हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता.
दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसुफ खान होते आणि त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी अविभाजित भारतातील पेशावर येथे झाला होता. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदललं होतं. यानंतर संपूर्ण जग त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं.
दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ – ) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.
दिलीपकुमार यांचे काही चित्रपट :
- आन
- अमर
- अंदाज़
- अनोखा प्यार
- आझाद
- बाबुल
- दाग
- दास्तान
- देवदास
- धरम आधिकारी
- दिल दिया दर्द लिया
- फुटपाथ
- घर की इज्जत
- गोपी
- हलचल
- इन्सानियत
- जोगन
- जुगनू
- कानून अपना अपना
- कोहीनूर
- क्रांति
- मधुमती
- मजदूर
- मेला
- मुग़ल ए आज़म
- मुसाफिर
- नया दौर
- पैग़ाम
- फिर कब मिलोगी
- राम और श्याम
- सगीना
- संगदिल
- शबनम
- शहीद
- शक्ती
- तराना
- उडण खटोला
- यहूदी
- गजब भयो राम जुलम भयो रे
With a heavy heart and profound grief, I announce the passing away of our beloved Dilip Saab, few minutes ago.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) July 7, 2021
We are from God and to Him we return. – Faisal Farooqui
Team 360Marathi.in