Telegram App Information in Marathi | टेलिग्राम अँप बद्दल माहिती

तुम्ही टेलिग्राम अँप बद्दल नक्कीच ऐकले असेल. व्हाट्सअँप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम जर कोणते अँप कॉम्पिटिशन देऊ शकते तर ते अँप आहे टेलिग्राम..

आज आपण टेलिग्राम अँप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जसे कि टेलिग्राम काय आहे ? टेलिग्राम अँप चा वापर का करतात ? टेलिग्राम अँप चे फायदे काय इत्यादी.

तर चला मग सुरु करूया आणि पाहूया टेलिग्राम ची माहिती.

टेलिग्राम अँप म्हणजे काय – telegram app information in marathi

टेलिग्राम अँप व्हाट्सअँप किंवा फेसबुक सारखेच अँप messaging app आहे, पण हे क्लाउड-आधारित अँप आहे,म्हणजेच जसे व्हाट्सअँप वरचा सर्व डेटा तुमच्या फोन मध्ये असतो पण टेलिग्राम मध्ये वापरकर्त्यांचा डेटा डिव्हाइसऐवजी टेलिग्रामच्या सर्व्हरमध्ये साठवला जातो.

टेलिग्राम वापरण्यास अतिशय सोपे आणि सुरक्षित आहे, या अँप मधले फीचर्स जसे Telegram Groups, Telegram Channel, Telegram Bots, Telegram Stickers या अँप इतर अँप व्हाट्सअँप फेसबुक पासून वेगळं बनवतात..

टेलिग्राम अँप ची सुरवात कशी झाली आणि कोणी केली

टेलिग्राम प्रथम 2013 मध्ये निकोलाई आणि पावेल या दोन भावांनी लाँच केले.

14 ऑगस्ट 2013 रोजी आयओएससाठी आणि 20 ऑक्टोबर 2013 रोजी अँड्रॉइड फोनसाठी टेलिग्राम लाँच करण्यात आले. आयओएस पेक्षा अँड्रॉईड वापरकर्त्यांनी याला अधिक पसंती दिली आहे.

आणि आज टेलिग्राम चे 500 मिलियन पेक्षा जास्त यूजर्स आहेत..

टेलिग्राम अँप कोणत्या देशाच आहे ?

टेलिग्रामची अँप हे रशिया देशातील २ भावांनी सुरवात केली होती, पण तिथल्या काही IT मधील नियमांमुळे त्यांना तिथून त्यांचे ऑफिस दुबई ला स्थलांतरित करावे लागले..

टेलिग्राम अँप चे फीचर्स

 • टेलिग्राम मध्ये सीक्रेट चॅट नावाचं एक फीचर्स आहे ज्यात तुम्ही कोणाशीही सीक्रेट चॅट करू शकतात, जी काही काळानंतर डिलिट देखील होते..
 • security : जसे व्हाट्सअँप मध्ये end to end encryption असते तसेच, या अँप मध्ये त्यापेक्षा अधिक २ लेयर चे encryption असते ज्यामुळे टेलिग्राम ला व्हाट्सअँप पेक्षा अधिक सुरक्षित मानले जाते..
 • म्हणूनच काही काळापूर्वी जेव्हा व्हाट्सअँप डेटा लीक ची बातमी आली होती तेव्हा करोडो लोकांनि टेलिग्राम अँप वापरण्यास सुरवात केली होती..
 • टेलिग्राम अँप एकाच वेळी अनेक device मध्ये वापरले जाऊ शकते. जसे कि व्हाट्सअँप फक्त एकाच फोन मध्ये आपण वापरू शकतो, पण टेलिग्राम चे तसे नाही, हे तुम्ही अनेक फोन मध्ये लॉगिन करू शकतात..
 • क्लाऊड स्टोरेज : टेलिग्राम मध्ये क्लाऊड स्टोरेज चा पर्याय आहे, ज्यामुळे तुमचा डेटा टेलिग्राम वर सुरक्षित राहतो..
 • जाहिराती नाही : टेलिग्राम मध्ये तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक सारख्या जाहिराती पाहायला मिळत नाही, म्हणून वापरायला सोपे जाते.
 • स्टिकर्स : टेलिग्राम मध्ये अनेक स्टिकर्स उपलब्ध आहे, जे तुम्ही शेयर करू शकतात
 • टेलिग्राम चॅनेल : या एका फीचर्स मुळे टेलिग्राम करोडो लोकांना आवडते, ते म्हणेज टेलिग्राम चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप्स.. टेलिग्राम चॅनेल्स मध्ये तुम्ही unlimited लोक जॉईन करू शकतात, जसे कि व्हाट्सअँप मध्ये तुम्ही २५५ लोक करतात, तसे यात अनलिमिटेड करू शकतात

या सर्व कारणांमुळेच टेलिग्राम दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालले आहे.

टेलिग्राम अँप डाउनलोड करा :

टेलिग्राम अँप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वर जाऊ शकतात, किंवा खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा :

टेलिग्राम अँपचे फायदे

 • टेलिग्राम मेसेंजर इतर मेसेंजर अप्सपेक्षा अधिक सुरक्षित आहे.
 • येथे आपण गुप्त चॅट वापरू शकता, ज्यात क्लायंट-टू-क्लायंट एन्क्रिप्शन आहे.
 • यामध्ये मोठ्या आकाराच्या फाईल्स सहज पाठवता येतात.
 • हे सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जसे की अँड्रॉइड, विंडोज आणि आयओएस.
 • कोणत्याही प्रकारच्या जाहिराती त्यात नाहीत आणि अँप नेहमी मोफत असेल.

टेलिग्राम अँपचे तोटे

 • यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार नाही.
 • यात उत्तर अँप ( व्हाट्सअँप, फेसबुक ) च्या तुलनेत कमी यूजर्स आहेत

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये टेलिग्राम अँप बद्दल माहिती पहिली ( telegram information marathi )..

आशा करतो तुम्हाला टेलिग्राम म्हणजे काय, टेलिग्राम चा वापर का करतात सर्व समजले असेल..

टेलिग्राम बद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close