Marathi Ukhane For Female : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आपल्या संस्कृतीत उखाणा घेण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे, म्हणून आज या पोस्ट द्वारे आम्ही घेऊन आलोय ५०० पेक्षा जास्त नवरीसाठी उखाणे,
समजायला आणि लक्षात ठेवायला सोपे असतील हि बाब लक्षात घेऊन छान कॉमेंडी उखाणे सुद्धा या पोस्ट मध्ये दिलेले आहेत.
Marathi Ukhane For Female :
- हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी, __ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.
- लावित होते कुंकुत्यात पडला मोती…रावां सारखे मिळाले पती भाग्य मानू किती
- कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
- शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, ___रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
- चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा……. सोबत असताना नाही आनंदाला तोटा.
- संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,*** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला..
- पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार ___ रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.
- कपाळी लावत होते कुंकू, कुंकवात पडला मोती ___ राव मिळाले पती, ईश्र्वराचे आभार मानू किती.
- यमुना नदीत पडते ताजमहलाची सावली ___ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
- पूजेच्या ताटात उदबत्तीचा पुडा ___ रावांच्या नावाने भरला मी हिरवा चुडा.
- रायगडावर घेतले शिवरायांचे दर्शन ___ रावांच्या प्रेमासाठी केले जीवन अर्पण.
- इंद्रधनुष्य पडते जेव्हा पावसात असते ऊन ___ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.
- होते कन्या माहेरी आता सून झाले सासरी ___ रावांसारखे पती लाभले भाग्यवान मी खरी.
- मनातले नाव उखाण्यात घेताना शब्द जुळवत राहिले ___ रावांनी मला मात्र गोड बोलून फसवले.
- नवस केला सावित्रीने मिळाला पती सत्यवान ___ राव मिळाले पती आहे मी भाग्यवान.
- गळ्यातले मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराची सून.
- शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात ___ रावांची आणि माझी साता जन्माची साथ.
- हिमालय पर्वतावर आहेत बर्फाच्या राशी ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) च्या दिवशी.
- निळ्या निळ्या आभाळात सूर्याचा प्रकाश ___ रावांवर आहे मला पूर्ण विश्वास.
- आईने केली माया बाबांमुळे बनले सक्षम ___ रावांसोबत होईल माझा संसार भक्कम.
- संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी ___ रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.
- भरजरी शालूवर शोभते मोरांची जोडी ___ रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी.
- गणपती समोर ठेवले लाडू- पेढे ___ रावांचे नाव घ्यायला कशाला एवढे आढे वेढे.
- नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे ___ रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.
- मोगऱ्याचे झाड फुला फुलांनी दाटले ___ चे नाव घेताना आनंदी मला वाटले.
- निळ्या आभाळाच्या तबकात आहे नक्षत्रांचा हार ___ रावांचे विचार आहेत खूपच उधार.
- झाडावर बसलाय पक्षांचा थवा ___ रावांचे नाव घ्यायला उखाणाच कशाला हवा.
- ___ रावांची आणि माझी स्वर्गात जमली जोडी सर्वांनी आशीर्वाद देवून वाढवावी लग्नाची गोडी.
- घराभोवती अंगण, अंगणात तुळस ___ रावांच्या आयुष्यात चाढवीन मी सुखाचा कळस.
- काचेच्या वाटीत फळे ठेवली कापून ___ रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
- आकाशात शोभून दिसे चंद्राची कोर ___ रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर.
- कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी ___ रावांची मी आहे अर्धांगिनी.
- श्रावण महिन्यात करतात श्रावणी सोमवार ___ राव आहेत खूपच दिलदार.
- शंकराची करते आराधना देवीची करते उपासना ___ राव नेहमी सुखी राहावेत हिच माझी प्रार्थना.
- भगवद गीतेतून मिळतो जीवन जगण्याचा अर्थ ___ रावांशिवाय माझे आयुष्य आहे व्यर्थ.
- नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती ___ रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती.
- नात्यात आणि मैत्रीत नसावा स्वार्थ ___ रावांमुळे मिळाला जीवनाला खरा अर्थ.
- सोन्याची अंगठी आहे प्रेमाची खून ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.
- दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी ___ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.
- अंगणात काढते रांगोळी फुलांची ___ रावांचे नाव घेते नवी सून ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.
- नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती ___ रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.
- मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर ___ रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.
- देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस ___ राव आहेत सर्वांपेक्षा सरस.
- कवीची कविता मनापासून वाचावी ___ रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.
- आयुष्याच्या सागरात ( मुलाकडील आडनाव ) ची नौका ___ रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका.
- तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून ___ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.
- आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा ___ रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.
- गुलाबाचे फूल लावते वेणीला ___ रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.
- हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण ___ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण.
- संसार रुपी सारिपाठावर पडले मनाजोगे दान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.
- मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी ___ राव माझ्या सौभाग्याचे धनी.
- पित्याचे कर्तव्य संपले, झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात ___ रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात.
- आई वडिलांचा निरोप घेताना पाऊले होतात कष्टी ___ रावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी.
- घराला आहेअंगण, अंगणात आहे तुळशी वृंदावन ___ रावांच्या संसाराचे करेन मी नंदनवन.
- यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी ___ रावांसोबत सुखी राहीन मी सासरी.
- लाल कुंकू कपाळावरी, हिरवा चुडा हाती ___ राव माझे पती सांगा तरी माझे भाग्य किती.
- जगात नाही एकलव्य सारखा शिष्य ___ रावांना मिळो शंभर वर्षे आयुष्य.
- कण्व ऋषींच्या आश्रमात आहे शकुंतले चे माहेर ___ रावांनी दिला मला सौभाग्याचं आहेर.
- निळ्या निळ्या अवकाशात होते ढगांची दाटी ___ रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.
- आकाशात चांदणे शिंपीत रात्र आली ___ राव मला मिळाले आणि माझी तपस्या पूर्ण झाली.
- तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी, देवा सुखी ठेव माझी आणि ___ रावांची जोडी.
- फुलांची वेणी गुंफते माळी ___ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.
- नको माणिक मोती, नको चंद्र हार ___ रावांच नाव हाच खरा अलंकार.
- द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.
- चाफयाचे फुल दिसायला ताजे ___ च नाव घेते सौभाग्य माझे.
- चंद्र, तारे अवकाशाचे सोबती ___ राव माझे जन्मोजन्मीचे साथी.
- अक्षता पडताच अंतरपाट झाला दूर ___ रावांमुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.
- चंदेरी समुद्रात रुपेरी लाटा ___ रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
- यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
- आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
- स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसू……. रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून.
- श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,*** ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..
- वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, ___रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
- जंगलात जंगल ताडोबाचं जंगल…….. रावांच्या संसारात सर्व राहो कुशल-मंगल.
- एक होती चिऊ एक होती काऊ..*** रावांचं नाव घेते, डोक नका खाऊ..
- बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन..*** राव बिड्या पितात संडासात बसून..
- पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
- करवंदाची साल चंदनाचे खोड…….. रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.
- रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, *** राव एवढे हॅण्डसम पण डोक्यावर टक्कल..
- हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. ___रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
- लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,*** रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती..
- अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,*** रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा..
- पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, ___रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
- आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे ___ राव माझे अलंकार खरे.
- रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,……..चं नाव घेते ……..सणाला.
- निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात……. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.
- सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,…….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.
- निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,……….. चं नाव घेते ………. च्या घरी.
- निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
marathi ukhane for female for pooja
- गणपतीच्या शिरावर हिरामानिकाचे छत्र ___ रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र.
- तुळशीचे वृंदावन आहे पावित्र्याचे स्थान ___ रावांनी दिला मला सुवासिनीचा मान.
- सुरुवात करते दिवसाची जोडून सूर्य नारायणाला हात ___ रावांची लाभो जन्मो जन्मीची साथ.
- लग्नाच्या पंक्तीत घेतले नाव खास ___ रावांच्या घशात अडकला ( Pdarthache nav ) चा घास.
- तेलाच्या दिव्याला कापसाची वात ___ रावांशी लग्न केले लागली आयुष्याची वाट.
- कोकणातून आणले फणस आणि काजू ___ रावांना शिव्या घालायला मी कशाला लाजू.
- नाव घे नाव घे उखाणा काही सुचत नाही आणि नाव कोणा कोणाच घेऊ मला काही कळत नाही.
- वांग्याचा केला रस्सा, फिश केला फ्राय ___ भावच देत नाय किती केल ट्राय.
- एकत्र काम केलं तर काम होईल लवकर, मी करते भाजी आणि तू लाव कुकर.
- चांदीच्या ताटात सातारी कंदी पेढे ___ राव तेवढे हुशार बाकी सगळे वेडे.
- पुरण पोळी ला तूप लावते साजूक ___ राव आमचे खूपच नाजूक.
- एक होता माऊ, एक होती चिऊ ___ चे नाव घेतले आता डोक नका खाऊ.
- आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
- भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,……….चं नाव घेते ………. दिवशी.
- भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,………… नाव घेते सर्वांच्याकरिता.
- संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,……च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
marathi ukhane for female latest
- संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,……… हेच पती सात जन्मी हवे.
- सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.
- दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.
- सतारीचा नाद, वीणा झंकार,…….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.
- प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.
- सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र विणले ___ रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
- आषाढ सरून आला श्रावण महिना ___ रावांचे नाव घेतल्या शिवाय मला बाई राहवेना.
- पूजेच्या साहित्यात पानाचा विडा ___ रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
- आई-वडील सोडताना पाऊल होतात कष्टी,…… च्या संसारात करीन मी सूखाची सृष्टी.
- गुलाबाचा सुटलाय मनमोहक सुगंध ___ रावांना केले मी हृदयात बंद.
- कमळात उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती ___ रावांच नाव घेते मी खरी भाग्यवती.
- संसार रुपी पुस्तकाचे उघडते पाहिले पान ___ रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
- बरसला पाऊस दरवळली माती ___ रावांसोबत फुलवेन नवीन नाती.
- मंगळागौरी मंगळ माते नमन करते तुला ___ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
- हातावर चढला रंग मेहंदीचा पक्का ___ रावांच नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका.
- समुद्राला आली भरती नदीला आला पुर ___ रावांसाठी माहेर केले दूर.
- चांदीचे जोडवे सौभाग्याची खुन ___ रावांचे नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) ची सून.
- गणपतीच्या पूजेला आणले जास्वंदी चे हार ___ रावांमुळे आयुष्याला मिळाली सुखाची किनार.
- लग्नात नाव घेणे हा कसला कायदा तुमची तर होते करमणूक पण आमचा काय फायदा?
- आकाशातून उतरली परी ___ रावांच नाव घेते आता जा आपापल्या घरी.
- चांदीच्या परातीत ठेवले गहू लग्नच नाही झालं तर नाव कोणाच घेऊ.
- वांग्याच्या भाजीत घातलाय स्पेशल मसाला ___ च नाव माहिती आहे मग मला कशाला विचारता.
- फेसबुकवर झाली ओळख, इंस्टाग्रामवर प्रेम जुळले ___ आहे किती रिकामटेकडे हे लग्नानंतर कळले.
Marathi ukhane for female Funny
- आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,… राव हेच माझे अलंकार खरे.
- लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,
- केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.
- डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
marathi ukhane for female satyanarayan pooja
- अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.
- डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, ___रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.
- दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी, __ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
- संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा, __ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
- ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, ___रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.
- आतून मऊ पण बाहेर काटेरी साल, __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.
- स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, ___रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.
- पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा ___ राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा.
- वटपौर्णमेची पूजा मनोभावे करते ___ रावांसाठी दीर्घायुष्य मागते.
- संगमरवरी गाभारा त्याला सोन्याच्या कळस ___ रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.
- ईश्वराची कृपा आई-वडिलांचे प्रयत्न,…… माझ्या सौभाग्याचे रत्न.
- प्रेम रुपी सागर, संसार रुपी सरिता,…… च नाव घेते खास तुमच्याकरिता.
- रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,…… च नाव घेते खास तुमच्यासाठी.
Marathi ukhane for female wedding
- राम सीतेची जोडी अमर झाली जगात,…… च नाव घेते…… च्या घरात.
- उत्तर दिशेला चमकतो आढळ ध्रुवतारा,…… चा उत्कर्ष हाच अलंकार खरा.
- स्वाती नक्षत्रातील थेंबाचे, शिंपल्यात होती मोती,…… च्या संगतीत उजळली जीवन ज्योती.
- प्रितीच्या झुळ्यात कळीचं फूल झालं,…… ज्या संगतीने जीवन सार्थक झालं.
- सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती,…… ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.
- पाकळी पाकळी उमलून फुल घेतं आकार,…… सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार.
- पारिजातकाची फुलं वेचते मी वाकून,…… च नाव घेते तुमचा मान राखून.
- तुमच्या आग्रहाखातर उखाणा मी आठवते ___ रावांचे नाव घेताना मीच मोहरते.
- कळी हसेल फुल उमलेल दरवळेल धुंद सुगंध ___ च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
- बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र ___ रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र.
Marathi Ukhane for Female Video
आशा करतो कि तुम्हाला marathi ukhane for female ( नावरीसाठी उखाणे ) हि पोस्ट आवडली असेल
जर तुमच्या कडे सुद्धा उखाणे असतील तर कंमेंट नक्की करा
धन्यवाद
टीम ३६०मराठी
1 thought on “[500+] Marathi Ukhane For Female | नवरीसाठी उखाणे”