भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल | Marathi Viral Video

tobacco in marriage function Viral video : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले आहेत. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला आहे. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. त्याने आपल्या डोक्याला बाशिंग बांधले आहे. डोक्यावर टोप आहे. तसेच नवरदेवाने गळ्यात शेला घातलेला आहे.

काही लोकांना आपल्या सवयी सुटता सुटत नाहीत. कोणत्याही ठिकाणी गेले तरी हे लोक आपल्या सवयींना चिटकून राहतात. लोकांच्या याच विचित्र सवयींचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव भर मंडपात तंबाखू चोळत आहे. तंबाखू खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हा व्हिडीओमधील नवरदेवाची हिम्मत पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलीच दाद दिली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र,

या व्हिडीओला ‘tube.indian’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला पाहून चांगलेच हसत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

Funny Comments On this Viral Video :

User 1 : Bas tanbaco he jan hai

User 2 : He believes in tambaako supremacy

User 3 : Sounk badi chij hai bc………😂😂😂

Written By Team 360Marathi.in

Leave a Comment

close