Web Hosting म्हणजे काय | वेब होस्टिंग काय असते | Web Hosting information Marathi

Web Hosting म्हणजे काय, वेब होस्टिंग चे किती प्रकार असतात, वेब होस्टिंग घेण्यासाठी किती पैसे लागतात अशे प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही अगदी योग्य ब्लॉग वर आला आहेत..

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०Marathi या ब्लॉग वर.

आज आम्ही तुमच्यासोबत वेब होस्टिंग बद्दल माहिती शेयर करणार आहोत आणि जर तुम्हाला स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असेल तर कुठून तुम्ही वेब होस्टिंग घेतली पाहिजे याबद्दल देखील या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊ 

चला तर मग सुरवात करूया आणि जानुया web hosting meaning in marathi..

 Web Hosting म्हणजे काय ( what is Web Hosting in Marathi )

वेब होस्टिंग म्हणजे काय आपण हे एका उदाहरण द्वारे समजू,

समजा जेव्हा तुम्ही एखाद व्यवसाय सुरु करतात किंवा शॉप सुरु करण्याचा विचार करतात तेव्हा तुम्हाला भांडवल किंवा मशीन किंवा सामान ठेवण्यासाठी जागा लागते, 

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु करतात तेव्हा तुमच्या वेबसाईट वरील फाइल्स, फोटो, विडिओ इंटरनेट वर ठेवण्यासाठी जागा लागते आणि त्यालाच होस्टिंग म्हणतात..

होस्टिंग घेऊन तुमची तुमची वेबसाईट एखाद्या सर्वर वर होस्ट करू शकतात.

वेब होस्टिंग सर्विस तुम्हाला होस्टिंग पुरवत असतात

Hosting चे प्रकार :

एखादी होस्टिंग किती व्हिसिटर हॅन्डल करू शकते आणि तिचे फीचर्स यावर होस्टिंग चे प्रकार असतात, ते खालीलप्रमाणे :

  • Shared Hosting 
  • Dedicated Hosting 
  • VPS Hosting 
  • Cloud Hosting 

Shared Hosting म्हणजे काय ? What is shared hosting 

याचा अर्थ नावातच आहे ” Shared ” + ” Hosting “..

यामध्ये बऱ्याच वेबसाईट ला एकाच सर्वर वर होस्ट केले जाते, आणि त्यामुळे shared hosting इतर होस्टिंग च्या तुलनेने स्वस्त असतात.. 

जर तुमचा लहान व्यवसाय आहे किंवा जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु करत आहेत तर हि होस्टिंग तुमच्या बेस्ट असते कारण सुरवातीला तुमच्या ब्लॉग वर जास्त ट्रॅफिक नसत म्हणून हि होस्टिंग तुमच्या ब्लॉग ला योग्य प्रमाणे हॅन्डल करू शकते 

पण जर तुमच्या ब्लॉग वर जास्त ट्रॅफिक असेल तर आम्ही सल्ला देऊ कि या प्रकारच्या होस्टिंग कडे वळू नका कारण, त्यामुळे तुमची वेबसाईट डाउन होऊ शकते किंवा technical issue येऊ शकतात..

Dedicated Hosting म्हणजे काय  ? What is Dedicated hosting 

dedicated म्हणजे समर्पित,

म्हणजेच dedicated hosting जर तुम्ही घेतली तर त्यावर फक्त तुमचा हक्क असतो कारण त्या सर्वर वर फक्त तुमचा वेबसाईट होस्ट केलेली असते 

जर तुमच्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक असेल तर तुम्ही या होस्टिंग ला विकत घेऊ शकतात. 

हि होस्टिंग shared hosting पेक्षा महाग असते कारण यात एका सर्वर वर फक्त तुमचीच वेबसाईट होस्ट केलेली असते 

VPS Hosting म्हणजे काय  ? What is VPS hosting 

VPS म्हणजे virtual private server. 

या प्रकारच्या होस्टिंग मध्ये बराच कंट्रोल तुमच्या हातात असतो, खूप साऱ्या VPS Hosting वर तुम्ही operating system सुद्धा इन्स्टॉल करू शकतात.

जर तुम्हाला अशी होस्टिंग पाहिजे असेल, पण माहिती नाही कि कुठून घ्यावी, तर तुम्ही hostadvice.com/vps ला भेट देऊन होस्टिंग घेऊ शकतात, hostadvice हे उत्तम vps Hosting Provider आहेत.

Cloud Hosting म्हणजे काय  ? What is cloud hosting 

cloud hosting मध्ये तुमची वेबसाईट एका सर्वर वर होस्ट न करता वेगवेगळ्या physical आणि Virtual’s Servers वर होस्ट केली जाते, 

आणि जर तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक अचानक वाढेल किंवा काही issue आले तर होस्टिंग कंपनी लगेच तुमची वेबसाईट बाउन्स करून ते हॅन्डल करते..

इतर Hosting च्या तुलनेने Cloud hosting price खूप जास्त असते..

Web Hosting घेतांना काय काळजी घ्यावी ?

hosting buy करतांना हि काळजी घ्या :

  • Hosting चा uptime चांगला हवा 
  • Customer Support चांगला हवा 
  • Security चांगली हवी 
  • Server Location जवळ घ्या 
  • वेबसाईट चे बॅकअप बद्दल माहिती घ्या 
  • Storage जरूर बघा 
  • Bandwidth  इत्यादी 

Web Hosting घेतांना वरील गोष्टींवर आवश्य लक्ष द्या..

भारतातील काही Best Hosting Providers :

भारतात तुम्ही खालील कंपनी च्या Web Hosting buy करू शकतात 

इथून तुम्ही hosting विकत घेऊ शकतात..

Hosting Price काय असते ?

त्यांच्या Official website वर जाऊन तुम्ही किंमत पाहू शकतात कारण प्रत्येक कंपनी ची Hosting Price वेग वेगळी असते..

तरी तुम्ही खालील फोटो मध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या होस्टिंग price पाहू शकतात

Hostinger Price :

Hostinger Hosting Plans And Price

siteground Price :

siteground hosting plans and price

GreenGeeks Plans :

GreenGeeks Plans and pricing

A2Hosting Plans :

A2Hosting Plans

BlueHost Plans :

bluehost plans and pricing in marathi

Also Read : 

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की Web Hosting म्हणजे काय ( Web Hosting information marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

1 thought on “Web Hosting म्हणजे काय | वेब होस्टिंग काय असते | Web Hosting information Marathi”

Leave a Comment

close