शास्त्रीय पद्धत म्हणजे काय हा प्रश्न इयत्ता पाचवी इयत्ता सहावी मध्ये बऱयाच वेळा विचारला जातो
शास्त्रीय पद्धत म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपण एका उदाहरणद्वारे समझुया..
शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ?
समजा तुम्हाला एक काम दिले कि, तुम्हाला तुमच्या परिसरातील आणि तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा पुरावे शोधायचे आहेत, उदा, लग्नपत्रिका, जन्मदाखला, खूपच जास्त वयस्कर व्यक्ती असेल तर आडाणी असेल तर कदाचित ती व्यक्ती अंदाजे जन्म वर्ष सांगते, किंवा एखाद्या महत्वाच्या घटनेने अंदाजे वर्ष सांगते, परंतु खात्रीलाएक या विश्वासासह पुरावा देऊ शकत नाही, याउलट तुमच्या जन्म दिनांकांचा पुरावा सहज मिळेल कारण त्याची नोंद ग्रामपंचायत किंवा नगर परिषद मध्ये आहे,
शाळेतील रजिस्टर मध्ये आहे तसेच तुमच्या आधार कार्ड वर देखील आहे, भविष्यात तुमचे नातेवाईक त्यावर विश्वास ठेऊ शकतात
याच प्रकारे इतिहास लिहितांनासुद्धा पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे हि पहिले जाते
म्हणहेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वासार्ह आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात