Majhi Aai Nibandh In Marathi | Mazi Aai Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. मी सादर करीत असलेला निबंध हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात.
माझी आई निबंधांचे सर्व शीर्षक ज्यांसाठी हा निबंध अनुकूल असेल
- माझी आई दहा ते पंधरा ओळी लिहा,
- माझी आई आणि मी निबंध / Majhi Aai ani me marathi nibandh.
- आई संपावर गेली तर? मराठी निबंध / Aai sampavar geli tar? marathi nibandh.
- मला भावलेली आदर्श आई निबंध,/ mala bhavleli adarsh aai nibandh.
- माझा आदर्श आई निबंध,/ Maza adarsh aai nibandh.
- माझी आई निबंध मराठी ५० शब्दात, १०० शब्दात, २०० शब्दात,
- माझी आई निबंध मराठी फोटो/ Mazi aai nibandh marathi photo.
- Majhi Aai Nibandh In Marathi.
- Mazi Aai Marathi Nibandh.
- Mazi aai essay in marathi.
सदर निबंध खालील सर्व इयत्ताकरिता उपयोगी आहे .
- माझी आई मराठी निबंध इयत्ता सहावी
- माझी आई निबंध मराठी 5वी
- माझी आई निबंध मराठी 3री
- माझी आई मराठी निबंध दाखवा
- माझी आई निबंध मराठी 7वी
- आई माझी आई निबंध
- माझी आई मराठी निबंध इयत्ता दुसरी
- माझी आई निबंध मराठी ६वी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे . अशा आई बद्दल आपणा सर्वांना आदर असतो. मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिली गुरू आई असते. जी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते. आईची सर कोणीच करू शकत नाही. प्रेम वाचले असते कधी दुःख संकट किंवा ठोकर लागलेली असो तोंडातले पहिले उद्गार आईच असते. तर मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर निबंध लेखन करूया. चला तर मग सुरुवात करुया.
माझी आई दहा ते पंधरा ओळी लिहा (५० शब्दात) | Majhi Aai Nibandh In Marathi.
माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी सर्वात आधी उठून मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझे आहार पोषण चांगले रहावे या साठी ती रोज चांगले चांगले पदार्थ करून मला खाऊ घालते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझ्यावर छान छान असे संस्कार करते. माझा वाढदिवस ज्या दिवशी असेल तिचा उत्साह तर आकाशात भिडलेला असतो.
माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते.कधी कधी मी उगाचच हट्टी पणाने वागलो तर ती मला ओरडते सुदधा. पण नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलो तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे नियमित पणे देते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते. आणि माझ्या आई शिवाय मी कधीच राहू शकत नाही.
आमचे इतर निबंध……
माझी आई निबंध मराठी १०० शब्दात | Mazi Aai Marathi Nibandh in 100 Words
माझी आई खूप गोंडस आहे, मी एखादी गोष्ट चुकलो तर मला मारत नाही, परंतु ती प्रेमाने समजूत काढते. जेव्हा मी दुःखी होतो तेव्हा माझी आई माझ्या चेहेर्यावर हसू आणते. तिच्या प्रेम आणि प्रेमळ स्पर्शामुळे मी माझे सर्व दुःख विसरतो. माझी आई देवासारखी आहे. ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला चांगल्या गोष्टी सांगते.
ती दररोज सकाळी लवकर उठते. माझी आई घरातल्या सगळ्यांची काळजी घेतो, देवापासून आमच्यापर्यंत. ती आजोबांची पूर्ण काळजी घेते. आजी म्हणते की माझी आई घराची लक्ष्मी आहे. मी माझ्या आईला देव मानतो आणि ती सांगेल त्या सर्व गोष्टी मी पाळतो. माझी आईही काम करते. ती घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदार्या अतिशय चांगल्या प्रकारे हाताळते. त्याच्या कार्याचे आणि स्वभावाचे ऑफिसमध्ये कौतुक होत असते. माझी आई गरिबांना मदत करते.
मी आजारी पडलो तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते. माझी आई माझ्यावर प्रेम करते. ती नेहेमी शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे” सुहासिनी” हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहताना ही तिचे काही ना काही काम चालू असते.
साने गुरुजींनी म्हटलेलंच आहे,
माझी आई आणि मी निबंध | Majhi Aai ani me marathi nibandh | Majhi Aai Nibandh In Marathi
माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.
यंदाचा ‘ आदर्श विद्यार्थी’ म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.माझी आई माझ्यावर जीवापाड प्रेम करते. ती नेहेमी प्रसन्न ,शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे” सुहासिनी” हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.
माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते.कधी कधी मी उगाचच हट्टी पणाने वागलो तर ती मला ओरडते सुदधा. पण नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलो तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे नियमित पणे देते.
माझी आई माझी जिवलग मित्र आहेमी चुकलो तेव्हा आई मला मार देत नाहीत तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते . जेव्हा मी दु: खी होतो तेव्हा माझी आई माझ्या मुरलेल्या चेहऱ्यावर हास्य आणते.ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते. वेळेचे महत्त्व समजावून सांगते असे म्हणतात कि आई प्रत्येकालच्या आयुष्यात एक वरदान आहे. जिच्या आशीर्वादाने आपण घडतो मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला जगातील सर्वोत्कृष्ट आई दिली याबद्दल देवाचे आभार मानतो.
आई संपावर गेली तर? मराठी निबंध | Aai sampavar geli tar? | Majhi Aai Nibandh In Marathi
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे .आई ही आपल्या आयुष्यातील खूपच महत्वाची व्यक्ती आहे. आई आपल्यासाठी नेहमीच झटत असते. जर आपली आई संपावर गेली तर? Aai Sampavar Geli Tar Marathi Nibandh हा तुम्हाला आई शिवाय आपले आयुष्य कसे होईल याची कल्पना देते.
मला सकाळी खूप वेळ झोपता येईल. सकाळी सकाळी झोप मोड करायला कोणी नसेल. आंघोळ करण्यासाठी कोणी मागे लागणार नाही. मनसोक्त खेळता येईल. कुणाचीही कटकट मागे असणार नाही. कितीही लाडू खाल्ले तरी कोणी विचारणार नाही. अभ्यासाला का बसला नाहीस म्हणून कोणी रागावणार नाही. किती मज्जा येईल ना!
पण, आई संपावर गेली तर मला जेवण कोण करून देईल? माझ्या आवडीची पालकाची भाजी, डाळ खिचडी आणि बटाटा भजी मला कोण खायला घालेल? मी आजारी पडल्यावर माझी देखभाल कोण करेल? परीक्षेच्या आधी माझी उजळणी कोण करून घेईल? संध्याकाळी मला जवळ बसवून माझे लाड कोण करेल?
आई संपावर गेली तर माझे आयुष्यच थांबून जाईल. आई शिवाय जीवनाला अर्थच नाही.
शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागून दोनच दिवस झाले होते. आम्हा तिघा भावंडांचा घरी नुसता दंगा चालला होता. आज सकाळी मी नऊ वाजता उठलो होतो. तेही आई मागे लागली म्हणून. काय ती कटकट असते आईची? सुट्टीच्या दिवशीही झोपू देत नाही. असा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्यानंतर मी नाश्ता करून भावंडांबरोबर खेळू लागलो.
आईची दिवाळीच्या कामांची लगबग सुरु होती. दिवाळी चार दिवसांवर आली असल्याने तिला खूप कामे होती. आम्हीही तिला थोडी मदत करावी असे तिला वाटत होते परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही खेळण्यात गुंग होतो. घरात खेळू नका, फराळाची तयारी चालू आहे असे आईने आम्हाला बजावले होते पण नेहमीप्रमाणे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. खेळता खेळता माझा धक्का सारणाचा डब्याला लागला आणि करंजीसाठी केलेले सारण जमीनीवर सांडले. ते बगुन आईचा पॅरा चढला. “कितीदा सांगितले तुम्हाला इथे खेळू नका म्हणून? चार तास बसून केलेले सगळे सारण तुम्ही वाया घालवले. तुमची मला काडीचीही मदत नाही पण माझी कामे मात्र वाढवून ठेवली तुम्ही. कंटाळा आलाय मला सगळ्याचा. असा वाटतंय की संपावर निघून जावं”. आई रागा-रागाने बोलत होती. आम्ही सगळे घरातून बाहेर पळून गेलो आणि आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो. मी विचार करू लागलो की खरंच आई साम्पवर गेली तर?
मला भावलेली आदर्श आई निबंध | Mala bhavleli adarsh aai nibandh | Mazi aai essay in marathi
आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेचे काम करत असते आणि आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईचा संपूर्ण दिवस आपली मदत आणि गरज पूर्ण करण्यामध्ये व्यतीत होतो निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम आणि मदत करते आईच्या प्रेमाची तुलना केल्या जाऊ शकत नाही आई म्हणजे आपल्या सोबत रहात असलेले ईश्वरी रूप आहे या जगात आई सगळ्यांना त्यापेक्षा वेगळी असते सुखदुःखात आपल्या संरक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते.
आई आपली प्रत्येक आवड-नावड याची जाण ठेवते. आपल्या विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरीत करते. आई आपली प्रथम गुरू असते जी आपल्याला आयुष्यात चालणे बोलणे संस्कार ह्या गोष्टी शिकवते आपल्याला योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते आपल्या जीवनात योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगते.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई आईचे स्थान महत्त्वाचे असते जे शब्दांद्वारे सांगता येत नाही असे म्हटले जाते की देव प्रत्येकाबरोबर राहू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे. आई आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते. कोणत्याही व्क्तीगत फायदयाची जाणीव न ठेवता अहोरात आपल्या सेवेत आई सदैव असते .सकाळी ती खूप होताच प्रेमळपणे आम्हाला जागवते आणि रात्री ती गोड स्वप्नांसह कथा सांगते.
आमची आई आम्हाला शाळेसाठी तयार होण्यास मदत करते आणि आमच्यासाठी न्याहारी आणि दुपारचे जेवण देखील करते. ती दुपारी दाराजवळ उभी राहून आमच्या शाळेतून परत येण्याची वाट पाहत असते आणि आमच्या शाळेच्या गृहकार्यात (होमवर्क) मध्ये देखील मदत करते.
जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आमच्यासाठी रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते. ती आमच्यासाठी सर्वकाही त्याग करते , आई भुकेलेली राहते पण आम्हाला जेवण देते , आईसारखा त्याग आणि प्रेम कोणीही करू शकत नाही. आई आपल्या प्रत्येक गोष्टीला समजते आपण तिला ती सांगो कि न सांगो ती आपल्या प्रत्येक आसुचे रडण्याचे कारण विचारते जर आपल्याला कोणती गोष्ट कठीण वाटत असली तर ती मार्गदर्शन करते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते.
कधी कधी विचार मनात येतो कि जर मला आई च नसती तर?
मला जेवण कोण करून देईल? माझ्या आवडीची पालकाची भाजी, डाळ खिचडी आणि बटाटा भजी मला कोण खायला घालेल? मी आजारी पडल्यावर माझी देखभाल कोण करेल? परीक्षेच्या आधी माझी उजळणी कोण करून घेईल? संध्याकाळी मला जवळ बसवून माझे लाड कोण करेल?
आई संपावर गेली तरमाझे आयुष्यच थांबून जाईल. आई शिवाय जीवनाला अर्थच नाही.
आमचे इतर निबंध……
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya essay in marathi | Pollution Essay in Marathi
- Essay On Mahatma Gandhi In Marathi | महात्मा गांधी निबंध Marathi
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva in marathi nibandh | swachata che mahatva essay in marathi
- स्वच्छ भारत अभियान निबंध लेखन मराठी | Swachh Bharat Abhiyan Essay Writing in Marathi
Team, 360Marathi.in
2 thoughts on “माझी आई निबंध | Majhi Aai Nibandh In Marathi | Mazi Aai Marathi Nibandh”