ऑनलाइन शॉपिंग कशी करायची।ऑनलाईन शॉपिंग मराठी माहिती

ऑनलाइन शॉपिंग कशी करायची : भारतात ऑनलाईन शॉपिंग बद्दल खूप जास्त awareness नव्हती, किंवा लोकांना ऑनलाईन शॉपिंग करण्यात रस नव्हता, पण मागील काही काळात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे, आज इ-कॉमर्स भागात प्रगती होत आहे, लोक आता traditional पद्धतीने शॉपिंग न करता ऑनलाईन शॉपिंग पध्दतीकडे वळत आहे,

आणि कोरोना च्या काळात तर ओनलाईन शॉपिंग शिवाय पर्यायच लोकांकडे नव्हता,

एवढे असूनही बऱ्याच लोकांना ऑनलाईन शॉपिंग कशी करावी याबद्दल माहिती नाही, किंवा आपण असे म्हणू शकतो कि त्यांनी याआधी ऑनलाईन शॉपिंग केली नाही म्हणून त्यांच्या मनात याबद्दल बरेच प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहेत.

नमस्कार मित्रानों तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज आपण पाहणार आहोत कि ऑनलाइन शॉपिंग कशी करायची,

या पोस्टमध्ये आम्ही ऑनलाईन शॉपिंग बद्दल मराठी संक्षिप्त माहिती देणार आहोत जसे ऑनलाईन शॉपिंग कशी करायची, कुठून करायची, कॅश ऑन डिलिव्हरी द्वारे कशी करावी आणि खूप काही

चला तर मग जानूया ऑनलाईन शॉपिंग बद्दल.

ऑनलाइन शॉपिंग म्हणजे काय ?

ऑनलाइन शॉपिंग म्हणजे काय ? त्या वस्तू आपल्या पर्यंत कश्या पोहचतात, हे सगळं कोण manage करत असे प्रश्न तुमच्या मनात येतात का ! चला पाहूया.

सगळ्यात आधी आपण पाहूया ट्रॅडिशनल शॉपिंग म्हणजे काय ?

समजा आपण मार्केट मध्ये जातो, दुकानावर कोणतीही वस्तू घेतो त्यालाच ट्रॅडिशनल शॉपिंग म्हणतात

मग ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय ?

जस आपण शॉपिंग करण्यासाठी मार्केट मध्ये जातो, त्याच प्रमाणे ऑनलाईन शॉपिंग साठी आपण इंटरनेट वरील वेबसाईट वर जातो आणि तिथे आपल्याला काय वस्तू घायची आहे ती सर्च करतो, आणि ऑर्डर करतो.

ऑनलाईन शॉपिंग साठी बऱयाच वेबसाईट आहे जसे amazon, flipkart, myntra, snapdeal इत्यादी

आशा करतो तुम्हाला समजलं असेल कि ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय

आता पाहूया ऑनलाईन शॉपिंग कशी करावी

ऑनलाईन शॉपिंग कशी करावी ?

जसे तुम्हाला ऑफलाईन वस्तू घेतात तेव्हा कोणत्या दुकानावरून ती वस्तू घ्यायची हे ठरवावं लागते तसेच ऑनलाईन शॉपिंग करतांना देखील कोणत्या वेबसाईट वरून करायची ते ठरवाव लागत. जसे amazon किंवा flipkart किंवा इतर

त्यानंतर प्रॉडक्ट म्हणजे काय वस्तू घ्यायची आहे ते ठरवा

नोट : तुम्ही amazon व flipkart इथे मोबाईल अँप किंवा वेबसाईट दोघी द्वारे शॉपिंग करू शकतात

आता शॉपिंग सुरु करण्यासाठी पुढच्या स्टेप follow करा.

  • तुम्हाला ज्या कंपनीकडून जसे फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वरून शॉपिंग करायची आहे त्या कंपनीच्या वेबसाईट वरती जा किंवा त्यांचे ॲप प्ले स्टोर इन्स्टॉल करा. आणि तुमचा ई-मेल मोबाईल नंबर रजिस्टर करून अकाउंट बनवा.
  • नोट : अकाउंट बनवल्या नंतर पत्ता टाका< तुम्ही तुमच्या घराचा पत्ता house number, एरिया, सिटी, पिनकोड या स्वरूपात टाकू शकतात
  • तुम्हाला जे प्रॉडक्ट घ्याचे आहे सर्च बार मध्ये सर्च करा.
  • समजा तुम्हाला मोबाईल घ्याचा असेल तर तिथे याबद्दल ची संपूर्ण माहिती वाचा जसे किंमत, त्या फोन चे review, रेटिंग, ऑफर्स इत्यादी आणि जर तुम्हाला तो फोन आवडलं तर ऍड टू कार्ट या बटनावर क्लिक करा, आणि नंतर चेकऊट या बटनावर क्लिक करा
    आणि खरेदी करा
  • पेमेंट चा पर्याय तुमच्या समोर येईल त्यात तुम्ही पेटीएम,इंटरनेट बँकिंग,upi, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड च्या माध्यमातून pay करू शकता.पण जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायची असेल. तर डायरेक्ट COD हा पर्याय सिलेक्ट करा …
  • नंतर तुम्हाला दिलेल्या कालावधीत ते प्रॉडक्ट तुमच्या दिलेल्या पत्ता वर येईल नंतर तुम्ही कॅश देऊन प्रॉडक्ट घ्या

नोट : जर तुम्हाला प्रॉडक्ट आवडलं नाही तर तुम्ही refund देखील करू शकतात

जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग कशी करावी या स्टेप्स योग्य पद्धतीने समजत नसतील तर हा विडिओ पहा

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला आजचा विषय म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग कशी करायची हि माहिती समजली असेल
.
काही अडचण किंवा प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये विचारा

आणि अश्या पोस्ट्स साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या ]

आमच्या इतर पोस्ट ज्या तुम्हाला नक्की आवडतील

Leave a Comment

close