Financial Planning in Marathi | आर्थिक नियोजन कसे करावे

तुम्ही युट्युब, इंस्टाग्राम किंवा फेसबुक अश्या सोशल मीडिया किंवा काही लोकांच्या बोलण्यातून Financial Planning हा शब्द तर एकला असेल, पण त्याचा अर्थ नेमका काय असतो ? काय असत नेमका Financial Planning ? Financial Planning कशी करतात, ते केल्याचे फायदे काय अशी सर्व माहिती आम्ही या पोस्ट मध्ये दिलेली..

मित्रांनो आज फक्त पैसे कमवणेच महत्वाचे नाही, तर त्यासोबत ते पैसे गुंतवूणक करणे किंवा त्यांना manage करणे देखील महत्वाचे आहे..

पण खूपच कमी लोकांना त्याबद्दल माहिती आहे, अशे म्हटले जाते कि भारतात, अमेरिका, फ्रान्स, रशिया किंवा अश्या अनेक मोठ्या देशांतील लोकांपेक्षा कमी फायनान्शियल ज्ञान आहे, आणि त्यांनी Financial Planning कशी करावी याबाबत देखील खूप कमी माहिती आहे..

भारतातील फक्त काही टक्के लोकच इन्व्हेस्ट करतात, काही लोकांना तर त्याबद्दल माहिती देखील नाही, आणि याचा परिणाम असा होतो कि भविष्यात जेव्हा आपल्यावर आर्थिक संकट जर आले, तर बऱ्याच समस्या तेव्हा निर्माण होतात.

त्यापेक्षाआता पासूनच Financial Planning महत्वाची आहे.

आम्ही या पोस्ट मध्ये Financial Planning कशी करावी याबाबत सर्व माहिती दिली आहे, तर चला मग सुरु करूया आणि पाहूया financial planning म्हणजेच आर्थिक नियोजन बद्दल माहिती..

What is Financial Planning in marathi – आर्थिक नियोजन म्हणजे काय

Financial Planning (आर्थिक नियोजन ) ही पैशाच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे जीवनाचे ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया आहे.

सोप्या भाषेत आतापासूनच भविष्यातील पैशांच्या गरजांची व्यवस्था करण्याची ही प्रक्रिया आहे. जसे कि जर तुम्हाला पुढच्या १० वर्षापर्यंत पैसे सेव आणि इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही खालील गोष्टींचा विचार करू शकतात,

उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, समजा तुम्हाला 30 वर्षांनंतर निवृत्त व्हायचे असेल आणि त्या वेळी तुमच्याकडे 1 कोटी रुपये पाहिजेत , तर अश्या कोणत्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकतात कि ३० वर्षापर्यंत 1 कोटी रुपये जमा झाले पाहिजेत ?

असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे यालाच आपण आपण Financial Planning किंवा आर्थिक नियोजन म्हणू शकतो.

मित्रांनो, हे लक्षात ठेवा कि Financial Planning हि एक “प्रक्रिया” आहे, असे नाही की तुम्ही आज नियोजन केले आणि नंतर विसरलात. तुम्हाला वेळोवेळी याकडे लक्ष द्यावे लागेल आणि तुमच्या सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे धोरण सुधारून जीवनाचे ध्येय साध्य करावे लागेल.

हा सोप्या भाषेत Financial Planning चा अर्थ आहे.

financial planning कशी करावी – how to do financial planning

financial planning करणे अगदी सोपे देखील आहे आणि कठीण देखील, कठीण का ! कारण प्लांनिंग करणे खूप सोपे आहे, पण ते पुढच्या निर्धारित केलेल्या काळापर्यंत पाळणे कठीण आहे.

म्हणून financial planning करतांना स्वतःला ३ प्रश्न नक्की विचारा –

तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत –

याचा अर्थ म्हणजे, तुम्ही financial planning का करत आहे ? तुमचे गोल काय आहेत, जसे कि मुलांचे शिक्षण, retirement साठी पैसे, लग्नासाठी पैसे, स्वतःचा घर साठी, गाडी इत्यादी.

म्हणून financial planning च्या आधी तुम्ही ते का करत आहेत हे निश्चित करा..

त्या ध्येयांसह तुम्ही आता कोणत्या स्थितीत आहात?

यात तुम्ही आता कोणत्या स्थितीत आहात, हे निरीक्षण करा. तुम्ही होम लोण किंवा पर्सनल लोण घेतलंय का? तस असेल तर केव्हा घेतल आणि पुढे ते फेडण्यासाठीची तुमची प्लांनिंग काय आहे? या सर्व गोष्टीचा आधी विचार करायला हवा.

तुम्ही आता जेथे आहात तेथून तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय कसे गाठाल?

जसे कि तुम्हाला १ करोड रुपये ३० वर्ष नंतर पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला आजपासून किती रुपये सेव आणि इन्व्हेस्ट करावे लागतील हे ठरवा

या ३ प्रश्नांच्या उत्तरानंतर आपण पुढे वळूया.

financial planning साठी पुढील गोष्टी करा

आपली बचत वाढवा

जेव्हा तुम्ही आर्थिक योजना बनवता तेव्हा तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चांगली कल्पना येते. तुम्ही तुमचे खर्च जाणीवपूर्वक ट्रॅक करू शकता आणि तुमचे खर्च कमी करू शकता. यामुळे आपोआप दीर्घकाळातील तुमची बचत वाढते.

चांगल्या राहणीमानाचा आनंद घ्या

बहुतेक लोक असे गृहीत धरतात की जर त्यांचे मासिक बिल आणि ईएमआय पेमेंट द्यायचे असेल तर त्यांना त्यांच्या जीवन मानाचा त्याग करावा लागेल. याउलट, चांगल्या आर्थिक योजनेसह, आपल्याला आपल्या जीवनशैलीशी तडजोड करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उत्तम प्लांनिंग करून सर्व manage करू शकतात.

आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहा

आणीबाणी निधी ज्याला आपण इंग्लिश मध्ये emergency fund देखील म्हणतो ते तयार करणे आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

येथे, आपण आपल्या मासिक पगाराच्या किमान 6 महिन्यांच्या बरोबरीचा फंड असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

जसे कि समजा तुमची सॅलरी २० हजार असेल तर तुमच्या emergency fund मध्ये १ लाख ते १ लाख २० हजार रुपये तरी पाहिजेत.

अशा प्रकारे, कौटुंबिक आणीबाणी किंवा नोकरी गमावल्यास तुम्हाला पैश्यांची जास्त चिंता करण्याची गरज राहणार नाही. आपत्कालीन निधी आपल्याला विविध खर्च वेळेवर भरण्यास मदत करू शकते.

कोरोना मध्ये लोकांना याच महत्व कळलेच असेल, खूप लोकांच्या नौकरी गेल्यात पण, ज्यांनी emergency fund तयार केला होता, त्यांना याचा धोका जास्त जाणवला नाही. म्हणजे emergency fund नक्की तयार करा.

मनाची शांती मिळवा

पुरेसा पैसा असेल तर , तुम्ही तुमचे मासिक खर्च भागवू शकता, तुमच्या भविष्यातील ध्येयासाठी गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी काही काळजी न करता खर्च करू शकता.

आर्थिक नियोजन तुम्हाला तुमच्या पैशाचे कुशलतेने व्यवस्थापन करण्यास आणि मानसिक शांतीचा आनंद घेण्यासाठी मदत करते. आपण अद्याप या टप्प्यावर पोहोचले नसल्यास काळजी करू नका. जर तुम्ही आर्थिक नियोजनाच्या मार्गावर असाल तर आर्थिक शांततेचे स्वपन जास्त दूर नाही.

आता आपण पाहूया कि नेमकी financial planning साठी काय करावे

  • सेविंग करणे सुरु करा
  • emergency fund बनवा
  • हेल्थ insurance नक्की घ्या
  • पैसे इन्व्हेस्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा
  • तुमच्या खर्चांवर लक्ष ठेवा आणि पैसे नीट manage करायला शिका.

या सर्वंपैकी अति महत्वाचे म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा :

आता आपण पाहूया काही मार्ग ज्याद्वारे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकतात :

  • शेयर मार्केट :
  • SIP :
  • रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवून :
  • mutual फंड :
  • FD :
  • saving account :
  • गव्हर्नमेंट योजना : इत्यादी

शेयर मार्केट

शाब्दिक अर्थाने, शेअर बाजार ही सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल/हिस्सेदारी खरेदी आणि विक्रीसाठी ठेवलेली जागा असते.

शेअर म्हणजे हिस्सा. आणि बाजार म्हणजे असं ठिकाण जिथे आपण एखादी गोष्ट विकत घेऊ शकता किंवा विकू शकतात. म्हणूनच शाब्दिक अर्थाने, शेअर बाजार ही सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल म्हणजेच हिस्सेदारी खरेदी आणि विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे. आपल्या भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) असे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.

जर तुम्हाला शेयर मार्केट चे ज्ञान असेल तर यातून तुम्ही चांगले रिटर्न घेऊ शकतात.

याबद्दल आम्ही एक पोस्ट लिहिली आहे ती नक्की वाचा : शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती

mutual fund

म्युच्युअल फंड एक फंड (संग्रह) असतो ज्यात गुंतवणूकदारांचे बरेच पैसे परस्पर एकत्र केले जातात. निधीचा हा गट जास्तीत जास्त नफा मिळवण्यास व्यवस्थापित केला जातो.

सरळ शब्दांत सांगायचे झाले तर म्युच्युअल फंड हा एक भरपूर लोकांच्या पैश्यामधून बनवलेला फंड असतो. ज्यात लावलेला पैशांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी केला जातो आणि गुंतवणूकदाराला त्याच्या पैशातून जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, असा प्रयत्न केला जातो.

आज हजारो लाखो भारतीय या पर्याय चा उपयोग करत आहेत, आणि पैसे इन्व्हेस्ट करत आहे, आणि त्यांना चांगले रिटर्न देखील याद्वारे मिळत आहे.

mutual fund बद्दल देखील आम्ही एक पोस्ट लिहिली आहे ज्यात याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, ती पोस्ट सुद्धा देखील तुम्ही नक्की वाचा : म्युच्युअल फंड म्हणजे काय

SIP

एसआयपी हा कमी तोट्यात गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला / मध्यांतराने निश्चित रक्कम गुंतवून मोठ्या ध्येयासाठी बचत करू शकता, त्यानंतर त्या छोट्या गुंतवणुकीच्या रकमेसह, तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी मोठी रक्कम मिळू शकते.

एसआयपीद्वारे, गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोने इ. मध्ये गुंतवणूक करावी लागते. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा एक चांगला उपाय आहे. ठराविक वेळेच्या अंतराने एक निश्चित रक्कम SIP मध्ये गुंतवली जाते. गुंतवणूकदार एसआयपीद्वारे शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो.

एसआयपीने म्युच्युअल फंड मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आणले आहे कारण यामुळे ते त्या लोकांना गुंतवणूक करण्यास सक्षम बनवतात ज्यांचे बजेट खूप कमी आहे. जे एकाच वेळी मोठी गुंतवणूक करू शकत नाहीत परंतु ते दरमहा 500 किंवा 1000 गुंतवू शकतात करू शकता.

हा पर्याय त्यांच्यासाठी उत्तम आहे, ज्यांना शेयर मार्केट बद्दल माहिती जास्त नसते.

आम्ही याबद्दल देखील एक पोस्ट लिहिली आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही वाचू शकतात : SIP बद्दल माहिती

FD :

FD म्हणजे फिक्स्ड डेपोसिट, यात तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेऊ शकतात, ज्यावर तुम्हाला ४-७ % रिटर्न मिळते..

हे काही इन्व्हेस्टमेंट चे प्रकार किंवा मार्ग आहेत, जे तुम्हाला तुमच्या financial planning च्या वाटेत कामाला येतील.

निष्कर्ष :

मित्रांनो तुम्हाला या पोस्ट च्या आधारे financial planning चे महत्व, समजलेच असेल, आणि तुम्ही financial planning कशी कराल, पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल देखील आम्ही सांगितले.

आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

आणि अश्याच finance शी सबंधित पोस्ट साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या,

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close