[500+] Marathi Ukhane For Male | नवरदेवाचे उखाणे

Marathi Ukhane For male : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आपल्या संस्कृतीत उखाणा घेण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे, म्हणून आज या पोस्ट द्वारे आम्ही घेऊन आलोय ५०० पेक्षा जास्त नवरदेवाचे उखाणे,

समजायला आणि लक्षात ठेवायला सोपे असतील हि बाब लक्षात घेऊन छान कॉमेंडी उखाणे सुद्धा या पोस्ट मध्ये दिलेले आहेत.

Marathi Ukhane For Male

 • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
Marathi ukhane for male images -
 • भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
 • चंद्र आहे रोहिणीचा सोबती,………माझी जीवन साथी.
 • सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.
 • दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला

Marathi ukhane for male images 1 -
 • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा
 • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री
 • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
 • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात
 • चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, …..चं नाव घेऊन बांधतो कंकण
 • रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, ….च्या साथीने आदर्श संसार करेन
 • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल
 • आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड
 • …..माझे पिता,….माझी माता, सुमुहूर्तावर…..आणली माझी कांता
 • जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,…..च्या सहवासात झालो मी धुंद
 • प्रसन्न वदनाने आले रविराज,…..ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
 • काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात

Marathi ukhane for male images 2 -
 • मायामय नगरी, प्रेममय संसार, ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
 • जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी….म्हणजे लाखात सुंदर नार
 • गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!
 • चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा
Marathi ukhane for male images 3 -

 • चंद्र आहे चांदणीच्या संगती, आणि ….. आहे माझी जीवनसाथी
 • चंद्राला पाहून भरती येते सागराला , ….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
 • पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
 • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
 • कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,
Marathi ukhane for male images 4 -

 • नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,……चं नाव घेतो………च्या घरी.
 • जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,……च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.
 • उगवला रवी मावळली रजनी,……चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
 • जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,……सहवासात सापडतो आनंद.
Marathi ukhane for male images 4 1 -

 • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……बरोबर बांधली जीवनगाठ.
 • जगाला सुवास देत उमलती कळी,…नाव घेतो………वेळी.
 • देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,…. मुळे झाले संसाराचे नंदनवन.
 • नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,… आहे माझे जीवन सर्वस्व.
Source : Youtube.com

आशा करतो कि तुम्हाला marathi ukhane for male ( नावरीसाठी उखाणे ) हि पोस्ट आवडली असेल

जर तुमच्या कडे सुद्धा उखाणे असतील तर कंमेंट नक्की करा

धन्यवाद

Also Read : Marathi ukhane For Female

टीम ३६०मराठी

1 thought on “[500+] Marathi Ukhane For Male | नवरदेवाचे उखाणे”

Leave a Comment

close