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी

नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी

संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई
रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स 

विठ्ठल विठ्ठल | Mauli Song Lyrics :

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

विठुमाऊली तू माऊली जगाची :

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची


माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

ज्या सुखा कारणे देव वेडावला :

ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||

धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||

नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण

सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची Lyrics :

हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा लावितो भस्म कपाडा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे
दिसे ना पुजारी
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
हाता मध्ये घेउन झारी
नंदयावरी करितो सवारी
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
माथ्यावर चंद्राची कोर
गड्या मध्ये सर्पाची हार
आवड तुला बेलाची बेलाच्या
पानाची हे भोळ्या शंकरा ..

विसरू नको रे आई बापाला मराठी Lyrics :

विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया
काया झिजउन तुझा शिरावर पडली सुखाची छाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

तुझ मिडेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्था ने गुरमटलेला हा मायेचा बाजार
जीवना मधली अमोल संधि नको घालवू वाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

आई बाप जिवंत अस्ता तू नाहीं केलि सेवा
अन मेल्यावर्ती कश्याला मनतोस देवा देवा
बूंदी लाडूच्या पंगती बसवती नंतर तू जेवाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
सोपनाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे वर काया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

Source : Youtube.com

आशा करतो कि तुम्हाला हे आजची पोस्ट Marathi Abhang ( मराठी अभंग ) आवडली असेल, लवकरच आम्ही येथे नवीन अभंग देखील ऍड करू म्हणून पुन्हा अवश्य भेट द्या

Team 360Marathi.in

Leave a Comment

close