हेल्थ इन्शुरन्स का महत्वाचे आहे? | Importance of Health Insurance in Marathi

हेल्थ इन्शुरन्स चे महत्व विचाराल तर थोडक्यात, आजारपण, आपत्कालीन स्थिती, आणि अनपेक्षित घटना या कधीही सांगून येत नाहीत. अशी परिस्थिती आल्यावर व्यक्ती किंवा कुटुंबावर पहिले संकट येते ते पैस्याचे, अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स आपल्या जवळ असला कि पैस्याचा विचार न करता पीडित व्यक्ती चिंता मुक्त राहून पूर्ण उपचार घेऊ शकतो.

आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनात, सर्व लोक आपापल्या कामात खूप व्यस्त झाले आहेत. आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत काही क्षण घालवण्यासाठी वेळ सुद्धा काढू शकत नाही आहोत. आपल्याकडे कामाचा एवढा ताण आहे की आम्ही सध्या ऑफिस आणि घरी दोन्ही ठिकाणी काम करतोय. आपल्या कामामुळे आपले सामाजिक जीवन अतिशय गोंधळून गेले आहे, आणि वेळेच्या या अभावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. आपल्या व्यस्त जीवनामुळे, आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे आणि त्याच्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करतो, आपण आपल्या आरोग्याकडे ज्या प्रकारे लक्ष दिले गेले पाहिजे तसे लक्ष देऊ शकत नाही आहोत.

यासह, रसायनांचा वाढता वापर, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे देखील आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. रोज काही ना काही नवीन रोग ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीत कोणाला कोणता आजार कधी होईल हे कोणालाच माहिती नसते. त्यामुळे आरोग्य विमा घेणे हा सर्वोत्तम पर्याय तर आहेच परंतु अतिशय उपयुक्त काळाची गरज देखील आहे. आरोग्य विमा योजना कोणत्याही गंभीर आजार, रस्त्यावर झालेले अपघात, जखम आणि इतर कोणत्याही अनपेक्षित घटनांच्या वेळी तुम्हाला आर्थिक मदत पुरवते. याचा फायदा घेऊन, आपण पैशाची चिंता न करता सर्वोत्तम ठिकाणी आपले उपचार मिळवू शकता.

या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला आरोग्य विम्याशी संबंधित महत्त्व, गरज आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. चला तर सुरू करूया, हेल्थ इन्शुरन्स चे फायदे आणि महत्व (Needs and Importance of Health Insurance)

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय – What is health insurance in Marathi

हा एक प्रकारचा करार आहे, ज्यामध्ये आपण आजारी असताना इन्शुरन्स कंपनी आपला सर्व वैद्यकीय खर्च हॉस्पिटलला देते. तसेच हॉस्पिटलायझेशन, उपचार, शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण इत्यादींशी संबंधित खर्चाची परतफेड सुद्धा करते. यासाठी तुम्हाला वेळेवर प्रीमियम भरावा लागेल.

हा आरोग्य विमा तुम्ही तुमच्या आई वडील, मुलांसाठी किंवा पत्नीसाठी सुद्धा घेऊ शकतात. आपात्कालीन परिस्थिती मध्ये एकदम पैस्याची सोय कोणाकडेच नसते, वेळेस या आरोग्य विमाँ कंपन्यांकडून आपल्याला तात्काळ मदत मिळते. म्हणून आरोगय विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकासाठी फार गरजेचा आहे.

आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती साठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचू शकतात.

हेल्थ इन्शुरन्स चे महत्व आणि गरज – The importance and need for health insurance in Marathi

हेल्थ इन्शुरन्स का केला पाहिजे ? – आपण सर्वांनी कोरोना काळात बघितले कि, किती तरी लोकांना अचानक कोरोना झाला समजले आणि लॉकडाऊन सारख्या situation मध्ये एवढा सारा पैसा कुठून उभा करायचा? हाच प्रश्न लोकांचे बळी घेत होता. त्याचवेळी ज्या ज्या लोकांकडे आरोग्य विमा (Health Insurance) असेल, ते अगदी काळजी न करता उत्तम हॉस्पिटल मध्ये treatment घेऊन घरी वापस आले.

स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे ही आजच्या काळाची मुख्य गरज झाली आहे. कारण वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय सेवा आणि रुग्णालयांचा खर्च महाग होत चालला आहे. छोट्या आजारात किंवा सामान्य तापामध्ये हजारो रुपये लोकांच्या स्वत: च्या खर्चावर खर्च केले जातात.

जर कुटुंबातील कोणी आजारी पडले, महिन्याची कमाई केव्हा औषधांकडे जाते, हे कळत सुद्धा नाही. आपण खूप मेहनत करून पैसे कमवतो आणि जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखे खर्च करतो. यामुळे होणार त्रास अजून वेगळाच. तसेच, चांगल्या हॉस्पिटल आणि सुविधांमध्ये उपचार घेण्यासाठी प्रत्येकाकडेच पुरेसे पैसे असतील असे नाही, त्यामुळे या सर्व गोष्टी आणि त्रास टाळण्यासाठी आपण आरोग्य विमा हा घेतलाच पाहिजे.

चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सहसा डॉक्टरांचा सल्ला शुल्क, वैद्यकीय चाचण्यांचा खर्च, रुग्णवाहिका शुल्क, रुग्णालयात दाखल करणे आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च समाविष्ट असतो. यामुळे आजारपणाच्या वेळी कोणतेही आर्थिक संकट येत नाही आणि आपण अगदी सुखाने आपली treatment पूर्ण करतो.

आरोग्य विम्याचे फायदे आणि महत्व – Benefits of Health Insurance in Marathi

आपण आरोग्य विमा का घ्यावा? आरोग्य विम्याचे फायदे काय आहेत. या बद्दल चे प्रश्न पडणे साहजिकच आहे, आणि पडायलाच पाहिजे.
आम्ही तुम्हाला सांगू आरोग्य विमा कसा तुमच्या जीवनात कठीण प्रसंगात कामात येऊ शकतो,

1. कॅशलेस उपचार (Cashless Treatment)

काही आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला कॅशलेस उपचारांची सुविधा देतात. पॉलिसी तुम्हाला सुविधा देते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये विमा कार्ड दाखवून कोणतीही रोख रक्कम न देता वैद्यकीय उपचार करू शकता. परंतु असे फायदे फक्त विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात, म्हणून पोलिसी निवडताना हॉस्पिटल चांगले असल्याची खात्री करून घ्यावी.

2. हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरच्या खर्चासाठी कव्हर

आरोग्य विमा योजनेत केवळ हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीत झालेल्या खर्चाचा समावेश नाही, तर हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा खर्च देखील समाविष्ट केला जातो. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा कालावधी वेगवेगळ्या कंपन्या आणि योजनांनुसार बदलू शकतो.

3. वाहतूक शुल्क (Travelling Fees)

आरोग्य विमा योजनेमध्ये रुग्णवाहिकेला दिलेल्या रकमेचाही समावेश असतो.

4. नो क्लेम बोनस (No Claim Bonus)

जर विमाधारकाने गेल्या एका वर्षात कंपनीमध्ये कोणत्याही उपचार किंवा कव्हरचा दावा केला नाही तर त्याला No Claim Bonus दिला जातो.

5. रूम, नर्सिंग, सर्जन इत्यादी फी

आरोग्य विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयाच्या खोलीचे भाडे, नर्सिंग शुल्क, सर्जन शुल्क, सल्लागार शुल्क, विशेषज्ञ शुल्क, ऑपरेशन थिएटर शुल्क, आयसीयू शुल्क, ऑक्सिजन, शस्त्रक्रिया साधने, एक्स-रे इत्यादी शुल्क समाविष्ट असते.

6. कर लाभ (Tax Benefits) –

आरोग्य विमा योजनेसाठी भरलेली प्रीमियम रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत करमुक्त आहे. म्हणूनच, आरोग्य विमा काढल्याने कर वाचवण्यासाठी देखील आपल्याला मदत होते.

आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा – What to look for when purchasing health insurance in Marathi

  1. योजना समजून घ्या – कोणतीही आरोग्य विमा योजना घेण्यापूर्वी, आपण त्या योजनेच्या मूलभूत गोष्टी जसे प्रीमियम, प्रवेश आणि निर्गमन वय, जोखीम आणि इतर गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
  2. आपल्याला आवश्यक असलेली वैशिष्ट्ये निश्चित करा – आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांची स्पष्ट कल्पना असावी.
  3. गट किंवा वैयक्तिक विमा घ्यावा की नाही हे ठरवा – आरोग्य विमा योजना एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या लाभ देतात. तुम्हाला कोणती योजना घ्यायची आहे ते ठरवा.
  4. कव्हरेज – फक्त ती पॉलिसी खरेदी करा जी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कव्हर देऊ शकेल.

निष्कर्ष

मित्रांनो, आरोग्य विमा मिळवण्यासाठी आजारी पडण्याची वाट पाहू नका, कारण बऱ्याचदा ठेच लागल्याशिवाय माणूस जपून चालत नाही. म्हणून आरोग्य विमा (Health Insuranace ) तुम्ही करायलाच पाहिजे, आणि स्वस्थ राहिले पाहिजे हि आमची इच्छा आहे. या लेखाद्वारे आरोग्य विम्याचे महत्त्व तुम्हाला समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता, जेणेकरून अडचणी च्या emergency च्या काळात तुम्हाला उपचारापासून वंचीत रहावे लागणार नाही.

तुम्हाला हा आमचा Health Insuranace चे महत्व लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करून त्यांना या बद्दल माहिती द्या, धन्यवाद !!

Team, 360Marathi.in

Other Posts,

Leave a Comment

close