(Free PDF) Maruti Stotra in Marathi | मारुती स्तोत्र

Maruti Stotra in Marathi : नमस्कार तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज या पोस्ट मध्ये मारुती स्तोत्र ची pdf शेयर केली आहे.

मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.

Maruti Stotra in Marathi :

भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥

महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा ।
पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥

ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें ।
कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥

ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती ।
नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी ।
सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू ।
चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे ।
ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥

तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे ।
तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥

भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥

हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली ।
दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥

रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू ।
रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥

Maruti Stotra PDF :

Source : Youtube.com

Team : 360Marathi.in

Leave a Comment

close