नमस्कार, आज आपण स्त्री पूरूष समानता मराठी निबंध बघणार आहोत,
आपण भारतात राहतो. भारत प्राचीन काळापासून एक पुरुष प्रधान देश आहे असे समजले जाते. आपल्या देशात स्त्रीला देवी म्हणून पुजले जाते पण कितीही झाले तरी सामान हक्क आहेत असे म्हणता येणार नाही.
पुरुष आणि स्त्री समान आहेत हे मात्र खरं आहे. फक्त हे समजत रुजवण्याची चळवळ स्त्रियांना करावी लागते.
आजचा जगात स्त्री शिक्षण घेत आहे, पुरशांसोबत खांदा मूळवून पुढे जात आहेत, घरातून बाहेर पडून कमावत आहे. स्त्री ला तेवढेच स्वतंत्र आहे जेवढे पुरुषाला आहे.
सर्व क्षेत्रात आज महिला आढळून येतात. सैन्य असो व विज्ञान, महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहे. ह्या विचारात थोडी कसर समाजात आढळून येते, ती नक्की पूर्ण होईल आणि समाज खरंच म्हणू शकेल कि स्त्री पुरुष समान आहेत.
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय ?
पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्यक्तिमत्त्व विकासाची समान संधी म्हणजे स्त्री – पुरूष समानता होय. पुरूषाला जशी सुखदुः ख आहेत तशीच स्त्रिला सुद्धा आहेत, याची जाणीव स्त्री-पुरूषांत जागृत करणे म्हणजे स्त्री – पुरूष समानता.
स्त्री-पुरूषांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समान हक्क आणि अधिकार मिळणे, समान वागणूक आणि समान संधी मिळणे असाही समानतेचा अर्थ होतो. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना विकासाच्या सर्व संधी समानतेत समाविष्ट आहेत.
स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते
व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने होईल,
गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. शिक्षणाची दारे खुली झाल्यावर तिने आपल्या प्रगतीचा वेग वाढला आहे. मानवी जीवनातील कोणते क्षेत्र तिला आता नवे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर ही आपली कर्तबगारी गाजवत आहे. स्त्रीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. शहरातील स्त्री कचेरीतील बौद्धिक काम लीलया करते. अगदी प्रमुख अधिकारपदही सांभाळते. विद्यालयांत, महाविद्यालयांत अध्यापनाचे कार्य करते.
तिने वैद्यकीय क्षेत्राबरोबर स्थापत्य क्षेत्राहही नावलौकिक मिळवला आहे. आजच्या युगातील ‘ माहिती तंत्रज्ञान ‘ या क्षेत्राहही ती अग्रेर आहे. ती मोटारगाडी, आगगाडी, विमान चालवते. अंतराळात झेप घेते आणि समुद्राच्या तळाशीही संशोधनासाठी जाते. कोणतेही क्षेत्रतिला असाध्य नाही.
आज आपण स्त्री पूरूष समानता मराठी निबंध पहिला, आशा करतो तुम्हाला आवडला असेल
आमचे इतर निबंध देखील पहा