प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ? मुद्रा योजना साठी लागणारी कागदपत्रे | Mudra Yojana in Marathi

प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ? मुद्रा योजना साठी लागणारी कागदपत्रे | Mudra Yojana in Marathi

नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना बद्दल माहिती दिली आहे जसे कि प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ? मुद्रा योजना साठी लागणारी कागदपत्रे इत्यादी

तर चला सुरु करूया आणि पाहूया mudra yojana information in marathi

प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे ? What is Mudra Yojana in marathi

केंद्र सरकारने लघु उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते.

मुद्रा योजना कधी सुरू झाली ? when mudra yojana was launched

प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

मुद्रा योजनेची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. प्रथम, स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज. दुसरे म्हणजे, लघु उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे. मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज यांचा समावेश आहे.

शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर किशोर मुद्रा कर्जाच्या अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात. तरुण मुद्रा कर्जाच्या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कोणतेही निश्चित व्याज दर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. व्याज दर देखील कर्जदाराच्या व्यवसायाचे स्वरूप आणि गुंतलेल्या जोखमीवर अवलंबून असते. साधारणपणे किमान व्याज दर 12%आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी तुम्हाला सरकारी किंवा बँक शाखेत अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला घराची मालकी किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन नंबर यासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील.

मुद्रा योजना कर्जाचे प्रकार | mudra loan types in marathi

 • शिशू : या अंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं
 • किशोर : या अंतर्गत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते
 • तरुण श्रेणी : या अंतर्गत अंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल

मुद्रा लोन साठी कागदपत्रे | Mudra Yojana documents in marathi

 • ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
 • रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घर पावती.
 • अर्जदाराचे 2 फोटो.
 • आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
 • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
 • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.

मुद्रा लोन घ्याचं तर या गोष्टींवर लक्ष ठेवा

 • स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
 • हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
 • वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
 • कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.

मुद्रा लोन कसे मिळवावे | How to get mudra Loan Marathi

मुद्रा लोन मिळवण्यासाठी ठराविक अशी प्रोसिजर नाही. तुमच्या भागातील बँकेला भेट देऊन तुम्ही मुद्रा योजना बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात

मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) कर्जासाठी तुम्हाला सरकारी किंवा बँक शाखेत अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला घराची मालकी किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन नंबर यासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील.

निष्कर्ष :

आज या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण मुद्रा लोन ( मुद्रा योजना ) बद्दल माहिती जाणून घेतली , आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल, मुद्रा योजना बद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close