वॉरेन बफेट ११ गोल्डन टिप्स शेअर मार्केट साठी | Share Market Tips In Marathi

Topics

शेअर मार्केट मध्ये रोज लाखो लोक इन्व्हेस्ट करतात, पण सगळेच यशस्वी होत नाहीत, त्याच कारण आहे शिकण्यावर कमी लक्ष देणे. आजच्या आमच्या या Share market tips in Marathi मध्ये काही महत्वाच्या टिप्स आणि tricks आहेत ज्या तुम्ही ट्रेडिंग करताना नक्की पाळल्या पाहिजे. या Share market tips तुम्हाला ट्रेडिंगच्या वेळी अवांछित नुकसानी पासून वाचवतील.

मित्रांनो साहजिकच शेअर मार्केट मधून पैसे कमवण्यासाठी सर्वात आधी शेअर मार्केट शिकणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही शेअर मार्केट ची पुस्तकं वाचायला हवी, शेअर मार्केट course केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला शेअर मार्केट च्या मूलभूत गोष्टींचा नीट अभ्यास होईल.

जर तुम्हाला शेअर बाजाराच्या नियमांची माहिती असेल तर फार कमी वेळात तुम्ही शेअर बाजारातून करोडपती बनू शकता. पण, शेअर बाजाराच्या टिप्स बद्दल माहिती देण्या आधी, आम्ही शेअर बाजाराबद्दल थोडक्यात वर्णन शेअर करत आहोत. जेणेकरून नवीन व्यक्तींना मदत होईल.

चला तर सुरु करूया,

शेअर मार्केट म्हणजे काय? कसे काम करते? – What is the stock market in marathi?

शेअर म्हणजे हिस्सा. आणि बाजार म्हणजे असं ठिकाण जिथे आपण एखादी गोष्ट विकत घेऊ शकता किंवा विकू शकतात. म्हणूनच शाब्दिक अर्थाने, शेअर बाजार ही सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल म्हणजेच हिस्सेदारी खरेदी आणि विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे. आपल्या भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) असे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.

शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट ही अशी बाजारपेठ आहे जिथे बर्‍याच कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात. ही अशी जागा आहे जिथे काही लोक एकतर बरेच पैसे कमवतात किंवा त्यांचे सर्व पैसे गमावतात. एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीत भागीदार होणे.

शेअर मार्केट म्हणजे काय अगदी सविस्तर जाणून घ्या आमच्या या पोस्ट मधून,

शेअर मार्केट म्हणजे काय? | What Is Share Market In Marathi

शेअर मार्केट टिप्स मराठी – Share Market Tips In Marathi

आम्ही आधी तुम्हाला सांगितले कि शेअर मार्केट चा अनुभव हा सखोल ज्ञान असल्यावरच घ्यावा. खालील शेअर बाजाराच्या टिप्स तुमच्या ज्ञानात भर टाकू शकतील.

वॉरेन बफेट, राकेश झुनझुनवाला आणि आर के दमानी सारख्या शेअर बाजारातील टॉप इन्वेस्टरांनी देखील या टिप्स स्वीकारल्या आहेत. या सूत्रांमुळे, या लोकांची आताची रक्कम त्यांच्या सुरुवातीच्या रकमेच्या तुलनेत १००% गुणाकार झाली आहे. राकेश झुनझुनवाला आणि आर के दमानी हे भारतातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहेत. त्याचबरोबर वॉरेन बफे यांचा समावेश जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये होतो.

अशा श्रीमंत लोकांच्या मुलाखतींमधून आम्ही शेअर मार्केट च्या टिप्स एका ठिकाणी आणल्या आहेत.

११ टिप्स ज्या शेअर बाजारात तुम्हाला श्रीमंत बनवेल – Tips For Share Market In Marathi

टीप १. वेळेची वाट पाहू नका

वेळेची वाट न बघता इन्व्हेस्ट करायला सुरु करा. वॉरेन बफे यांनी म्हटले आहे की, प्रत्येक वेळ हि बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ असते. बाजारात योग्य वेळेची वाट पाहू नका. जर चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीत असतील तर गुंतवणूक सुरू करा. त्या वेळी बाजारात दबाव असला तरीही चालेल. सामान्य गुंतवणूकदार योग्य वेळेची वाट पाहत बाजारात गुंतवणूक करू शकत नाहीत. त्याच वेळी, वेळ निघून गेल्यावर, बाजाराची हालचाल पाहून, ते उच्च पातळी गाठलेल्या आणि तोट्यात गेलेल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात.

टीप २. इतरांकडे पाहून पैसे गुंतवू नका

जर तुम्ही स्टॉकमध्ये पैसे गुंतवत असाल कारण इतरही त्यात गुंतवणूक करून पैसे कमवताय, तर तुम्हाला १००% नुकसान होऊ शकते. शेअर बाजारात यशस्वी होण्याचा मंत्र हा आहे की तुम्ही लोकांना फॉलो करू नका, लोक तुम्हाला फॉलो करतात. वॉरेन बफेट यांच्या मते, जेव्हा इतर ठिकाणाहून लोभाने येत असतात, तेव्हा तुम्ही सावध राहा. आणि जेव्हा इतर लोक सावध दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा तुम्ही कमाईचा विचार सुरू करा, ती योग्य वेळ असेल.

टीप 3. किंमतीनुसार जाऊ नका, VALUE पहा – Share Market mdhun Kamai Chya Tips

कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी कधीही हे पाहू नका की जर या शेअरची किंमत जास्त असेल तर ते अधिक चांगले होईल. कधीकधी जर ती कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर 50 ते 100 रुपयांच्या किंमतीचा स्टॉक सुद्धा भविष्यात अधिक किमतीचा असू शकतो. शेअर बाजारातील मोठा गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला चा असा विश्वास आहे की कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कंपनीची कामगिरी बघा. जर कंपनीची कामगिरी चांगली असेल तर बाजाराच्या अस्थिरतेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

टीप ४. डिविडेंड / लाभांश देणाऱ्या कंपन्यांवर विश्वास ठेवा – Share Market Marathi Tips

हे तज्ज्ञांचे मत आहे कि, गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या कंपन्या नियमित डिविडेंड देत आहेत ते बघणे गरजेचे आहे. जर एखादी कंपनी नियमितपणे लाभांश देत असेल तर याचा अर्थ असा की त्या कंपनीकडे रोख रकमेची कमतरता नाही. रोख अधिशेष असलेल्या कंपन्याही चांगली कामगिरी करतात. अशा परिस्थितीत, या कंपन्यांच्या शेअर्ससह तुमचे पैसे वेगाने वाढण्याची शक्यता असते.

टीप ५. कमी कर्ज असलेल्या कंपन्या निवडा (कर्जमुक्त कंपन्या)

गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या कंपनीवर कमी कर्ज आहे हे देखील पहा. कमी कर्जामुळे कंपन्यांवर रोख बाबत कोणताही दबाव नाही. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्या याची उदाहरणे आहेत.

टीप ६. गुंतवणूकीचे ध्येय निश्चित करा ( Set Investment Goal in share market)

शेअर मार्केट टिप्स मराठी मध्ये महत्वाचा सल्ला हा आहे, तुम्ही तुमचा इंवेस्टमेंट टारगेट निश्चित केला पाहिजे. कोणतीही योजना सुरू होण्याआधी, ती शार्ट-टर्म आहे कि लॉन्ग-टर्म म्हणजे तुम्ही छोट्या कालावधी साठी गुंतवणूक करताय कि मोठ्या कालावधी साठी? हे आधी ठरवा.

कारण हे ठरवल्यावरच शेअर मध्ये इन्व्हेस्ट करण्याची तारीख, गुंतवण्याची रक्कम (लक्ष्य राशि), इत्यादी. गोष्टी स्पष्ट होतात.

जर तुम्ही कमी कालावधी मध्ये प्रॉफिट करण्याचे ठरवत असाल, तर तुम्ही गुंतवणुकीच्या इतर मार्गांचा विचार करू शकता. तथापि, जर तुमच्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक योजना असेल तर इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

जर तुम्ही इक्विटीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी हे माहित असणे आवश्यक आहे.

टीप ७. बाजारातील रिस्क समजून घ्या ( Understand market risk )

शेअर मार्केट टिप्स मध्ये या अतिशय महत्वाच्या टिप्स आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यापाऱ्याला त्याची जोखीम सहनशीलता समजून घ्यावी लागते. रिस्क घेणे हा शेअर बाजारात गुंतवणूकीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती गुंतवणूकदार ते गुंतवणूकदार बदलते.

यात बाजाराच्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते, ज्याचा थेट परिणाम गुंतवणूकीच्या मूल्यावर होतो. गुंतवणूकदाराची कमी जोखीम असलेली क्षमता बाजारातील अत्यंत अस्थिरतेदरम्यान नुकसान किंवा ताण सहन करण्याची क्षमता यावर अवलंबून असते.

कमी जोखमीचे गुंतवणूकदार अनेकदा त्यांच्या सिक्युरिटीज चुकीच्या वेळी विकण्यास घाबरतात.

टीप ८. योग्य स्टॉक निवडणे ( Choose Right Stocks to Invest )

गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉक ( कमी किमतीचे stocks) किंवा अफवांवर आधारित कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक टाळावी. त्याऐवजी संशोधन आणि मजबूत कंपनीच्या कामगिरीवर आधारित समभागांमध्ये गुंतवणूक करा.

या शेअर बाजाराच्या टिप्स चा एक फायदा असा आहे की मजबूत कामगिरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कंपन्या बाजारातील अस्थिरता अधिक चांगल्या प्रकारे वाढवतात आणि दीर्घकालीन गुंतवणूकीवर चांगल्या परताव्याची शक्यता वाढवतात.

टीप ९. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा

शेअर मार्केटमधील सर्वात महत्वाच्या टिप्स पैकी एक म्हणून याचा विचार करा.
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणे. अनेक गुंतवणूकदार महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एकूण बाजारातील कामगिरी आणि कंपन्यांचे भाव अल्पकालीन गुंतवणूकदारांच्या भावना प्रतिबिंबित करतात.

कधीकधी एखाद्या गुंतवणूकदाराच्या निर्णयावर इतर गुंतवणूकदारांच्या कृतींचा खूप प्रभाव पडतो. त्याऐवजी, गुंतवणूकदाराने तार्किक निर्णय घेण्यासाठी परिस्थितीचे विश्लेषण करायला हवे.

टीप १०. मूलभूत गोष्टी समजून घ्या

कोणत्याही विभागात गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याची मूलभूत माहिती समजून घेण्यासाठी वेळ काढणे फार महत्वाचे आहे.

साधारणपणे गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी आणि रणनीती समजून घेणे टाळतात. गुंतवणूक करण्यापूर्वी ते संशोधन अहवाल किंवा कंपन्यांचे कामगिरी अहवाल वाचणे टाळतात, कारण त्यात जटिल संख्या भाषा आणि तांत्रिक शब्दावली समाविष्ट असते.

जर तुम्ही त्यांना वाचण्यात आणि समजून घेण्यासाठी काही प्रयत्न केले तर ते योग्य आणि चांगले निर्णय घेण्यात खूप पुढे जाऊ शकते, ज्यामुळे चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

टीप ११. गुंतवणुकीत विविधता आणणे

गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला नेहेमी जातो. यामुळे गुंतवणूकदाराला स्वतःचा चांगला आणि संतुलित पोर्टफोलिओ राखण्यास मदत होते.

गुंतवणूकदार बहुधा इक्विटी गुंतवणुकीत वैविध्य आणण्यात ​महत्त्व दुर्लक्ष करतात. इक्विटी गुंतवणुकीत विविधता म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे.

एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ अस्थिरतेचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, कारण अनेकदा एका क्षेत्रातील डाउनट्रेंडमुळे दुसऱ्या क्षेत्रात अपट्रेंड होतो

शेअर मार्केट टिप्स मराठीमध्ये – निष्कर्ष

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला बाजाराशी संबंधित सर्व पैलू माहित असणे आवश्यक आहे. कोणत्याही नवीन गुंतवणूकदाराने गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी नेहमी काही आवश्यक शेअर बाजाराच्या टिप्स / शेअर मार्केट टिप्स डोक्यात ठेवाव्यात.

वर, नवीन गुंतवणूकदाराला बाजारात व्यापार करण्यासाठी काही Best Share Market Tips In Marathi नमूद केल्या आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही बाजारातून चांगले परतावा मिळवू शकता.

माहिती आवडली असल्यास तुम्ही कॉमेन्ट करून कळवू शकतात आणि आपल्या इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद !!!

Team, 360Marathi.in

शेअर मार्केट शिकण्यासाठी आमच्या इतर काही पोस्ट्स,

2 thoughts on “वॉरेन बफेट ११ गोल्डन टिप्स शेअर मार्केट साठी | Share Market Tips In Marathi”

Leave a Comment

close